News Flash

क्रीडा प्रबोधिनी

८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची शारीरिक क्षमता अजमावून प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करण्याच्या दृष्टीने व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने क्रीडा प्रबोधिनी योजना राबविण्यात येत आहे.

  • क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया नियमात सुधारणा करण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती गठित केलेली आहे. ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांची शारीरिक क्षमता अजमावून प्रवेश दिला जातो.
  • राज्यात पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, प्रवरानगर, औरंगाबाद व गडचिरोली अशा ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
  • ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शूटिंग, फुटबॉल, जलतरण, डायव्हिंग, अ‍ॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅण्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग व बॉक्सिंग अशा १५ क्रीडाप्रकारांत मार्गदर्शन केले जाते.

पुरवण्यात येणाऱ्या सुविधा

प्रशिक्षणार्थीना विविध खेळांचे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रांत दिले जाते.

प्रशिक्षणार्थी खेळाडूंना निवास, भोजन, शिक्षण, खेळ, गणवेश याबाबतचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:34 am

Web Title: sports academy
Next Stories
1 करिअरमंत्र
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : यूपीएससीसाठी विशिष्ट क्षमतांचा विकास
Just Now!
X