28 November 2020

News Flash

चोवीस तास राहा फिट

भारतात आपण साडेतीन मुहूर्त मानतो. साडेतीन देवीची शक्तिपीठे आहेत. संगीताची सप्तकं साडेतीन आहेत. साडेतीन हाताचा मानवी देह आहे.

| January 10, 2015 01:03 am

भारतात आपण साडेतीन मुहूर्त मानतो. साडेतीन देवीची शक्तिपीठे आहेत. संगीताची सप्तकं साडेतीन आहेत. साडेतीन हाताचा मानवी देह आहे. त्या मानवी देहात नांदणारी आध्यात्मिक कुंडलिनी शक्ती जिला ओम्काराची जन्मभूमी म्हणून संबोधले आहे, ती तेजाची शिदोरी आहे. ती सíपणीसारखी साडेतीन वेटोळे घालून मुलाधार चक्रावर सुप्तावस्थेत आहे तर जागृत झाल्यावर नाभीस्थित मणिपूर चक्रापाशी तिचे उत्थापन होते.
 संत ज्ञानेश्वरांच्या श्रीज्ञानेश्वरी ग्रंथातील प्रत्येक ओवीचे चरणही साडेतीनच आहेत  आणि देवाची पावलेही साडेतीनच संबोधली आहेत. ओमकार हे त्रलोक्यातील आत्मरूप नादचतन्यच आहे. त्याच्या साडेतीन मात्रांचा विचार करता त्यामध्ये अकार, उकार व मकार ह्य़ांच्या प्रत्येकी एकेक व िबदूमात्रा अर्धी असा हा साडेतीन मात्रा दर्शविणारा, ओम् हा एकच नाद, उच्चारणात जिभेचा अडथळा नसलेला नाद आहे. बाकी सर्व विश्वातील शब्द, नाद अडथळयांचेच आहेत. त्यामुळे कोणाही व्यक्तीचे वर नमूद केल्याप्रमाणे सर्वागीण आरोग्य हे परमशुद्ध सहजता व परमशुद्ध लयबद्धता यावरच अवलंबून आहे जे शास्त्रशुद्ध ओमकार साधनेतून घडते. ज्याच्या जीवनात सहजता, स्वस्थता व ज्याच्या जीवनात लय त्याला निश्चित जय मिळतो. म्हणूनच नित्यनेमे शास्त्रशुद्ध ओमकार साधना वीस मिनिटे केली तर चोवीस तास आपला देह, मन आणि सर्वागीण जीवनाची स्वस्थतेकडची, आरोग्याकडची वाटचाल सुरू होते, त्यासाठीच म्हणावेसे वाटते की,
‘ओमकार साधना नित्यनेमे २० मिनिटे करा नीट, चोवीस तास राहा फिट.’ कशी करायची ही साधना ते यापुढील अंकातून पाहाणार आहोत.
डॉ. जयंत करंदीकर

* आपण सामान्यपणे वर्तमानाचा विचार करून जगतो. पण प्रगतिपथावर जायचे असेल तर भविष्याचा वेध घ्यायला शिकले      पाहिजे. आजचे भविष्य हे उद्याचे वर्तमान असते आणि परवाचा भूतकाळ होत असते. हे लक्षात घेऊन आपण         आपली वाटचाल ठरवली तर प्रवास अधिक आनंददायी आणि योग्य दिशेत होतो.   -अज्ञात                                                                                                               
अनुभव म्हणजे तुमच्या आयुष्यात काय होते ते नव्हे, तर आयुष्यात जे काही होते त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देता ती         वृत्ती आणि त्यामागील विचारप्रक्रिया म्हणजे अनुभव. -अ‍ॅडॉल्स हग्जले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:03 am

Web Title: be fit 24 hours
टॅग Fitness,Gym
Next Stories
1 घरच्या घरी भाजीबाग
2 ब्रोकोली
3 ‘ड्राय क्लिन’ घरच्या घरी
Just Now!
X