दक्षिण दिल्लीतील मुलांचा ‘इन्स्टाग्राम’वरील नुकताच उघडकीस आलेला ‘बॉइज लॉकर रूम’ हा ग्रुप, त्यावरील मुलींविषयीच्या विकृत चर्चेमुळे अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.  मुला-मुलींच्या लैंगिक जाणिवांपासून पालकत्वाच्या आव्हानापर्यंत आणि मुलांवरील गुन्हेगारीच्या सावटापासून इंटरनेटच्या व्यसनाधीनतेपर्यंत अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात खदखदत आहेत. या प्रश्नांचा वेध घेणारे आणि शालेय वयातल्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वानाच कवेत घेणारं इंटरनेटचं मोहमयी जाळं कसं भेदता येईल, या विषयावर वेबसंवाद पहिल्या ‘चतुरंग चर्चा’ या ‘लोकसत्ता’च्या नव्या उप्रकमात.

सहभाग नोंदणीसाठी

http://tiny.cc/Loksatta_ChaturangCharcha

अधिक माहिती http://loksatta.com/ या संकेस्थळावर.

गुरुवार, २१ मे २०२०

संध्याकाळी ५ वाजता.

सहभागी तज्ज्ञ

डॉ. राजन भोसले  मानसोपचारतज्ज्ञ,

लैंगिकविषयक तज्ज्ञ

डॉ. शुभा थत्ते

मानसशास्त्रज्ञ

उन्मेष जोशी

सहसंस्थापक,

रिस्पॉन्सिबल नेटिझम