कपडे शिलाई क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी व राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अॅपरल ट्रेनिंग अॅण्ड डिझाईन सेंटरद्वारा चालविण्यात येणाऱ्या व व्यवसायाभिमुख असणाऱ्या पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश संधी उपलब्ध आहेत.
पदविका अभ्यासक्रम- उपलब्ध अभ्यासक्रम- अॅपरल मॅन्युफॅक्चिरग टेक्नॉलॉजी, अॅपरल पॅटर्न मेकिंग अॅण्ड सीएडी, फॅशन डिझाइन टेक्नॉलॉजी व टेक्स्टाईल डिझाईन टेक्नॉलॉजी विषयांतर्गत पदविका अभ्यासक्रम.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम- उपलब्ध अभ्यासक्रम- अॅपरल पॅटर्न मेकिंग बेसिक, अॅपरल प्रॉडक्शन सुपरव्हिजन अॅण्ड क्वालिटी कंट्रोल, अॅपरल एक्स्पोर्ट मॅन्युफॅक्चरिंग व टेक्स्टाइल अॅण्ड गार्मेट टेस्टिंग अॅण्ड क्वालिटी कंट्रोल विषयांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. अथवा http://www.atdcindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्र. ०२२- ६५५५१४०७ अथवा ०७८४- १८१००२७ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख
महाराष्ट्रातील उमेदवारांनी दि अ‍ॅपरल ट्रेनिंग अ‍ॅण्ड डिझाइन सेंटर, एफ- २०१, दुसरा मजला, रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, सानपाडा, नवी मुंबई- ४००६०५ अथवा दि अ‍ॅपरल ट्रेनिंग अ‍ॅण्ड डिझाइन सेंटर, दुसरा मजला, यशवंत मंडळ, रविवार कारंजा, पंचवटी, नाशिक या पत्त्यांवर संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज २० जून २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
द. वा. आंबुलकर