हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड पंचायती राज या संस्थेच्या ग्रामीण विकास आणि आदिवासी विकास संबंधित विशेष अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
० शाश्वत ग्रामीण विकास विषयक पदविका अभ्यासक्रम
* आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
* निवडपद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना प्रवेश दिला जाईल.
* प्रवेश शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून २०० रु. चा (राखीव गटातील उमेदवारांसाठी
१०० रु. चा) एनआयआरडी- पीजीडीआरडीएम यांच्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
० आदिवासी विकास व्यवस्थापन विषयक पदविका अभ्यासक्रम
* आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
* निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल.
* प्रवेश शुल्क- अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी ३०० रुपयांचा) एनआयआरडी- पीजीडीआरडीएम यांच्या नावे असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
करिअर संधी
हे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ग्रामीण विकास क्षेत्र, सरकारी- समाज कल्याण विभाग, आदिवासी कल्याण प्रकल्प, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांतर्गत चालविण्यात येणारे सामाजिक प्रकल्प, ग्रामविकास सहकारी संस्था इत्यादी ठिकाणी विविध प्रकारच्या कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
अधिक माहिती
अभ्यासक्रमांची अधिक माहिती हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड पंचायती राज या संस्थेच्या www.nird.org.in/ Distance Education Cell/ PGDSRD/ PGDTDM/ NEWS Events या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज प्रोजेक्ट डायरेक्टर (म्डीईसी), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अॅण्ड पंचायत राज, राजेंद्रनगर, हैदराबाद- ५०००३० या पत्त्यावर ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा
बेताने पाठवावेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2015 1:02 am