सकाळी उठल्यावर दोन तासांपर्यंत आपली ग्रहणशक्ती तीव्र असते. त्यानंतर मात्र ती क्षमता कमी होत जाते. सकाळच्या अशा या महत्त्वपूर्ण वेळात काय घडायला हवं? संपूर्ण दिवसभराच्या आपल्या मानसिक व शारीरिक प्रवासासाठी ज्या सकारात्मक सूचना आवश्यक आहेत त्या सुप्त मनात निर्माण करणं गरजेचं असतं. त्यासाठी काही क्षण अंतर्मुख होऊन स्वत:शीच बसायला हवं.
सकारात्मक विचारांचा समावेश आपल्या जीवनपद्धतीत व्हावा यासाठी अनेक चर्चासत्रं, व्याख्यानं भरवली जातात. अनेक लेखकांचे या विषयावरचे साहित्यही वाचले जाते. आपण सर्वजण त्याचे महत्त्व जाणतोही. पण तरीही त्या पद्धतीने वागणं मात्र अनेकांना जमत नाही. कारण मनातील विचारांचा नेमका स्रोत वा मूळ काय आहे हेच आपल्याला ठाऊक नसते. आपण फक्त दिवस जसा समोर येतो तसा तो घेतो आणि रात्र झाली की झोपून जातो. मनाला जाणीवपूर्वक सकारात्मक विचार करायला लावणं हे आपल्याला माहीतच नसतं. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नसतात.
आपण वाचत असलेली वर्तमानपत्रं, पुस्तकं, मासिकं, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, चित्रपट, संगीत, आपला मित्र परिवार-नातेवाइकांशी संवाद या सर्व गोष्टींपासून आपल्या मनात अनेक विचार निर्माण होतात. त्यातूनच आपल्या भोवतीचं जग तयार होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्र वाचण्याची किंवा दूरचित्रवाणीवरील, आकाशवाणीवरील बातम्या (जगभरातील विविध घडामोडी) ऐकण्याची सवय असते. जेव्हा आपली झोप पूर्ण होते तेव्हा बाह्य़ मन (conscious mind) एकदम शांत असतं व सुप्त मन (unconscious mind) अधिक सक्रिय असतं. एखाद्या टिपकागदाप्रमाणे ते सगळ्या सकारात्मक किंवा नकारात्मक सूचना आत सामावून घेत असतं. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की सकाळी उठल्यावर दोन तासांपर्यंत आपली ग्रहणशक्ती तीव्र असते. त्यानंतर मात्र ती क्षमता कमी होत जाते. सकाळच्या अशा या महत्त्वपूर्ण वेळात काय घडायला हवं?
संपूर्ण दिवसभराच्या आपल्या मानसिक व शारीरिक प्रवासासाठी ज्या सकारात्मक सूचना आवश्यक आहेत त्या सुप्त मनात निर्माण करणं गरजेचं असतं. त्यासाठी काही क्षण अंतर्मुख होऊन स्वत:शीच बसायला हवं. पण नेमकं या महत्त्वाच्या वेळेत काय घडतं? सकाळच्या  घरातल्या कामाचा ताण किंवा दूरचित्रवाणीवरच्या सकाळच्या बातम्यांमध्ये अपघात, खून, हिंसाचार, निसर्गाचा प्रकोप, एखाद्या ठिकाणी उद्भवलेली पूरसदृश परिस्थिती, दहशतवाद तर वर्तमानपत्रात अमुक एका ठिकाणी असं झालं, तमुक एका ठिकाणी काही घोटाळा झाला. कुणातरी वयस्कर व्यक्तीची निर्घृण हत्या झाली. अशा नकारात्मकता वाढवणाऱ्या सूचनांचा स्वीकार नेमका या वेळी या सुप्त मनात होतो. सकाळी सकाळी वाचलेलं-ऐकलेलं संपूर्ण दिवसभर डोक्यात राहतं. म्हणूनच परिस्थिती कुठलीही येवो, प्रथम नकारात्मक विचारच मनात येतील. उदा. मी ऑफिसातून घरी पोहोचले, वा मी घरीच आहे. नेहमीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ लोटला तरी नवरा घरी आलेला नाही. आपण दूरध्वनीद्वारे त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, पण तो फोन उचलत नाही. अशा वेळी सहजपणे पहिला विचार येतो, अपघात तर झाला नसेल ना? त्याचं काही बरं-वाईट तर झालं नसेल ना?
एखादी घटना घडली की मन आधी वाईटच का विचार करतं?  तेही इतकं की ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ इतक्या टोकाचं का असतं? याचं कारण सकाळपासून किंवा त्याही आधीपासून आपल्या मनात असणारे नकारात्मक विचार. जे कळत नकळत आपणच कायम स्वत:बरोबरच घेऊन चालत असतो. कारण ते सुप्त मनात अडकून राहिलेले असतात.
सुप्त मन हे एखाद्या बागेसारखं असतं. आपण जर का चांगलं बी पेरलं तर निश्चितच आपली बाग चांगली फुलते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्त मन हे जागृत मनापेक्षा खूपच सामथ्र्यवान असते. त्यामुळे तिथे चांगलं बीज पेरायचं की तण माजू द्यायचं हे आपलं आपण ठरवायला हवं.
आपलं मन स्वस्थ नाही हे जाणून घ्यायचा एक सोपा मार्ग म्हणजे सकाळी तुमच्या नेहमीच्या वेळेवरची उठण्याची अवस्था. तुम्हाला नेहमीच्या वेळेवर आपणहून जाग येते का? जर ती जाग येत असेल तर तुमची झोप पूर्ण झाली असं समजायचं. पण जर पाच मिनिटं झोपूया म्हणत झोपून राहिलात तर त्याचा अर्थ तुमचं मन स्वस्थ नाही. मनाला आणखी विश्रांतीची आवश्यकता आहे, असा याचा अर्थ होतो.
इथे हे समजून घेणं अतिआवश्यक आहे की दिवसाच्या सुरुवातीइतकंच महत्त्व रात्री झोपण्यापूर्वी आपण करीत असलेल्या विचारांनाही आहे. मनोरंजन म्हणून विविध वाहिन्यांवरून जे कार्यक्रम प्रसारित केले जातात त्यात भीती, नातेसंबंधातील अविश्वास, कौटुंबिक द्वेषभाव, हेवेदावे, काही गोष्टींचे अतिरंजित चित्रण हे सर्व काही दाखवले जाते. बऱ्याच अंशी त्यात दु:खद घटना, भावनिक गुंतागुंतीचा तिढा दाखवलेला असतो. आपण तेच विचार मनात राहून जातात आणि त्याच मानसिक अवस्थेत आपण झोपतो. अलीकडे तर दिवसभराचे श्रम, थकवा कितीही असला तरीही रात्री झोपण्याच्या आधी थोडा वेळ इंटरनेटवर अनेक गोष्टी पाहिल्या, वाचल्या जातात. ‘व्हाट्सअ‍ॅप’वर चॅट केलं जातं. आजच्या चकचकीत दुनियेनं सर्वाना अशी भुरळ घातलीय की मनुष्य स्वत:विषयी विचारच करत नाही. फक्त काहीतरी बघत असतो. मनोरंजनाच्या मस्तीत तो स्वत:ला विसरतो आहे. जीवनात मनोरंजन आवश्यक आहेच पण किती? समजा, एखाद्याने जेवताना लोणचं किंवा चटणीएवढा भात आणि भाताएवढी चटणी किंवा लोणचं खाल्लं तर चालेल का?
म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी मनामध्ये चाललेल्या गोंधळाला, काही अप्रिय विचारांना, तणावांना तिथेच थांबून ठेवलं पाहिजे.  काही प्रश्नांवर शांतपणे विचार करून त्याविषयी सकारात्मक विचार करायला हवा. जाणीवपूर्वक नकारार्थी विचार काढून टाकले आणि मग तुम्ही झोपलात तर तुम्ही सकाळी शरीराइतकचं ताजेतवाने होऊन उठाल यात शंका नाही.
वैज्ञानिक थॉमस अ‍ॅल्वा एडिसन यांना ऐकू जरा कमी यायचे. ज्यांना कानांनी कमी ऐकू येतं त्यांची जीभदेखील कमीच चालते. एक दिवस त्यांचे मित्र त्यांना गमतीने म्हणाले, तुम्हाला परमेश्वराबद्दल तक्रार असेल ना, कारण त्याने तुम्हाला बुद्धी तर संपूर्ण दिली, पण ऐकण्याची शक्ती मात्र कमी दिली. तेव्हा एडिसन हसून म्हणाले, ही तर भगवंताची मोठी कृपा आहे. कारण जर मी दुनियेतील लोकांचंच ऐकत राहिलो असतो तर मी भरकटलो असतो. मी आपल्या अंतरीचा आवाज ऐकला व म्हणूनच मी हे यश मिळवलं.
म्हणूनच आपला अंतरीचा आवाज सजगपणे ऐकणं, त्याला चांगल्या, सकारात्मक गोष्टी पाहण्याची, ऐकण्याची, बोलण्याची सवय लावणं, सकारात्मक चिंतनाची सवय लावणं अधिक फायदेशीर होईल.
जेव्हा आम्ही प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात येतो तेव्हा आम्हाला यासाठी वेगळी मेहनत करावी लागत नाही. कारण येथे आम्ही दिवसाची सुरुवातच मुळी मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टींनी करतो. या आध्यात्मिक ज्ञानाचे शक्तिशाली सकारात्मक शब्द सुप्त मनात श्रेष्ठ, सुंदर विचार निर्माण करतात. त्यामुळे मन दिवसभर प्रसन्न राहतं. म्हणूनच स्वत:साठी द्या काही वेळ. शांत मनासाठी गरज आहे ती सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी मन एकचित्त करण्याची, मन स्थिर करण्याची व अंतर्मुख होऊन विचार करण्याची. सगळ्या वाईट, अप्रिय घटना मनातून काढून टाकून येणाऱ्या दिवसाचं स्वागत आपण कसं करणार हे ठरवण्याची. मन शांत असेल तर काहीही शक्य आहे, कारण हे तुम्ही जाणताच- As you think, so you become.
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद.)

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा