आज कुटुंबात इंटरनेट गरजेचे झाले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरातील कॉम्प्युटर आणि मोबाइल फोन वापरत असतो, विशेषत: लहान आणि महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी याचा जास्त वापर करतात. सध्या घरात वायफायचा वापर वाढला आहे. वायफायमुळे घरातून कोठूनही, आपले कुटुंबीय इंटरनेटवर जाऊ शकतात.

संभाव्य धोके

  • नेट आणि त्यावरील माहितीवर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी अवघड असते. हे कनेक्शन पुरेसे सुरक्षित नसले तर नेटवरचे घुसखोर आपली बॅण्डविड्थ वापरण्याची शक्यता असते
  • आपल्या उपकरणांमध्ये मालवेअर (घातक सॉफ्टवेअर) टाकून आपल्या नेटच्या सुरक्षेवर हल्ला करण्याची शक्यता असते.
  • याशिवाय इतरांच्या सिस्टीम्स किंवा संसाधनांवर हल्ला करण्यासाठी ते आपल्या सिस्टीमचा किंवा उपकरणाचा वापर करू शकतात.

घ्यायची काळजी

  • मूळ (डीफॉल्ट) डॉमिन पासवर्ड बदलून त्याजागी अधिक सुरक्षित पासवर्ड घाला.
  • आपले वायफाय उपकरण अत्यंत सुरक्षित असल्याची खात्री करा.
  • आपल्या राऊटरवर पोचण्यासाठी गुंतागुंतीचा पासवर्ड वापरा.
  • अपरिचित व्यक्तींना आपले नेटवर्क वापरता येऊ नये यासाठी वायरलेस एन्सिक्रिप्शन सक्रिय करा.
  • काही विशिष्ट उपकरणांनाच आपल्या वायरलेस नेटवर्कवर पोचण्याची परवानगी द्या. नेटवर्कशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक उपकरणाला एक अद्वितीय असा मीडिया अ‍ॅक्सेस कंट्रोल अ‍ॅड्रेस दिलेला असतो. त्यांचाच वापर करा.
  • अयोग्य मजकूर असलेल्या तसेच गरज नसलेल्या वेबसाइट्सपासून दूर राहण्यासाठी फिल्टर्सचा वापर करा.