23 October 2019

News Flash

कपडय़ांची काळजी

* ठेवणीतल्या सिल्क साडय़ा कपाटात ठेवताना उलटी घडी करून त्यात मधे मधे लवंगा घालून ठेवाव्यात म्हणजे वाळवी लागत नाही.

| January 17, 2015 04:49 am

* ठेवणीतल्या सिल्क साडय़ा कपाटात ठेवताना उलटी घडी करून त्यात मधे मधे लवंगा घालून ठेवाव्यात म्हणजे वाळवी लागत नाही.
* स्वेटर बॅगेत ठेवताना उलटी घडी करून त्यात डांबराच्या गोळय़ा घालाव्यात.
*  पावसाळा संपल्यावर आपण रेनकोट घडी करून ठेवतो तेव्हा आतल्या बाजूने त्याला फेसपावडर  लावावी. म्हणजे तो आतून चिकटत नाही.
*  कॉटनची नवीन साडी भिजवताना पाण्यात थोडे मीठ व अर्धा कप दूध घालावे. मिठाने रंग पक्का होतो व दुधाने साडी मऊ राहते.
*  ब्लॅक, नेव्ही ब्लू व मरून रंगाचे कपडे (साडी, ड्रेस, ब्लाऊज) साबणात भिजवल्यावर नंतर चार-पाच वेळा पाण्यातून काढावेत त्यामुळे त्यातला साबण  पूर्णपणे निघून जातो. कपडा भुरकट होत नाही. अगदी साडी जुनी झाली तरी रंग भुरकट होत नाही.
*   सिल्क कपडे धुताना शेवटच्या पाण्यात लिंबाचा रस पिळावा म्हणजे कपडय़ाला चकाकी येते.
*  मऊ पडलेल्या सिल्कच्या साडय़ा धुताना शेवटच्या पाण्यात ५-६ चमचे पातळ डिंक घालावा म्हणजे साडी करकरीत होते.
*  शालू, जरी व सिल्क साडय़ा कपाटात ठेवताना कागदाखाली कडुनिंबाचा पाला पसरावा. त्यावर साडय़ा ठेवल्यास कसर लागत नाही.

First Published on January 17, 2015 4:49 am

Web Title: care of cloths
टॅग Cloths