16 October 2019

News Flash

संशोधन संस्थायण : अभियांत्रिकीच्या जगात

संस्थेच्या सर्व प्रयोगशाळा उत्कृष्ट दर्जाच्या असून वातानुकूलित, स्वच्छ संशोधन क्षेत्र वसलेल्या आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

स्ट्रक्चरल इंजिनीअिरग रिसर्च सेंटर, चेन्नई

चेन्नई येथे असलेली स्ट्रक्चरल इंजिनीअिरग रिसर्च सेंटर (एसईआरसी) ही भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इतर संलग्न घटक प्रयोगशाळा वा संशोधन संस्थांपकी एक आहे. एसईआरसी ही स्ट्रक्चरल इंजिनीअिरग या विषयामध्ये संशोधन करणारी सीएसआयआरची एकमेव, महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. संस्था केंद्र सरकार, विविध राज्य सरकारे यांच्याशी संबंधित तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक संस्थांच्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे संशोधनामध्ये गुंतलेली आहे. एसईआरसी ही आयएसओ : ९००१ गुणवत्ता प्रमाणित संस्था आहे.

*संस्थेविषयी

संशोधनामध्ये आज अग्रस्थानी असणाऱ्या या संस्थेची स्थापना १९६५ साली झाली. संस्थेच्या सर्व प्रयोगशाळा उत्कृष्ट दर्जाच्या असून वातानुकूलित, स्वच्छ संशोधन क्षेत्र वसलेल्या आहेत. संस्थेने इतर सोयीसुविधांमध्ये संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केलेली आहे. संस्थेने संरचना आणि संरचनात्मक घटकांचे विश्लेषण, आरेखन आणि चाचणी यासाठी उत्कृष्ट सुविधा बहाल केलेल्या तर आहेतच, मात्र तेवढेच कुशल मनुष्यबळदेखील तयार केलेले आहे. त्यामुळेच एसईआरसीची सेवा केंद्रे आणि अनेक राज्य सरकारांकडून मोठय़ा प्रमाणावर वापरली जात आहे. संस्थेच्या संशोधन व्यवस्थापन आणि विकसनाकडे लक्ष देणारा बिझनेस, नॉलेज मॅनेजमेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट डिव्हिजन (बीकेएमडी) हा एक स्वतंत्र विभाग संस्थेने तयार केलेला आहे. संस्थेच्या एकूण संशोधनाचे नियोजन व देखरेख हा विभाग करतो. संस्थेच्या संशोधनामध्ये त्यामुळे सुसूत्रता येण्यास मदत होत आहे. एसईआरसीचे शास्त्रज्ञ अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम करत आहेत. एसईआरसी संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअिरग) सारख्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक अग्रगण्य संशोधन संस्था म्हणूनच ओळखली जाते.

* संशोधनातील योगदान

एसईआरसी ही संस्था संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअिरग) या विषयामध्ये जरी मुलभूत संशोधन करत असली तरी सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्था विज्ञान क्षेत्रातील इतर शाखा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करते. स्ट्रक्चरल इंजिनीअिरग या विषयाशी संबंधित संशोधनासहितच अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स अ‍ॅण्ड सस्टेनेबल स्ट्रक्चर्स, डिझास्टर मिटिगेशन, स्पेशल अ‍ॅण्ड मल्टी फंक्शनल स्ट्रक्चर्स, स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटिरग अ‍ॅण्ड लाइफ एक्स्टेंशन, कॉम्प्युटेशनल स्ट्रक्चरल मेकॅनिक्स, ब्रिज इंजिनीअिरग, फटिग अ‍ॅण्ड फ्रॅक्चर, हेल्थ असेसमेंट युसिंग गायडेड वेव्ह प्रपोगेशन, नॅनो मेकॅनिक्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग हे विषयदेखील एसईआरसीच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. संस्थेकडे संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानात्मक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये तज्ज्ञ संशोधकांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. या कर्तबगार मनुष्यबळाच्या जोरावर संस्थेला १९९९ पासून अनेकदा सीएसआयआर टेक्नोलॉजी प्राइझ बहाल करण्यात आलेले आहे. संस्थेतील काही तरुण संशोधकांना सीएसआयआरकडून  सीएसआयआर यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेले आहे. या अशा तज्ज्ञ संशोधकांच्या अविरत संशोधनातून एसईआरसी निश्चितपणे देशाला व समाजाला भरीव योगदान देत आहे.

 * संशोधनातील संधी

एसईआरसी ही संशोधन संस्था स्ट्रक्चरल इंजिनीअिरग या विषयांतील देशातील फक्त संशोधनच नव्हे तर एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत येथे अनेक विद्यार्थी येथे पीएचडीचे संशोधन करतात. एसईआरसी देशातील अनेक प्रमुख विद्यापीठांशी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. एसईआरसी दरवर्षी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे डिझरटेशन वर्क (प्रकल्प संशोधन) पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात.

* संपर्क

सीएसआयआर-स्ट्रक्चरल इंजिनीअिरग रिसर्च सेंटर (एसईआरसी) सीएसआयआर कॅम्पस, सीएसआयआर रोड, तारामणी, चेन्नई – ६००११३

दूरध्वनी: +९१-४४-२२५४२१२९, २२५४९२०१

ईमेल – director@serc.res.in

संकेतस्थळ – http://serc.res.in/

First Published on October 18, 2018 3:47 am

Web Title: structural engineering research center chennai