13 December 2017

News Flash

युवा विकास निधी

व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 29, 2017 1:06 AM

भारतात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ४० टक्के लोकसंख्या युवकांची आहे. महाराष्ट्र राज्य युवा धोरणाअंतर्गत युवकांमधील ऊर्जेचा विधायक उपक्रमांसाठी उपयोग करून घेणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, त्यांना कर्तव्याची जाणीव करून देणे, जागतिक स्तरावरील ज्ञान उपलब्ध करून देताना त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. युवक कल्याणविषयक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा विकास निधी स्थापन करण्यात आले आहे.

उद्देश व उपक्रम

  • या निधीच्या माध्यमातून युवा आणि युवा संस्थांना कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी आणि या क्षेत्रातील संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करण्यात येते.
  • युवक कल्याण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या युवांना अधिक कार्य करण्याकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • विशेष उपक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्था, शासकीय-निमशासकीय विभाग आणि स्थानिक स्वायत्त संस्थांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
  • युवक कल्याण क्षेत्रात संशोधन किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे प्रशिक्षण आदी बाबींसाठीदेखील सहकार्य करण्यात येते.

पात्रता

राज्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेली संस्था आर्थिक साहाय्यास पात्र राहतील. तसेच महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र धारण करणारे १५ ते ३५ वयोगटातील युवादेखील आर्थिक साहाय्यास पात्र राहतील.

अर्ज प्रक्रिया

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अशा स्वरूपाच्या साहाय्यासाठी अर्ज करावा लागेल. क्रीडा संचालनालयाद्वारे या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर राज्य युवा विकास निधी संनियंत्रण समितीकडे हे अर्ज पाठवण्यात येतील. या अर्जावर र्सवकष विचार करून अर्ज मंजूर केला जाईल.

First Published on September 29, 2017 1:06 am

Web Title: youth development fund