22 July 2018

News Flash

मच्छीमारांसाठी योजना

प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षांचा अनुभव असावा.

मच्छीमार युवकांना प्रशिक्षण

नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छीमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छीमार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), अलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदुर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पद्धती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण इ. बाबतचे प्रशिक्षण देण्यात येते.

 • प्रशिक्षण कालावधी-६ महिने.
 • प्रशिक्षणार्थी क्षमता-२२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी
 • प्रशिक्षणार्थी शुल्क-दारिद्रय़ रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा १०० रुपये
 • दारिद्रय़ रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा ४५० रुपये

पात्रता

 • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार असावा.
 • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षांचा अनुभव असावा.
 • प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
 • प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी किमान चौथी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थीस मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.

मच्छीमारांना डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती

निकष

 • निर्धारित केलेल्या निकषाप्रमाणे डिझेल कोटा राहील.
 • प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करून दिलेल्या सिलेंडर निहाय नौकांच्या डिझेल कोटा मंजुरीच्या निकषांच्या मर्यादेतच प्रतिपूर्तीची रक्कम अनुज्ञेय राहील.
 • निश्चित केलेल्या निकषापेक्षा कमी डिझेल खरेदी केले असेल तर त्या महिन्याचा उर्वरित कोटा व्यपगत होईल.
 • सदर योजना महाराष्ट्रात नोंदविलेल्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांकरिता अनुज्ञेय राहील.
 • डिझेल कोटा उचलीकरिता विहित नमुन्यात डिझेल वितरण पुस्तिका ठेवावी लागेल.
 • लाभधारक सदस्यांना स्मार्ट कार्ड घेणे बंधनकारक राहील.

First Published on December 7, 2017 12:58 am

Web Title: scheme for fishermen fishermen issue