नीटीम्हणजेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या पुढील अभ्यासक्रमांच्या २०१८-२०२०या शैक्षणिक सत्रासाठी  खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.

इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.

इंडस्ट्रियल सेफ्टी अ‍ॅण्ड एन्व्हायरॉनमेंटल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या विषयातील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व त्यांनी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व त्यांनी सीएटी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना नीटी मुंबई येथे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी १००० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ५०० रु.) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगची जाहिरात पाहावी अथवा नीटी च्या www.nitie.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०१८ आहे.