News Flash

नर्सिग विषयातील विशेष अभ्यासक्रम

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी पात्रता परीक्षा दि. २५ मे २०१७ रोजी घेण्यात येईल.

 

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे उपलब्ध असणाऱ्या फिजिअ‍ॅट्रिक व मेंटल हेल्थ नर्सिग विषयातील विशेष अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता व अनुभव- अर्जदारांनी बीएस्सी नर्सिग पदवी पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना स्टाफ नर्स म्हणून काम करण्याचा किमान एक वर्षांचा अनुभव असायला हवा.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी पात्रता परीक्षा दि. २५ मे २०१७ रोजी घेण्यात येईल. लेखी निवड परीक्षेत यशस्वी ठरणाऱ्या उमेदवारांची २६ मे २०१७ रोजी मुलाखत घेण्यात येऊन त्याआधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.

अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या १० असून यापैकी ५ जागा सरकारी नियमांनुसार राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १५० रु. चा (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी १०० रु. चा) डायरेक्टर प्रोफेसर, महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थच्या नावे असणारा व पुणे येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासन महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणेची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या ०२०- २६१२७३३१ किंवा २६१२७३३१ (विस्तारित क्रमांक २०६ वर संपर्क साधावा.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांडड्राफ्टसह असणारे अर्ज संचालक प्राध्यापक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सवरेपचार रुग्णालय परिसर, पुणे ४११००१ या पत्त्यावर २० मे २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 2:34 am

Web Title: specialized courses in nursing
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : सीसॅट – मूलभूत संख्याज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी
2 करिअरमंत्र
3 नोकरीची संधी
Just Now!
X