विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे या वर्षी ८ एप्रिलला राज्यसेवा पूर्व परीक्षा घोषित केली गेली आहे. दिलेल्या जाहिरातीनुसार अवघ्या ६९ जागांसाठी महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी अर्ज करत आहेत. प्रसंग बाका आहे पण त्यास तेवढय़ाच धर्याने सामोरे जावे लागणार आहे तर अशा वेळी शांत चित्ताने आपल्या अभ्यासाची रणनीती बनवून अगदी नेमका अभ्यास करून राज्यसेवेचा चक्रव्यूह भेदणे क्रमप्राप्त ठरते. परीक्षेला जाता जाता इतिहास या विषयाची तयारी कशी करावी याची या लेखात चर्चा करू.

अभ्यासक्रम

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहासाच्या अभ्यासक्रमात ‘भारताचा इतिहास (विशेषत: महाराष्ट्राचा)आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’ इतक्याच मुद्दय़ांचा स्पष्ट उल्लेख केला आहे, परंतु याच अभ्यासक्रमाची जर आपण फोड केली तर यामध्ये

१. प्राचीन भारत- यामध्ये अश्मयुग, ताम्र पाषाण युग, हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, भागवत धर्म आणि त्याचा उदय, महाजनपदे अर्थात मौर्य पूर्व काळ, बौद्ध धर्म आणि जैन धर्म उदय आणि विस्तार, मौर्य साम्राज्य उदय आणि विस्तार, मौर्योत्तर काळ, संगम युग, गुप्त साम्राज्य उदय आणि विस्तार यांचा समावेश होतो.

२. मध्ययुगीन भारत – यामध्ये पल्लव, चालुक्य, चंदेल, गहड्वाल, परमार, गुर्जर-प्रतिहार, सेन, कलचुरी, गंग, वर्मन या आरंभिक मध्ययुगीन कालखंडातील प्रादेशिक राजसत्ता आणि त्यांचा राज्यकारभार तसेच चोळ राजे, सुलतानशाही, सुफी आंदोलन व भक्ती चळवळ, विजयनगर साम्राज्य, बहामनी साम्राज्य आणि मुघल सत्ता यांचा राज्यकारभार याचा समावेश होतो.

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास – यामध्ये ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना, सामाजिक -सांस्कृतिक बदल, सामाजिक व आíथक जागृती, भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक त्यांची विचारप्रणाली व काय्रे आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.

४. स्वातंत्र्योत्तर भारत : यामध्ये संस्थानांचे विलीनीकरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भारताच्या नियोजनाचा प्रारंभ, अलिप्ततावादी धोरण, भारत, चीन युद्ध, बांगलादेश मुक्तीसंग्राम आणि भारताची भूमिका तसेच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचे भारताचे धोरण व त्याचे परिणाम या घटकांचा समावेश होतो.

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

गेल्या पाच वर्षांतील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा जर बारकाईने अभ्यास केला तर खालीलप्रमाणे प्रश्नांचे विभाजन दिसून येईल.

वरील विश्लेषणावरून खालील मुद्दय़ांकडे विशेष लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते.

१. आधुनिक भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील भर कमी कमी होत जाऊन सध्या प्राचीन व मध्ययुगीन काळातील इतिहासावरील प्रश्नांची संख्या वाढत आहे.

२. एकूण १०० प्रश्नांपकी साधारणपणे १५ ते २१ प्रश्न इतिहास या घटकावर विचारले जातात.

अभ्यासाची रणनीती

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व विषयांची तुलना केली असता इतिहासाच्या बाबतीत एक गोष्ट ठळक दिसते आणि ती म्हणजे इतिहासाचा अभ्यासक्रम आणि अभ्यासस्रोत तुलनेने अधिक आहेत त्यामुळे नेमका आणि परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच नेमका कोणता मुद्दा कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यासला पाहिजे याचे काही ठोकताळे बांधले पाहिजेत. उदा. प्राचीन भारताचा अभ्यास करायचा असेल तर प्राचीन संस्कृतींच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू आणि त्यांची ठिकाणे, वैदिक कालीन साहित्य आणि त्यातील वैशिष्टय़पूर्ण उल्लेख, प्राचीन काळातील महाजनपदे आणि सध्याचे प्रदेश, प्राचीन नद्या आणि त्यांची सध्याची नावे इत्यादी तर मध्ययुगीन काळात अस्तित्वात आलेल्या राजसत्ता त्यांचा राज्यकारभार, व्यापार, कला यांच्यावर भर द्यावा लागतो. त्यानंतर आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना मात्र ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया अशा स्वरूपाचा अभ्यास करणे अनिवार्य ठरते. या सर्व बाबींचे आकलन होण्यासाठी अभ्यासाची सुरुवात करताना जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करूनच पुढे जावे लागते. यासाठी नेमके कोणते अभ्यासस्रोत वापरावेत आणि ते कसे वापरावेत या संदर्भात आपण पुढील लेखात माहिती घेऊ.