केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची मेगा भरती. स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्टार एक्झामिशन ‘कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झाम २०१७’ (सीजीएलई – २०१७) १६ मे २०१७ रोजी जाहिर झाली आहे. ही जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ६६६.२२ू.ल्ल्रू.्रल्ल  या संकेतस्थळावर पाहता येईल. वर्तमानपत्रांतील बातम्यांनुसार केंद्र सरकारने आपल्या २०१६-२०१७ च्या वार्षकि अंदाजपत्रकात (बजेट) मध्ये १ लाख ८८ हजार रिक्त पदांच्या भरतीसाठी तजवीज करून ठेवली होती. ज्यात कस्टम्स, सेंट्रल एक्साइज, इन्कम टॅक्ससारख्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट्समध्ये किमान २०,००० जागा भरावयाच्या होत्या. यावरून या वेळेच्या सीजीएल-२०१७ मधून किमान ४० ते ५० हजार पदांची भरती होईल, असा अंदाज आहे. या परीक्षेमधून पुढील पदांची भरती होणार आहे.

(१) असिस्टंट ऑडिट ऑफिसर/असिस्टंट अकाऊंट ऑफिसर (सी अ‍ॅण्ड एजी (कॅग) डिपार्टमेंट)

(२) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – सीएसएस, आयबी, रेल्वे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, एएफएचक्यू आणि इतर खात्यांमध्ये

(३)सहायक – (केंद्र सरकारची इतर मंत्रालये आणि इतर खात्यांमध्ये)

(४) इन्स्पेक्टर – (इन्कम टॅक्स, कस्टम्स, (प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, एक्झामिनर), सेंट्रल एक्साइज, पोस्ट, सीबीएन)

(५) सब इन्स्पेक्टर – (सीबीआय्, एन्आय्ए, सीबीएन्)

(६) असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर (ईडी)

(७) डिव्हिजनल अकाऊंटंट – सी अ‍ॅण्ड एजी

(८) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर (स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम एम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री)

(९) ऑडिटर (सी अ‍ॅण्ड एजी, सीजीडीए, इतर मंत्रालये)

(१०) अकाऊंटंट/ज्युनियर अकाऊंटंट (सी अ‍ॅण्ड एजी, इतर खाती)

(११) सीनियर सेक्रेटरिएट असिस्टंट/अप्पर डिव्हिजन क्लर्क (केंद्र सरकारची विविध खाती)

(१२) टॅक्स असिस्टंट –  इन्कम टॅक्स (सीबीडीटी), सेंट्रल एक्साइज (सीबीइसी)

पात्रतेच्या अटी – शैक्षणिक अर्हता – (१) असिस्टंट ऑडिट ऑफिसर/असिस्टंट अकाऊंट्स ऑफिसर – पदवी उत्तीर्ण इष्ट पात्रता (डिझायरेबल) सीए/सीएम्ए/सीएस्/एम्कॉम्/एम्बीए (फिनान्स)/बिझनेस इकॉनॉमिक्समधील पदव्युत्तर पदवी, (२) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर – पदवी (कोणत्याही शाखेतील) (१२ वीला गणित विषयांत किमान ६०% गुण आवश्यक), (३) इतर सर्व पदांसाठी पदवी (कोणत्याही शाखेतील) पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेस बसलेले उमेदवार सीजीएल् टायर-१ साठी पात्र आहेत.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१७ रोजी

(१) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर – ३२ वर्षांपर्यंत,

(२) असिस्टंट ऑडिट ऑफिसर/असिस्टंट अकाऊंट ऑफिसर/असिस्टंट सेक्शन ऑफिसर/असिस्टंट/इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स/असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर/सब इन्स्पेक्टर (सीबीआय्/एन्आय्ए/डिव्हिजनल अकाऊंटंट) – ३० वर्षांपर्यंत,

(३) इन्स्पेक्टर/ सहायक/(कस्टम्स/सेंट्रल एक्साइज/पोस्ट/सीबीएन्/ऑडिटर/ज्युनियर अकाऊंट/अकाऊंटंट/यूडीसी/टॅक्स असिस्टंट/सब-इन्स्पेक्टर सीबीएन् – १८-२७ वष्रे)

उच्चतम वयोमर्यादेत सूट – अजा/अज उमेदवारांसाठी – ५ वष्रे, इमाव – ३ वष्रे (केंद्र सरकारचे कर्मचारी (किमान ३ वष्रे सेवा पूर्ण) (ग्रुप ‘बी’साठी खुलागट – ५ वष्रे, इमाव – ८ वष्रे, अजा/अज – १० वष्रे) खुलागट – ४० वष्रे, इमाव – ४३ वष्रे, अजा/अज – ४५ वष्रे)़;  परित्यक्ता/विधवा महिलांसाठी – खुलागट -३५ वष्रे, इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे (ग्रुप सी पदांसाठी उच्चतम वयोमर्यादा –  विकलांग – खुलागट – १० वष्रे, इमाव – १३ वष्रे, अजा/अज -१५ वष्रे

शारीरिक मापदंड – (१) इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साइज/एक्झामिनर/प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर/सीबीएन् – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., अज – (शिडय़ूल्ड ट्राइब) – १५२.५ सें.मी., महिला – १५२सें.मी. (अज – १४९.५ सें.मी.), पुरुष – छाती – ८१ सें.मी. फुगविलेली.

(२)    सब इन्स्पेक्टर (सीबीआय्) – उंची – पुरुष – १६५ सें.मी. (अज – १६० सें.मी.), महिला – १५० सें.मी. (अज -१४७.५ सें.मी.), पुरुष – छाती – ७६ सें.मी. फुगवलेली.

(३)    सब-इन्स्पेक्टर (एन्आय्ए) उंची – पुरुष – १७० सें.मी. (अज – १६५ सें.मी.), महिला – १५० सें.मी. (अज – १४५ सें.मी.), छाती – पुरुष – ७६ सें.मी. फुगविलेली.

निवड पद्धती – सीजीएल-२०१७ परीक्षा चार स्तरांवर घेतली जाणार आहे.

(१) यातील पहिल्या स्तरावरची परीक्षा (टायर-१) दि. १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०१७ दरम्यान घेतली जाईल. यातून सीजीएलच्या (टायर-२) दुसऱ्या स्तरांसाठी उमेदवार निवडले जातील.

(२) टायर-२ परीक्षा दि. १०/११नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्याचे नियोजित केले आहे. टायर-१ आणि टायर-२ या दोनही परीक्षा संगणक आधारित ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.

(३) टायर-३ परीक्षा ऑफलाइन (वर्णनात्मक स्वरूपाची) दि. २१ जानेवारी २०१८ रोजी घेतली जाणार आहे. अंतिम निवड यादी टायर-१, टायर-२ आणि टायर-३ मधील गुणवत्तेवर आधारित बनविली जाईल. प्रत्येक उमेदवाराला टायर-१, टायर-२, टायर-३ मध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. यामध्ये सेक्शनल कटऑफ प्रस्तावित नाही.

(४) टायर-४ मध्ये डेटा एन्ट्री स्कील टेस्ट कॉम्प्युटर प्रोफिशिएन्सी टेस्ट/कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल.

टायर-१ मध्ये (अ) जनरल इन्टेलिजन्स/रिझिनग, (ब) जनरल अवेअरनेस, (क) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड, (ड) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी विचारले जातील. एकूण गुण – २००, वेळ – ६० मिनिटे.

टायर-२ मध्ये (१) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅबिलिटी (१०० प्रश्न, २०० गुण), (२) इंग्लिश भाषा आणि कॉम्प्रिहेन्शन (२०० प्रश्न, २०० गुण), (३) स्टेटिस्टिक्स (१०० प्रश्न, २०० गुण) (ज्युनियर स्टॅटिस्टिकल पदांसाठी) (४) जनरल स्टडिज (फिनान्स आणि इकॉनॉमिक्स) (१०० प्रश्न, २०० गुण) (असिस्टंट ऑडिट ऑफिसर/असिस्टंट अकाऊंट ऑफिसर पदांसाठी) प्रत्येक परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे.

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, अकोला, अहमदनगर, अलिबाग, भंडारा, चंद्रपूर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, जळगाव, पणजी इ.

अर्ज कसा करावा – ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.ssconline.nic.in किंवा www.ssc.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ जून २०१७ (१७.००) पर्यंत करावेत.

पुढील २ ते ३ वष्रे केंद्र सरकारमध्ये मोठी भरती होणार आहे. त्यानंतर मात्र भरतीचे प्रमाण कमी होईल. सर्व पदवीधर उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी सीजीएलई-२०१७ परीक्षेला बसून केंद्र सरकारच्या कार्यालयात नोकरी मिळवून देशसेवा करण्याची संधी घ्यावी. केंद्र सरकारच्या प्रत्येक भरतीसाठीच्या जाहिरातीत मोठय़ा मथळ्यात लिहिलेले असते की ‘केंद्र सरकार आपल्या वर्कफोर्समध्ये जेंडर बॅलन्ससाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.’ सर्व वर्गातील महिला उमेदवारांना कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागत नाही. महिलांना दोन वर्षांची ‘चाइल्ड केअर लिव्ह’ मिळू शकते. (आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आपलं मूल १८ वर्षांचे होईपर्यंत कधीही घेता येते.) अशी संधी फक्त आणि फक्त केंद्र सरकारच देत आहे.