ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात. ही रुग्णालये सरकारद्वारे चालवली जातात. इथे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतात. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा, चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना ग्रामीण रुग्णालय मदत करते. त्यामुळे या सर्व ठिकाणांहून ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येतात.

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित
  • साधी बाळंतपणे आणि अवघड बाळंतपणे. अडलेल्या बाळंतिणीकरता सिझेरियनची सोय. वैद्यकीय गर्भपात आणि अर्धवट झालेला गर्भपात वैद्यकीय मदतीने पूर्ण करणे.
  • स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर उपचार.
  • लहान मुलांचा न्यूमोनिया, अतिसार, शरीरातील पाणी कमी होणे, तीव्र कुपोषित मुले तसेच तान्ह्य़ा बाळांचे आजार या सर्व गोष्टींकरता वैद्यकीय मदत.
  • न्यूमोनिया, रक्तदाब, ताप, मधुमेह अशा आजारांवर उपचार.
  • साधे फ्रॅक्चर (हाड मोडणे), गळू, हर्निया यावरील शस्त्रक्रिया
  • विषबाधा किंवा सर्पदंश अशा अपघातांवर उपचार
  • क्षयरोग नियंत्रणासाठी डॉट (समक्ष) उपचार, इत्यादी

रुग्णालयात पैसे द्यावे लागतात का?

  • एक अल्पशी नोंदणी रक्कम कागद काढण्यासाठी वगळता, दारिद्रयरेषेखाली असणाऱ्या सर्व रुग्णांना रुग्णालयाची सेवा मोफत आहे.
  • इतर रुग्णांना काही रक्कम भरायला लागते. कोणत्या सेवेसाठी किती रक्कम भरायची याचा तक्ता तिथे लावलेला असतो.
  • काही तक्रारी असल्यास वैद्यकीय अधीक्षकाकडे नोंदवण्याची किंवा तक्रार पेटीत पत्र टाकण्याची सुविधा उपलब्ध केलेली असते.

रुग्णालय सल्लागार समिती

  • प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्थानिक सदस्यांची एक सल्लागार समिती असतेच. रुग्ण कल्याण समिती किंवा रुग्णालय समिती या नावाने ती ओळखली जाते. रुग्णांना मदत करणे, उपलब्ध सेवांच्या प्रतीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सामग्रीची दुरुस्ती करून घेणे अशा या समितीच्या जबाबदाऱ्या आहेत.