15 December 2017

News Flash

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम

राज्यातील विविध केंद्रांवर २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत.

लोकसत्ता टीम | Updated: August 10, 2017 1:26 AM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व विद्यापीठाच्या राज्यातील विविध केंद्रांवर २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम- समाविष्ट विषय- पूर्वतयारी शिक्षणक्रम, फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, अरबी, ब्यूटी पार्लर, शिवणशास्त्र, जलव्यवस्थापन, आरोग्य मित्र, रुग्ण साहाय्यक, बालसंगोपन आणि रंजन, आशययुक्त अध्यापन पद्धती, स्वयंसहायता गट प्रेरक/ प्रेरिका, शालेय स्तरावरील माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान, मूल्य शिक्षण, मानवी हक्क इ.

पदविका अभ्यासक्रम- समाविष्ट विषय- इलेक्ट्रिशियन अ‍ॅण्ड डोमॅस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स, सिव्हिल सुपरवायझर, इंटेरियर डिझाइन अ‍ॅण्ड डेकोरेशन, फिटर, सलून टेक्निशियन, फॅब्रिकेशन, कॉम्प्युटर हार्डवेअर, मेंटेनन्स, फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, मूल्य व आध्यात्मिक शिक्षण, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन, योगशिक्षक, डिप्लोमा इन लॅब टेक्नॉलॉजी, सहकार व्यवस्थापन, सहकार व्यवस्थापन (बँकिंग), गांधी विचार दर्शन, शालेय व्यवस्थापन इ.

पदवी अभ्यासक्रम- समाविष्ट विषय- बीए (मराठी, हिंदी व उर्दू माध्यम), बीए (वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन), बिलिव्ह व इन्फर्मेशन सायन्स, बी.कॉम (मराठी माध्यम), बी.कॉम (इंग्रजी माध्यम) बीए (ग्राहकसेवा) इ.

बी.एस्सी.- इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझाइन, हॉस्पिटॅलिटी स्टडीज अ‍ॅण्ड कॅटरिंग सव्‍‌र्हिसेस, हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम फॅसिलिटी सव्‍‌र्हिस, सिव्हिल प्रॅक्टिस, ऑटोमोटिव्ह स्टडीज, फायर अ‍ॅण्ड सेफ्टी स्टडीज, मीडिया ग्राफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन, इंडस्ट्रियल ड्रग सायन्स, अ‍ॅक्चुरियल सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, इंडस्ट्रियल सायन्स इ.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- समाविष्ट विषय- एमए (मराठी, हिंदी व इंग्रजी), एमलिब अ‍ॅण्ड आयएससी, फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग मॅनेजमेंट, एमए (शिक्षणशास्त्र), एम.एस्सी. (विषय संप्रेषण), एमए (विषय संप्रेषण), एम.कॉम., एम.एस्सी. (अ‍ॅक्युरियल सायन्स), एम.एस्सी. (गणित), एम.एस्सी. (पर्यावरण विज्ञान) इ.

अभ्यास पद्धती – वरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संबंधित विषयातील शिक्षणक्रमानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या दूरध्वनी क्र. ०२५३ २२३०५८० अथवा २२३००२४ वर संपर्क साधावा अथवा मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in अथवा http://ycmou.digitalunivercity.ac

या संपर्कस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१७ आहे.

First Published on August 10, 2017 1:26 am

Web Title: various courses of yashwantrao chavan maharashtra open university