वर्षभर नोकरीच्या पहिल्या वर्षांत वागण्याचे धडे देणारा, कार्यालयातील विविध समस्यांसाठी कानमंत्र देणाऱ्या या सदराला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आजच्या शेवटच्या लेखात नोकरी सोडण्याविषयी..

पाहता पाहता तुमच्या या पहिल्या नोकरीमध्ये एक वर्ष झाले की! नव्याची नवलाई सरून नोकरीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी स्थिरावला आणि सरावलासुद्धा असाल. आपण आयुष्यात काही तरी करून दाखवू शकू असा आत्मविश्वास पण आला असेल. तरीही मधूनच अपेक्षेप्रमाणे काहीतरी होत नाही असे वाटून जाते व नोकरी सोडायचे विचार मनात येऊ लागतात. परंतु हे विचार मनात का येत आहेत ते पुढील कारणांबरोबर ताडून बघा आणि मगच नोकरी बदलायचा निर्णय घ्या.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”

दररोज सकाळी कार्यालयात जाणे हे ओझे वाटायला लागले आहे व अजून एक दिवस कसा काढायचा असे दु:खीकष्टी विचार मनात येत आहेत.

सहकारी व वरिष्ठांचे विचार आणि वागणूक आवडत नाही, त्रासदायक वाटते.

दैनंदिन काम करताना सतत ताण जाणवतो, नकारात्मक विचार मनात येतात.

कामाच्या ताणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे.

कार्यालयीन वातावरण (corporate culture) व तुमच्यावर झालेले संस्कार यांचा ताळमेळ न बसल्याने तुम्हाला या कंपनीत जुळवून घेता येत नाही.

परिणामत: तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे व तुमच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग होईल असे कामच नाही किंवा हेतूत: तुम्हाला दिले जात नाही.

कार्य आणि आयुष्याचा समतोल (work-life balance)  साधता येत नाही.

तुमचे काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे किंवा काम वाढविण्यात आले आहे, पण ते करण्याची कौशल्ये तुमच्याकडे नाहीत, ते तुम्हाला झेपत नाही.

तेच तेच काम करावयाचा कंटाळा आला आहे; बढतीची/प्रगतीची शक्यता नाही, पगारातही वाढ होत नाही.

अकार्यक्षम व अकुशल सहकाऱ्यांना त्यांच्या इतर सबंधांमुळे बढती/प्रगतीची संधी दिली गेली आहे, आता कदाचित तेच तुमचे वरिष्ठ म्हणून काम करतील.

शाब्दिक गैरवापर, लैंगिक शोषण किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टींबद्दल तुम्हाला घृणा वाटते व त्यात तुम्ही सहभागी होत नाही.

तुमच्या कामासंबंधीच्या चांगल्या सूचनाही आता कुणी ऐकून घेत नाही; म्हणजेच तुमच्या शब्दाला आता काही किंमत राहिली नाही.

कंपनी डबघाईला आली आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे व्यवस्थापनच तुम्हाला काढून टाकेल किंवा तुम्हाला मनाविरुद्ध राजीनामा द्यावा लागेल.

प्रगतीपथावरील दुसऱ्या कंपनीमध्ये तुमच्या शिक्षण व कौशल्याला साजेशी वाढीव पगार/बढती देणाऱ्या नोकरीची संधी मिळते आहे.

वर दिलेल्यापैकी एका किंवा अनेक कारणांमुळे जरी तुम्ही नोकरी सोडणार असाल तरी नोकरी सोडण्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी पुढे दिलेली पथ्ये पाळा.

दुसऱ्या नोकरीचे नेमणूक पत्र हातात असल्याशिवाय सध्याची नोकरी सोडू नका. अर्थात त्याला काही अपरिहार्य परिस्थितीचा अपवाद.

राजीनामा द्यायच्या आधीच सध्याची व नवीन नोकरी यांच्या फायद्यातोटय़ाचा साधकबाधक विचार करा.

कंपनीच्या राजीनामा द्यायच्या अटीशर्तीचा सखोल अभ्यास करा; की जेणेकरून तुम्हाला राजीनाम्यानंतर योग्य वेळी व सर्व थकबाकी घेऊनच बाहेर पडता येईल.

राजीनाम्यासंबंधी सर्वप्रथम वरिष्ठांना विश्वासात घेऊन सांगा, सहकाऱ्यांना नंतर. कंपनीच्या अटीशर्तीप्रमाणे योग्य त्या दिवसांची राजीनाम्याची सूचना द्या.

तुम्ही ही कंपनी सोडल्यानंतर दुसऱ्या कुठल्या कंपनीत जाणार किंवा पुढे काय करणार हे सांगायचे कुठल्याही प्रकारचे नैतिक/कायदेशीर बंधन तुमच्यावर नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दडपणाला बळी पडू नका.

परंतु जे कारण कंपनीमध्ये एका सहकाऱ्याला सांगाल, तेच सर्वाना सांगा, म्हणजे कुठल्याही टवाळगप्पांना थारा मिळणार नाही.

मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून कंपनी सोडण्याच्या सर्व औपचारिकता – जसे तुमचे काम कुणाकडे सोपवायचे, तुमच्याकडे असलेली कंपनीची मालमत्ता परत करणे, इत्यादी नीट पूर्ण करा. त्याचबरोबर कंपनी सोडण्याचे (leaving certificate), थकबाकी नसल्याचे (no dues certificate), अनुभवाचे (experience certificate) अशी प्रमाणपत्रे न चुकता गोळा करा. ही प्रमाणपत्रे तुम्ही काम केल्याचा पुरावा म्हणून आयुष्यभर बाळगायची आहेत.

कंपनीने दिलेल्या संगणकावरील/मोबाइलवरील व इतर वैयक्तिक संदर्भाचे मेसेज, फाइल्स व कॉन्टॅक्ट लिस्ट व कागदपत्रे नष्ट करा.

नोकरी सोडताना सर्व वरिष्ठ व सहकाऱ्यांचा सौहार्दपूर्ण व कृतज्ञतापूर्वक निरोप घ्या, कारण जग छोटे आहे व हीच माणसे तुम्हाला भविष्यात वेगळ्या भूमिकेत भेटू शकतात.

बऱ्याच कंपनीत आता जातानाची मुलाखत (Exit interview) घेतली जाते. त्याला सावधपणे सामोरे जा. कुठलीही वैयक्तिक / विभागावरची टीकाटिप्पणी टाळा. जे तुम्ही इतक्या दिवसांत सांगू शकला नाहीत; ते आत्ता सांगण्याची गरज व कडवटपणा निर्माण करायची अजिबात गरज नाही.

नोकरीच्या या पहिल्या वर्षांत तुम्ही बरेच काही आत्मसात केले आहे, त्याचा तुम्ही भविष्यातही खूप चांगला उपयोग करून घ्या.

dr.jayant.panse@gmail.com