पुरुषी मानसिकता बदलणे गरजेचे

रंगनाथ पठारे यांचा १८ जानेवारीच्या पुरवणीतील लेख वास्तव आहे. स्त्री बदलली तशी पुरुषी मानसिकता बदलणे गरजेचे आहे हे पुरुषानेच सांगितले हे बरे झाले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पुरुष बदलत आहेत, विशेषत: घरकामाच्या बाबतीत. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या बायकोला मदत करणारे पुरुष आहेत. पण बदलाचा वेग कमी आहे त्याला कारण आहेत दूरचित्रवाहिनीवरील मालिका. मालिकांमध्ये दोन टोकाच्या (फार सोशिक किंवा एकदम बेपर्वा) स्त्रिया दाखवितात, त्याचा परिणाम समाजावर होतोच.

reservation in indian constitution to bring equality in society
संविधानभान : समतेची बिकट वाट
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

उमा बापट यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे निरागसता लोप पावत आहे. लहान वयातील मुलं सुंदर काम करतात हे खरं असलं तरी अतिरेकी कौतुकामुळे नुकसान होऊ  नये असं आमच्या पिढीला वाटतं. मंगला गोडबोले यांचा लेख मस्त. गद्धे पंचविशी आवडते.

– वासंती सिधये, पुणे</p>

भविष्य मुली ठरवत नाहीत?

‘तोल सांभाळताना’ हा गद्धेपंचविशी’मधील मीरा बोरवणकर यांचा लेख (११ जानेवारी) वाचला. आज समाजात मुली मनापासून शिकताना दिसतात, पण पुढे करिअर मात्र करत नाहीत. कारण सर्वसामान्य माणसाला आपल्या मुलीचं लग्न लवकर व्हावं, अशी इच्छा असते. त्यामुळे बहुसंख्य मुली वयाच्या वीस वा बाविसाव्या वर्षीच लग्न करून मोकळ्या होतात.

अशावेळी एखादीच ‘मीरां चढ्ढा बोरवणकर’ यांच्यासारखी स्त्री उत्तुंग स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असते. प्रत्येक पालक वा आईवडिलांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी मोकळीक दिली पाहिजे, तरच मीरां चढ्ढा बोरवणकर यांच्यासारख्या अधिकारी भविष्यात घडू शकतील.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

स्त्रियांसाठी प्रभावी ‘कथा दालन’

नवीन वर्षांत स्त्रियांसाठी ‘कथा दालन’ सुरू करून ‘लोकसत्ता’ने स्त्रियांचा सन्मान केला आहे. या सन्मानाची पहिली सलामी सोनाली राहुल कुलकर्णी यांनी ‘अस्तित्व’ या कथेद्वारे जोरकसपणे दिली आहे. कथा कुटुंबाचे महत्त्व सांगणारी आहे. माणूस वरून कितीही रुबाबदार दिसला तरी आतली शांती महत्त्वाची असते, हे सांगणारी ही कथा आहे. पुढील अंकातील कथा वाचण्यासाठी आतुर झालो आहे.

– शिविलग राजमाने, पुणे

विचार करायला लावणारी सदरं

११ जानेवारीच्या अंकातील हेमंत मोरे, यांचे पत्र वाचून मी देखील त्यांच्याशी सहमत आहे. २०१९ मध्ये एक वाचक म्हणून समृद्ध करणारीच सदरे तुम्ही आम्हाला दिलीत व २०२०च्या अंकातून हे वर्ष देखील असेच समृद्ध करणारीच सदरे घेऊन येताना दिसत आहे त्याबद्दल प्रथम आभारी असून अभिनंदन देखील करतो. सुरुवात म्हणून -पुरुष हृदय ‘बाई’ या सदरातील सुबोध जावडेकर यांचा लेख, नवी दृष्टी देणारा आहे. त्यातील एक उदाहरण वा प्रयोग खूप काही सांगून गेला तो असा, माकडांपुढे आणि त्यांच्या पिलांपुढे काही बाहुल्या आणि ट्रक्ससारखी खेळणी टाळण्यात आली. त्यातल्या नरांनी नेमके ट्रक्स उचलले आणि माद्यांनी बाहुल्या. हे उदाहरण एक वाचक म्हणून अचंबित करणारे वाटले, परंतु माझ्यातील निरागस, कुतूहल व सत्यशोधक वृती जागृत होऊन काही प्रश्न डोक्यात आले. हा प्रयोग परिपूर्ण म्हणावा का? असो. तरी हे सदर नक्कीच विचार करण्यास लावणारे असेल.

‘चित्रकर्ती’ हे प्रतिभा वाघ यांच्या ११ जानेवारीच्या अंकातील लेखातून लोककलेच्या वारशाविषयी परिचय देणारे सदर असेल हे कळले, परंतु एक वाचक म्हणून त्यातील रूढी आणि परंपरा यातील दृश्यात्मक भेद समजून सांगितला तर उत्तम होईल. अनेकदा शैलीवर बरीच माहिती मिळते, परंतु संकल्पना सांगितल्या जात नाहीत. संकल्पना सांगतानाच या सदरातून प्रतिभा वाघ खूप वेगळी माहिती देतील हा विश्वास आहे.

– रंजन र. इ. जोशी, ठाणे</p>