केंद्र सरकारच्या मानव-संसाधन मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या पुणे विभागीय केंद्रातर्फे राज्यातील १० वी व १२ वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

  • आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी शालान्त शिक्षण मंडळाची १० वी वा १२वीची परीक्षा दिलेली असावी व ते संबंधित परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण घोषित केलेले असावेत.
  • निवड पद्धती- अर्जदार विद्यार्थ्यांच्या घोषित झालेल्या परीक्षेच्या निकालानुसार त्यांच्या संबंधित विषयांची अभ्यासक्रमावर आधारित १० वी अथवा १२ वीची परीक्षा संगणकीय पद्धतीने ऑक्टोबर २०१७ मध्ये घेण्यात येऊन परीक्षेचा निकाल नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, नवी दिल्लीतर्फे १० डिसेंबर २०१७ रोजी घोषित करण्यात येईल.
  • परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत- अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असणारे प्रवेश शुल्क संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • विशेष सूचना- अर्जदार विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या १० वी वा १२ वीच्या परीक्षेच्या निकालानुसार जास्तीत जास्त दोन विषयातील गुणांनुसार अशा विषयांच्या परीक्षेला न बसण्याचा ऐच्छिक पर्याय स्वीकारू शकतात.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील परीक्षांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंगची जाहिरात पहावी इन्स्टिटय़ूटच्या
  • पुणे येथील दूरध्वनी क्र. ०२०- २५४४४६६७ वर नि:शुल्क दूरध्वनी क्र. १८००-१८०-९३९३ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या nios.ac.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची

तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७ आहे. राज्यातील १० वी व १२वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.