अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, मत्तुकुडू, ईस्ट कोस्ट रोड, चेन्नई- ६०३१०२ या पत्त्यावर ७ ऑगस्ट २०१८ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटिज, चेन्नई येथे उपलब्ध असणाऱ्या अपंग विकास क्षेत्रातील खालील अभ्यासक्रमांच्या २०१८-१९ या सत्रात प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

डेव्हलपमेंटल थेरपी व फिजिकल न्यूरोलॉजी विषयातील पदव्युत्तर पदविका – अर्जदारांनी वैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी यासारख्या विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ली इंटरव्हेन्शन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम- अर्जदारांनी ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, नर्सिग यासारख्या विषयातील पदवी अथवा चाइल्ड सायकॉलॉजी विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा कमीतकमी ५०% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ४०%) उत्तीर्ण केलेली असावी.

विशेष सूचना –  अपंग उमेदवारांसाठी गुणांकाची अट लागू होणार नाही.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचेशुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी ५०० रुपये (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये) भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, चेन्नईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://niepmd.tn.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

द. वा. आंबुलकर