दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांची नावडतीची असली तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने ती पथ्याची सर्वश्रेष्ठ भाजी आहे. आजाऱ्यालाही पचेल अशी ही भाजी पोटाला थंडावा देते, लहानापासून वृद्धांपर्यंत, आजाऱ्यांपासून निरोगी माणसांपर्यंत सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणारी ही भाजी थोडी मिळमिळीत म्हणून दुर्लक्षिली जाते. यकृताच्या कोणत्याही विकारांवर दुधी भोपळा गुणकारी ठरतो. मूत्राशयाच्या विकारांवर दुधीचा रस उपयुक्त आहे. या रसाने तहान तर भागतेच शिवाय थकवा जाणवत नाही. यात जीवनसत्त्व ब, क, यांचा भरपूर अंश असून कोलेस्टेरॉल अजिबात नाही. दुधी हलवा, बर्फी सगळ्यांच्या आवडीची असते. मुठिया, कोफ्ते, रायतं अशा खाद्यपदार्थांद्वारे दुधी भोपळा पोटात जाईल, असं बघायला हवं.
दुधी इडली-
साहित्य : २ वाटय़ा दुधीचा कीस, १ वाटी इडली रवा, अर्धी वाटी ओट्स, एक वाटी दही, १ चमचा आलं-मिरचीचा ठेचा, १ चमचा तेल, १/२ चमचा जिरं, चवीला मीठ, १ चमचा इनोज फ्रूट सॉल्ट.
कृती : तेल गरम करून त्यात जिरं तडतडावं, मिरची ठेचा घालून परतावा. खाली उतरून त्यात इडली रवा, दुधीचा कीस, दही, ओटस, मीठ घालून भिजवून अर्धा तास ठेवावं. मग त्यात इनोज आणि मिश्रण किंचित सैल होण्यापुरतं पाणी घालून या पिठाच्या इडल्या कराव्या.
इडली रव्याऐवजी किंचित भाजलेला साधा रवाही चालेल.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..