केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग (दिव्यांगजन) सशक्तीकरण विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर अपंग विद्यार्थ्यांना विविध स्तरांवरील शिक्षणासाठी खालीलप्रमाणे विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत.

 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती-

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

योजनेंतर्गत इयत्ता ११ वी ते पदविका व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांहून अधिक नसावे.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १६,६५० आहे. विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर, पदवी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमामधील पदवी अभ्यासक्रम पदविका इ.साठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा ६५० पासून रु. १२०० पर्यंत व नियमित विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ४०० पासून रु. ५५० असून त्याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क (वार्षिक मर्यादा १.५० लाख रु.), पुस्तक भत्ता, वाहतूक भत्ता, वाचक भत्ता इ. सारखे अन्य भत्तेपण देय असतील.

 उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती-

योजनेअंतर्गत विविध विषयांमधील पदव्युत्तर पदवी व शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे मान्यताप्राप्त अशा २४० संस्थांमधील पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १६० असून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३००० तर नियमित विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. १५०० व त्याबरोबरच अपंगत्व भत्ता दरमहा रु. २०००, पुस्तक अनुदान वार्षिक रु. ५००० व शैक्षणिक शुल्क म्हणून वार्षिक २ लाख रु. देय असतील.

नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती-

योजनेंतर्गत परदेशातील विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएच.डी. या अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या २० असून देखभाल भत्ता म्हणून इंग्लंडमधील शैक्षणिक संस्थांसाठी वार्षिक ९९०० पौंड (ग्रेट ब्रिटन) आणि अन्य देशांसाठी वार्षिक १५४०० अमेरिकी डॉलर्स व त्याशिवाय शैक्षणिक शुल्क, आकस्मिक खर्च- भत्ता, विमान प्रवास इ. चा समावेश आहे.

 राष्ट्रीय शिष्यवृत्ती-

योजनेंतर्गत देशातील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांमधील संशोधनपर एमफील व पीएच.डी.चा समावेश असून त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्नविषयक मर्यादेची अट नाही.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या २०० असून कनिष्ठ संशोधकांसाठी पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा रु. २५,००० तर वरिष्ठ संशोधकांसाठी तिसऱ्या वर्षांपासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी दरमहा रु. २८,००० व त्याशिवाय आकस्मिक भत्ता, वाचक भत्ता, घरभाडे भत्ता इ. पण नियमांनुसार देय असेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील शिष्यवृत्ती योजनांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या http://www.scholarships.gov.in, http://www.ugc.ac.in अथवा http://www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- वरील योजनांतर्गत संपूर्णपणे भरलेले अर्ज सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, अपंग (दिव्यांगजन) सशक्तीकरण विभाग, ५ वा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठवावेत. मॅट्रिकोत्तर व उच्च वर्ग शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबर २०१७ ही अंतिम मुदत आहे.