News Flash

एमपीएससी मंत्र : नावीन्यपूर्ण पर्यटन – २

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाडय़ांमध्ये पर्यटकांना भ्रमंती करता यावी यासाठी हाऊसबोट प्रकल्प राबविण्यात येत आहे.

फारूक नाईकवाडेमागील लेखामध्ये पर्यटन क्षेत्रातील काही नव्या घडामोडींची माहिती देण्यात आली. याबाबत पुढील चर्चा या लेखामध्ये.

कृषी पर्यटन

शेती तसेच ग्रामीण संस्कृती यांची ओळख पर्यटकांना करून देण्याच्या दृष्टीने आपला शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी पर्यटनविषयक सुविधा विकसित करतात. यामध्ये निवासाची व्यवस्था, ग्रामीण सभामंडप, लोककलांचे सादरीकरण, ग्रामीण स्वयंपाक, भोजन व जीवनपद्धतींची ओळख अशा बाबी समाविष्ट असतात. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) यांच्याकडून दर वर्षी साजरा करण्यात येतो.

सामाजिक पर्यटन

तळागाळातून सुरू झालेल्या राष्ट्रनिर्माणाच्या चळवळी, समाजप्रबोधन/ समाजसेवेचे प्रेरणादायी प्रकल्प यांना भेट देऊन त्यांचा अनुभव घेणे/ समजावून घेणे या उद्देशाने सामाजिक पर्यटन (र्रू-स्र्१ॠ१ी२२्र५ी ३४१्र२े) ही संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राबवीत आहे. यासाठी विविध पर्यटन संस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे. यामध्ये आनंदवन, हेमलकसा, सर्च संस्था, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, अन्सारवाडा/ आंबेजोगाई, सेवालय, दापोली अशी ठिकाणे व संस्थांना भेटी आयोजित करण्यात येतात.

हाऊसबोट

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाडय़ांमध्ये पर्यटकांना भ्रमंती करता यावी यासाठी हाऊसबोट प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चार हाऊसबोट तारकली येथे उपलब्ध आहेत. हाऊसबोटीसाठी पर्यटकांचा वाढता प्रतिसाद पाहून रत्नागिरी जिल्ह्य़ातील बाणकोट व दाभोळ या खाडी क्षेत्रात हाऊसबोट प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

नवीन सेवा

  • क्रूझ सेवा – मुंबई शहरात देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी उद्योजकांच्या सहकार्याने मुंबई-हार्बर क्रूझ सेवा सुरू करण्यात येणार आहे.
  • फ्लॉटेल – मुंबईजवळच्या समुद्रामध्ये महामंडळाकडून तरंगते उपाहारगृह (ा’ं३्रल्लॠ १ी२३ं४१ंल्ल३) विकसित करण्यात येत आहे.
  • ऑम्फिबियन एअरक्राफट – राज्यामध्ये जलविमान वाहतूक अंतर्गत ऑम्फिबियन एअरक्राफ्ट सेवा खासगी उद्योजकांच्या
  • सहकार्याने सुरू करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सदरची सेवा जुहू चौपाटी ते गिरगाव चौपाटी अशी सुरू करण्यात येणार आहे.
  • समुद्रविश्व प्रकल्प – महामंडळाने तोंडवली- वायंगणी, जि. सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी अत्याधुनिक समुद्रविश्व प्रकल्प उभारण्याच्या निर्णय घेतला आहे.

पंचतीथ्रे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित पाच स्थळे ही पंचतीर्थे म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने घेतली आहेत.

१) इंग्लंडमधील घर – लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एस्सी.साठी प्रवेश घेतल्यावर डॉ. आंबेडकर १९२१-२२ अशी दोन वर्षे लंडनमध्ये किंग हेत्री या मार्गावर एका घरात राहत होते.

२) इंदू मिल – मुंबईच्या दादर भागात

डॉ. आंबेडकरांचे राजगृह हे निवासस्थान होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पाíथव शरीर इथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

३) दिल्ली येथील निवासस्थान – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा देशाचे कायदामंत्री बनले तेव्हा दिल्लीमधील २६, अलिपूर रोड येथील निवासस्थान त्यांना देण्यात आले होते. येथेच त्यांनी बुद्धा अ‍ॅण्ड हिज धम्मा, बुद्ध और कार्ल मार्क्‍स हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले.

४) महू – येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. आता महूचे नामांतर आंबेडकरनगर असे करण्यात आले आहे.

५) आंबडवे – रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे गाव बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव. इथे सपकाळ कुटुंबीय वास्तव्य करून राहतात.

खासगी कंपन्यांकडून विकसित नावीन्यपूर्ण संकल्पना –

साहसी खेळ पर्यटन 

सीएसी ऑलराऊंडर यांच्याकडून पर्यटनासाठी नागपूरजवळील रामटेक येथे पॅरासीिलग, पॅराग्लायडिंग, पॅरा मोटरिंग असे विविध साहसी खेळांवर आधारित अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज साकारण्यात आले आहे, तर चिखलदरा (अमरावती) येथे फ्लाियग फॉक्स व व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळांसाठी व्हेंचर व्हिलेज विकसित करण्यात आले आहे.

हॉट एअर बलून

स्काय वॉल्टझ कंपनीकडून लोणावळा येथे ६० मिनिटांची हॉट एअर बलून सफर घडविण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 2:21 am

Web Title: tourism sector mpsc exam
Next Stories
1 मुलींचे वसतिगृह
2 सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवरचे अभ्यासक्रम
3 यूपीएससीची तयारी : भूगोल आणि इतर विषयांचा सहसंबंध
Just Now!
X