20 January 2018

News Flash

एमपीएससी मंत्र : मानव संसाधन विकास समर्पक योजना – भाग २

विद्यार्थी पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न रु.६ लाखपर्यंत असावे.

रोहिणी शहा | Updated: August 9, 2017 4:04 AM

सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आखल्या जाणाऱ्या योजनांची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आखल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मागील लेखात आपण घेतली. यातीलच आणखी काही योजना.

*   भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

0 योजनेचा उद्देश – अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधित सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना आणि कागद, काच, पत्रा वेचकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

0 प्रवर्ग – ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.

0 लाभाच्या अटी / निकष  – उत्पन्नाची अट नाही. अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच, नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालिका आयुक्त/ उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्याकडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.

*  लाभाचे स्वरूप –

0     इयत्ता पहिली ते दुसरीपर्यंतच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु ११०/- व तदर्थ अनुदान रु ७५०/-

0     इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ११०/- व तदर्थ अनुदान रु. ७५०/-

0     इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ७००/- व तदर्थ अनुदान रु. १०००/-

*  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

योजनेचा प्रवर्ग – विमुक्त जाती व भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग

0   योजनेचा उद्देश – माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विजा, भज व विमाप्र प्रवर्गाच्य मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य शासनाने २००३-०४ या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना लागू केलेली आहे.

0  लाभाच्या अटी / निकष  – संबंधित

घटकांतील विद्यार्थिनीने शासनमान्य माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला असावा व ती इ. आठवी ते दहावीपर्यंत वर्गात नियमित शिकत असावी. उत्पन्नाची अट नाही.

0  लाभाचे स्वरूप –  इ. आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या या प्रवर्गातील विद्यार्थिनींना दरमहा

रु. १००/- या प्रमाणे १० महिन्यांसाठी रु. १०००/- एवढी शिष्यवृत्ती संबंधित शाळेमार्फत त्यांचे उत्पन्न व गुणांची अट लक्षात न घेता देण्यात येते.

* भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती –

* योजनेचा उद्देश – मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ही शिष्यवृत्ती दिली जाते.

* प्रवर्ग- अनुसूचित जाती व नवबौद्ध

*  लाभाच्या अटी / निकष  –

0     विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.

0     विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व त्यापुढील शिक्षण घेत असलेला असावा.

0     विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

*  लाभाचे स्वरूप  –

0     विद्यार्थ्यांस निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबींवरील शुल्क प्रदान.

0     अभ्यासक्रमाच्या वर्गवारीनुसार वसतिगृहात न राहणाऱ्यांना रु. २३० ते ४५० या दराने निर्वाह भत्ता.

0     वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३८० ते १२०० निर्वाह भत्ता.

*  अनुसूचित जाती व नवबौद्ध असलेल्या १०० विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती

*  योजनेचा उद्देश – अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी यासाठी देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या या घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

*  लाभाच्या अटी / निकष  –

0     विद्यार्थी पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न रु.६ लाखपर्यंत असावे.

0     या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत संबंधित विद्यार्थ्यांला प्रवेश मिळालेला असावा.

*  लाभाचे स्वरूप –

0  संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क

0  क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/-

First Published on August 9, 2017 4:04 am

Web Title: useful tips mpsc preparation
टॅग MPSC Preparation
  1. No Comments.