माझे मन परिस्थितीच्या अधीन होते. परिस्थितीला मी अधीन करू शकत नाही, हे सत्य आहे. आणि यावर आपली प्रतिक्रियाही अशी असते की हे तर स्वाभाविकच आहे. जसजशी परिस्थिती, जसजशा व्यक्ती बदलत जातील तसेच माझे विचार, माझ्या भावनाही तद्नुसार बदलत जातील. म्हणूनच आपल्याला कधी आनंदाची जाणीव होते, तर कधी दुखाची. यातून आनंदाची अनुभूती मिळेल?
ज गण्यातल्या अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊनही आपला आनंद मात्र दिवसेंदिवस कमी-कमी होत चालला आहे. सगळीकडे हेच चित्र दिसते आहे. आपण एका क्षणांत आनंद अनुभवतोही व दुसऱ्याच क्षणांत नराश्याने ग्रासतोदेखील. तरीही पुन्हा आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. का हा आनंद स्थायी स्वरूपात आपल्याजवळ राहत नाही?
 सदासर्वकाळ आनंदी राहायचं असेल तर त्याच्या मुळापर्यंत जायला हवं. म्हणूनच या सदरातून आपण जाणून घेणार आहोत की आनंद म्हणजे काय? त्याचा स्रोत कुठे आहे, त्या स्रोताला जाणून घेऊन या आनंदाला आपल्या आयुष्यात स्थिर करायचं आहे. समजा, तुम्ही दूरचित्रवाणी पाहत आहात. त्यावर तुमच्या आवडीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेत आहात आणि अचानक वाईट बातमी सांगणारा फोन आला तर तुमची पुढची प्रतिक्रिया काय असते तर तुमचं त्या कार्यक्रमातून लक्ष उडतं. याचा अर्थ आनंद त्या कार्यक्रमात होता का? निश्चितच नाही, तर मनात आनंद असल्याने कार्यक्रम पाहण्यात आपणांस सुख वाटत होतं. पण दुसऱ्याच क्षणी दुखाच्या बातमीने मनातील आनंद विरून गेला. म्हणजेच आपले ‘मन’ हे आनंदाचं उगमस्थान आहे.
संपूर्ण दिवसभरात एकामागून एक परिस्थितींची अनेक चक्र आपणासमोर उभी राहतात. जसे कुठलासा चित्रपट चालू आहे. एका दृश्यानंतर दुसरे दृश्य. काही दृश्यं मला आवडतात, काही दृश्यं मला नाही आवडत. तसेच त्यातील काही व्यक्ती मला आवडतील, काही नाही. याचे मुख्य कारण आमचा आनंद हा व्यक्ती, वस्तू व परिस्थितीवर आधारलेला असतो.
एक असे दृश्य आले, आपली मुलं वेळेवर उठलीत. तयार झालीत व शाळेतही व्यवस्थित गेलीत त्यामुळे मला आनंद मिळाला. दुसरे दृश्य- मुले वेळेवर तयार झालीत, पण त्यांना घ्यायला बस आली नाही  म्हणून मला माझी गाडी काढण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला. त्यामुळे थोडीशी नाराजी, थोडीशी चिडचिड झाली. ‘या बसवाल्यांना काही कळतच नाही. येणार नसतील तर आधी तशी सूचना द्यायला नको का. म्हणजे कुणीही त्या तयारीत राहू शकतो.’ एकामागून एक व्यर्थ विचारांचे कोश तयार होत जातात. पहिले दृश्य -यात खूप आनंद मिळाला  दुसऱ्या दृश्यामध्ये मात्र आनंद नाहीसा झाला. पुन्हा आणखीन एक दृश्य- मुले वेळेवर शाळेत पोहचली, पण गृहपाठाची वही घरी विसरली. पुन्हा चिडचिड. ‘या मुलांना थोडेदेखील जबाबदारीने वागता येत नाही. सगळीकडे काय आम्हीच लक्ष द्यायचं़? आमच्या लहानपणी आम्ही नव्हतो असे,’ वगैरे वगैरे. पुन्हा निर्थक बडबड. याच्यामुळे एक तर वेळ वाया जातो व शक्तीही वाया जाते.
 माझे मन परिस्थितीच्या अधीन होते. परिस्थितीला मी अधीन करू शकत नाही, हे सत्य आहे. आणि यावर आपली प्रतिक्रियाही अशी असते की हे तर स्वाभाविकच आहे. जसजशी परिस्थिती, जसजशा व्यक्ती बदलत जातील तसेच माझे विचार, माझ्या भावनाही तद्नुसार बदलत जातील. म्हणूनच आपल्याला कधी आनंदाची जाणीव होते, तर कधी दुखाची. आणि आम्ही हे सहजपणे स्वीकारतो आणि म्हणतो, की जीवन तर असंच आहे. आपण आपली मनाची शक्ती परिस्थितीला देत गेलो, परिस्थिती दिवसेंदिवस आव्हानात्मक होत गेली, सशक्त होत गेली. याचाच अर्थ परिस्थितीला आपण बलवान बनविले व आपण स्वत मात्र कमजोर झालो. यातून आनंदाची अनुभूती मिळेल? निश्चितच नाही. अशा प्रकारच्या मनस्थितीमुळे जीवनातील स्थर्य कमी झाले व अशांतता वाढली. आता पुन्हा जीवनाकडे एक नजर टाकू या. एक छान जोडपं. दोघेही नोकरी करणारे. महिन्याला एक ठरावीक रक्कम घरात येतेच. टू रूम किचनचा फ्लॅटही आहे. दोघांकडे स्वतच्या गाडय़ा आहेत. सर्व सुखं अगदी हात जोडून उभी आहेत. तरीही ते आनंदी नाहीत. याच्यापेक्षा खरे तर अधिक काय हवे? तरीही अंतर्मनात कसलेसे अधुरेपण आहे. पुन्हा प्रश्न उठतो, आमचा आनंद कोठे आहे?
आपल्याला हे माहीत आहे की शरीराला वेळेवर जेवण दिले पाहिजे. आपण एक दिवस, दोन दिवस जेवण सोडू शकतो. जास्त दिवस नाही. कधी कधी आपण धावता धावता खातो, कधी उघडय़ावरचे अन्नही खातो. काही दिवस उपवासही करतो. किती दिवस उपवास करणार? तुम्हाला अन्न तर घ्यावेच लागेल. कारण तुम्हाला हे माहीत आहे की, जीवन चार दिवसांचे नाही. ती एक मोठी यात्रा आहे. आणि या यात्रेत तग धरल्याशिवाय पर्याय नाही. कारण शरीर स्वस्थ राहण्यासाठी अन्नाची गरज आहे. नाही तर जीवनच संपून जाईल. आपली तब्येत चांगली असेल तरच आपण काम करू शकतो. पण शारीरिक स्वास्थ्याला जसे महत्त्व देतो तसे महत्त्व मानसिक स्वास्थ्याला देतो का? जर आपण मानसिक स्वास्थ्याला ही शारीरिक स्वास्थ्याइतकेच महत्त्वाचे समजू, तेव्हाच हा जीवनप्रवास व्यवस्थितरीत्या चालू शकेल व आपल्याला आनंदही मिळेल.
डॉक्टरदेखील आपल्याला सांगतात की शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असेल तर बाहेरील वातावरणाचा लागलीच शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला काही आजारदेखील होतात. त्याचप्रमाणे मानसिक प्रतिकारशक्ती कमी असेल तर बाहेरील परिस्थिती, वेगवेगळ्या घटनांचा आपल्या मनावर विपरीत परिणाम होणारच. शरीराची प्रतिकारशक्ती कशी बरं वाढेल? जर शरीराला पौष्टिक आहार वेळच्या वेळी मिळाला, शरीराला गरजेइतका आराम मिळाला व शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाची जोड असेल तर निश्चितच परिणाम होईल. आता मानसिक प्रतिरोधकशक्ती कशी बरं वाढेल? आपल्या शरीराला आवश्यकता असते स्थूल अन्नाची आणि मनाच्या बाबतीत म्हणाल तर मनाला गरज असते शुद्ध विचारांच्या भोजनाची. जसे शरीराला आराम हवा असतो तसाच आराम मनालाही हवा असतो. तसे शरीराला व्यायामाची गरज तशी मनालाही गरज असते व्यायामाची. अर्थात सकारात्मक चिंतनाच्या व्यायामाची.
आता समजा, पाच मिनिटांपूर्वी मला समजले की मुलांना शाळेत सोडायला जायचे आहे. त्यावेळेला मी शांत राहिले, स्थिर राहिले तर खूप गोष्टी सोप्या होतील. मला शाळेत सोडायला जायचेच आहे. गाडी पण मलाच चालवायची आहे. हे एकदा नक्की झालं की मग चिडचिड कशाला? गाडी आपण कुठल्या स्थितीत चालवणार? दुखी होऊन की आनंदी राहून? आपल्यासमोर येऊ घातलेली परिस्थिती व आपले मानसिक स्वास्थ्य दोघेही वेगळे नाहीत. यांचा खरे तर एकत्र संयोग आहे. जर मी सक्षम असेन तरच मी परिस्थिती नीट हाताळू शकते. आणि तेही आनंदी राहून, परंतु आपण आधी ही परिस्थिती स्वीकारायला तयार नसतो. नंतर तिचे निवारण कसे करता येईल हे पाहतो. मनाचा विचार, ते शांत ठेवण्याचा विचार आपण नंतर करतो. त्यामुळे परिस्थिती मनाचा ताबा घेते आणि आपण आनंदापासून दूर जातो.
 मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वि मोलाची
 तू चाल पुढं तुला रं गडय़ा भीती कोणाची
 मराठी चित्रपटातील गीत यातही शुद्ध मनाबद्दल वर्णन केले आहे. शुद्ध मन म्हणजे असं मन ज्यात कुठल्याही चुकीच्या व्यर्थ विचारांना जागा नाही. केवळ सकारात्मक विचार व स्वतबद्दल व सर्वाबद्दल शुभ भावनाच आहेत. म्हणूनच तर संत महात्मे म्हणून गेलेत, मन करा रे प्रसन्न, आनंदाचे डोही आनंद तरंग, ही अवस्था आपणापासून दूर नाही. चला तर मग या अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला. कारण आपणच आहोत आपल्या आनंदाचे रचनाकार.  
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?