17 December 2017

News Flash

नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट, कानपूर येथील विविध अभ्यासक्रम

गुणांची टक्केवारी व प्रवेश परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

लोकसत्ता टीम | Updated: April 21, 2017 12:10 AM

 

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालय व अन्न आणि सार्वजनिक विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट, कानपूर येथील विविध अभ्यासक्रमांच्या २०१७ सत्रामध्ये खालीलप्रमाणे प्रवेश देण्यात येत आहेत.

  • शुगर टेक्नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध जागा ६९, अर्जदारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी अथवा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • शुगर इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध जागा २८, अर्जदारांनी मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा एएमआयई पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • इंडस्ट्रियल फर्मेटेशन व अल्कोहोल टेक्नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध जागा २८, अर्जदारांनी रसायनशास्त्र, अप्लाईड केमिस्ट्री, औद्योगिक रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री यासारख्या विषयांतील बीएस्सी किंवा बायोटेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग अथवा बायोकेमिकल इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील बीटेक पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • शुगरकेन प्रॉडक्टीव्हीटी आणि मॅच्युरिटी मॅनेजमेंटमधील पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध जागा १८, अर्जदारानी बीएस्सी अथवा बीएस्सी कृषी यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • इंडस्ट्रियल इन्स्ट्रमेंटेशन व प्रोसेस ऑटोमेशनमधील पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध जागा १५, अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन यासारख्या विषयातील पदवी अथवा एएमआयई यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • शुगर बॉइलिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम- अर्जदारांनी कृषी वा विज्ञान विषयांसह शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली त्यांना साखर कारखान्यातील प्रत्यक्ष कामाचा किमान एका हंगामाचा अनुभव असायला हवा.
  • निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ शुगर तर्फे निवड चाचणी घेण्यात येईल. ही निवड चाचणी देशांतर्गत निवड परीक्षा केंद्रांवर ३१ जून २०१७ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे केंद्राचा समावेश असेल. उमेदवारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क-अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी १००० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ८०० रु. चा) ‘डायरेक्टर, नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट’ यांच्या नावे असणारा व कानपूर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क-अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट कानपूरच्या दूरध्वनी क्र. ०५१२ २५७३६१३ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://nsi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्ट सह असणारे अर्ज डायरेक्टर, नॅशनल शुगर इन्स्टिटय़ूट, कल्याणपूर, कानपूर २०८०१७ या पत्त्यावर ५ मे २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

First Published on April 21, 2017 12:10 am

Web Title: various courses in national sugar institute kanpur