सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्रातील पंचतारांकित वाट ही स्पाने दाखवली हे खरे. या वाटेवरून सकारात्मक आणि योग्य वाटचाल करण्यासाठी त्याचे योग्य ते प्रशिक्षण आवश्यक आहे. स्पा हे सेवा क्षेत्र आहे. शरीराला दुखऱ्या भागांवर मसाज करून देणे किंवा केवळ थकवा दूर होण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने मसाज करणे म्हणजे स्पा करून घेणे. दिवसेंदिवस स्पांची संख्या वाढते आहे. पण त्यातील योग्य पद्धतीने व्यवसाय करणारे स्पा नेमके कोणते, हे जाणून घेणेही फार महत्त्वाचे ठरते. स्पा क्षेत्रात काम करण्यासाठी वागण्यातील मार्दव, मृदू स्वभाव, उत्तम संभाषणकौशल्य, डौलदार हालचाली आणि प्रचंड आत्मविश्वास हे गुण आवश्यक आहेत.

अभ्यासक्रम आणि सर्टिफिकेशन

Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड
panvel tdr marathi news, cidco area of ​​panvel municipal corporation marathi news
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत टीडीआर लागू होणार, ३० दिवसांत नागरिकांना हरकतींची मुभा 
  • ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सील (इंडिया) – या संस्थेत स्पा थेरपीस्ट आणि स्पा ट्रेनर हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम
  • सिडेस्को(झुरिच) – येथे स्पा थेरपी(पदव्युत्तर स्तरावरील प्रमाणपत्रअभ्यासक्रम)
  • सीआयबीटीएसी (यूके) -येथे स्पा थेरपी आणि स्पा मॅनेजमेंट हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वरील अभ्यासक्रम भारतात उपलब्ध करून देणाऱ्या संस्था

  • एनरिच अकॅडमी मुंबई ( http://www.enrichsalon.com/ )
  • एलटीए स्कूल ऑफ ब्यूटी ( http://www.ltaschoolofbeauty.com/ )
  • मिरर अकॅडमी, नाशिक (http://mirrorsalon.co.in/)
  • उदय टक्केज, यू टक्केज इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर अँड स्कीन मुंबई ( http://m.facebook.com/utakkes/ )
  • ब्युटीक इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी थेरपी अँड हेअर ड्रेसिंग ( butic.com )

असिस्टंट स्पा थेरपिस्ट – या व्यक्तीला स्पा थेरपीचे प्राथमिक ज्ञान  त्याचप्रमाणे आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षेचे नियम यांचीही माहिती असणे गरजेचे आहे. मसाज तंत्र, स्पामध्ये वापरली जाणारी उत्पादने याची जाण हवी.असिस्टंटला थेरपिस्टबरोबर काम करायचे असते. उपचारपद्धतीसाठी जागा तयार करणे. उपकरणे आणि उत्पादनांची ट्रॉली तयार करणे, ही त्याची कामे असतात.

स्पा थेरपिस्ट – शरीरशास्त्र, शरीररचना यांचे संपूर्ण ज्ञान स्पा थेरपिस्टला असावे लागते. त्याचसोबत विविध स्पा उपचारपद्धती आणि मसाजची तंत्रे यांची माहिती असावी लागते.

स्पा ट्रेनीज – अनुभवी व प्रशिक्षित स्पा थेरपिस्टला पुढे स्पा ट्रेनर म्हणून काम करता येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शरीररचना, शरीरशास्त्र, पॅथॉलॉजी अशा विषयांसोबतच स्पामध्ये वापरली जाणारी उत्पादने, स्पा थेरपींची तंत्रे, विविध मसाज, रॅप्स, इ. शिकवता यावे लागते.

संधी

स्पाचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला कोणत्या प्रकारच्या स्पामध्ये काम करायचे आहे, ही निवड आपण करू शकतो.

१) डे स्पा/ स्पालोन (स्पा सॅलॉन)

२) डेस्टिनेशन स्पा

३) मेडी स्पा

  • डे स्पा – मोठय़ा शहरांमध्ये डे स्पा असतात. दर दिवसाच्या अपॉइंटमेंट्स इथे घेतल्या जाताता. असिस्टंट किंवा स्पा थेरपिस्ट इथल्या विविध स्पा उपचारपद्धती करतात.
  • डेस्टिनेशन स्पा – यांना हॉलिडे स्पा असेही म्हणतात. यात संपूर्ण दिवस किंवा २-३ दिवस अथवा जास्त दिवसाचे पॅकेज दिले जातात. यामध्ये क्लायंटना विविध स्पा मसाज, स्क्रब, रॅप्स तसेच इतरही वैविध्यपूर्ण उपचारपद्धती जसे योगासने, ध्यानधारणा, व्यायाम, वैशिष्टय़पूर्ण आहार इत्यादी सेवा पुरवल्या जातात. अशा स्पामध्ये असिस्टंट स्पा थेरपिस्टना संधी असतातच शिवाय अरोमा थेरपी, पंचकर्म, निसर्गोपचार जाणणाऱ्या तज्ज्ञांनासुद्धा इथे संधी उपलब्ध होतात. हे स्पा सहसा समुद्रकिनारा, नदीकिनारा, पर्वतराजी अशा निसर्गरम्य परंतु शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी वसलेले असतात. त्यामुळे इथे निवासी नोकरी करावी लागते तसेच स्थानिकांनाही उत्तम संधी असतात.
  • मेडी स्पा – यात वैद्यकीय उपचारपद्धतीनुसार सेवा दिली जाते. त्यासाठी काही विशिष्ट उत्पादने आणि औषधे असतात. इथे स्पेशल मसाजला वैद्यकीय उपचारांची जोड दिली जाते. स्पा थेरपीचे योग्य प्रशिक्षण व सर्टिफिकेट असल्यास उत्तम संधी मिळू शकते. वैद्यकीय तज्ज्ञांबरोबर काम करण्याचाही अनुभव मिळतो.

स्पाच्या क्षेत्रात काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण अनेक स्पांमध्ये पुरुष ग्राहकांना स्त्री कर्मचाऱ्यांकडून सेवा आणि स्त्री ग्राहकांना पुरुष कर्मचाऱ्यांकडून सेवा दिली जाते. चांगल्या स्पामध्ये  याविषयी योग्य ती सर्व खबरदारी घेतली जाते.तरीही कुठेही नोकरी करण्याआधी त्या स्पाची तसेच तिथे दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती करून घ्या. त्यातूनही नोकरीला लागल्यावर एखाद्या ठिकाणी गैरप्रकार आढळल्यास त्वरित योग्य ती पावले उचलावीत.

(लेखिका सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)