केशरी-गुलाबी रंगाची गाजरं नुसती दिसायलाच मोहक असतात असं नाही तर अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत. गाजरातल्या बीटा कॅरोटिनमुळे ते डोळ्याचं संरक्षण करतं, म्हणूनच गाजराला आयुर्वेदात नेत्ररजनी म्हटलं जातं. पचनशक्ती वाढवणारं, हृदयाला बल देणारं गाजर खाल्लय़ामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. वृद्धत्वाच्या लक्षणांना दूर ठेवायला ते मदत करतं, मेंदूची शक्ती वाढवतं, मूत्रविकार आणि मलावरोध दूर ठेवतं. गाजर कच्चं तसंच शिजवूनही खाता येतं, गाजर कच्चं खाल्ल्यामुळे दाताचं आरोग्य सुधारतं. गाजर सोलून खाऊ  नये, फक्त मुळे काढावीत. गाजर हलवा, गाजराची कोशिंबीर यासारखे चविष्ट पदार्थ गाजरापासून बनवता येतात.
गाजराची पानगी
साहित्य- एक वाटी गाजराचा कीस, १/२ वाटी तांदळाचं पीठ, १ मोठा चमचा बारीक रवा, १/२ वाटी दही, पाव वाटी गूळ, चवीला मीठ, चिमूटभर जायफळ, चिमूटभर बेकिंग पावडर आणि १ चमचा तूप.
कृती- सर्व साहित्य एकत्र करून सैलसर पीठ भिजवावं. केळीच्या पानाच्या एका तुकडय़ाला तूप लावून तो तापलेल्या तव्यावर ठेवावा. त्यावर दोन मोठे चमचे पीठ पसरावं. वर केळीचं पान ठेवावं, खालचं पान भाजलं गेलं की उलटावं म्हणजे दुसरी बाजू भाजली जाईल.
गाजराऐवजी केळ्याचा गर, काकडीचा, भोपळ्याचा कीस घालता येईल. आणि खमंग पानगे खाता येतील.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
meaning and significance of holi colors
Holi 2024: होळीला उधळा लाल, पिवळा निळा रंग! मात्र त्याआधी रंगांचे जाणून घ्या ‘हे’ अर्थ…
Loksatta samorchya bakavarun IT CBI ED Polling stations EVM election
समोरच्या बाकावरून: थोडे थांबा.. धीर धरा ‘अच्छे दिन’ येतच आहेत..