पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेत उपलब्ध असणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ या सत्राची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
शैक्षणिक अर्हता
कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्के) उत्तीर्ण. सहकार अथवा संबंधित क्षेत्रात काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव. त्याशिवाय त्यांनी सीएटी, एमएटी, एटीएमएल, सीएमएमटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
निवड पद्धती
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी, कामाचा अनुभव व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना १५ महिने कालावधीच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
 अर्जासह पाठवायचे  शुल्क
अर्जासह ५०० रु. चा ‘दि डायरेक्टर व्हीएमएनआयसीओएम यांच्या नावे असणारा व पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी  संस्थेच्या http://www.igrua.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने अर्ज करून अर्जाची प्रत डिमांड ड्राफ्टसह दि डायरेक्टर, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट विद्यापीठ मार्ग, गणेशखिंड, पुणे- ४११००७ या पत्त्यावर २४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत पाठवावी.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?