11 August 2020

News Flash

अपंगांसाठी शिष्यवृत्तीची संधी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी नवीन अर्जदारांना ३० सप्टेंबर २०१७ या तारखेची मर्यादा आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सशक्तीकरण विभागातर्फे  विविध स्तरावरील शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जातात. –

१)अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शैक्षणिक शिष्यवृत्ती:

समाविष्ट अभ्यासक्रम: इयत्ता ९ वी व १० वी.

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या- ४६,०००

पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा- वार्षिक २ लाख रु.

शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक देखभाल भत्ता म्हणून दिवस शाळेतील नियमित विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३५० रु. व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा ६०० रु. व पुस्तके, आकस्मिक अनुदान आणि वाहतूक भत्ता, वाचक भत्ता यांसारखे भत्ते व फायदे देय असतील.

२) अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती-

समाविष्ट अभ्यासक्रम- इयत्ता ११ वी पुढील पदविका, पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम.

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या- १६,६५०.

पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा- २.५० रु.

शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- विविध विद्याशाखातील पदव्युत्तर, पदवी, पदविका इ. शैक्षणिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार दरमहा ६५०- १२०० तर दिवस शाळेतील नियमित विद्यार्थ्यांसाठी दरमहा ४००-५५० रु. ची शैक्षणिक शिष्यवृत्ती व त्याशिवाय शिक्षण शुल्क, पुस्तके व वाहतूक भत्ता, वाचन भत्ता इ. फायदे योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देय असतील.

३) अपंग विद्यार्थ्यांसाठी वरच्या वर्गातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती-

समाविष्ट अभ्यासक्रम- देशांतर्गत निवडक व अधिकृत अशा २४० विषय अभ्यासक्रमांमधील पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रम-

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या- १६०.

पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा- ६ लाख रु.

शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक देखभाल भत्ता म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० रु. तर दिवस शाळेतील नियमित विद्यार्थ्यांसाठी दरमहा १५०० रु. व त्याशिवाय अपंगत्व भत्ता रु. २०००, पुस्तक अनुदान वार्षिक रु. ५००० व शैक्षणिक मार्गदर्शन शुल्क म्हणून वार्षिक २ लाख रु. देय असतील.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- वरील योजनेअंतर्गत पात्रताधारक अर्जदारांनी फायदा घेण्यासाठी संगणकीय पद्धतीने खालीलप्रमाणे नव्याने वा नूतनीकरणासाठी अर्ज करावेत.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी नवीन अर्जदारांना ३० सप्टेंबर २०१७ या तारखेची मर्यादा आहे. तर याच प्रकारातील शिष्यनृत्तींसाठी ज्यांना नूतनीकरण करून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची मर्यादा ३१ जुलै २०१७ आहे.

तर मॅट्रिकोत्तर म्हणजे दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी नवीन अर्जदारांना ३१ ऑक्टोबर २०१७पूर्वी आपले अर्ज दाखल करावे लागतील. तर ज्या अर्जदारांना अर्जाचे नूतनीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी ३१जुलै २०१७ ही तारीख अंतिम राहील.

ज्या अर्जदारांना उच्चशिक्षणासाठी अर्ज करायचे आहेत त्यातील नवीन अर्जदारांसाठी

३१ ऑक्टोबर २०१७ ही अंतिम मुदत असेल तर नूतनीकरण करणाऱ्या अर्जदारांसाठी ३१ जुलै २०१७ ही अंतिम मुदत असेल.

विशेष सूचना-

वरील तीन शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (दिव्यांगजन) सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in अथवा www.scholarships.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2017 4:16 am

Web Title: scholarship opportunities for handicapped
Next Stories
1 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीतील शिक्षणाचा मार्ग
2 प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
3 नोकरीची संधी
Just Now!
X