27 May 2020

News Flash

संकटातही संधी

काहींनी आपल्या पूर्ण न करता आलेल्या छंदांवरची धूळ झटकून त्याला पुन्हा एकदा मनातल्या उत्साहाने ताजं केलं असेल

प्रतिकात्मक छायाचित्र

भरधाव वेगात चाललेल्या गाडीला अचानक ब्रेक लागून ती एका जागी अडकून पडावी, तसं काहीसं आपल्या सगळ्यांचं झालं आहे. २१ दिवस घरीच अडकून पडल्याने वेळेचं काय करायचं, हा  प्रश्न अनेकांसमोर ठाण मांडून बसला असेल. काहींनी यातून मार्ग काढला असेल. चित्रपट, नाटक बघणं, पुस्तकं वाचणं याच्याही पलीकडे अनेकांनी काही गोष्टी केल्या असतील. काहींनी आपल्या पूर्ण न करता आलेल्या छंदांवरची धूळ झटकून त्याला पुन्हा एकदा मनातल्या उत्साहाने ताजं केलं असेल, काहींनी कॉन्फरन्स कॉलवरून जुन्या मित्रमंडळींशी गप्पांची मैफल रंगवली असेल, अनेक पुरुषांचे स्वयंपाकघराकडे पाय वळले असतील, तर आमच्या वयोवृद्धांच्या पिढीने, ‘आम्हाला काही कळत नाही’ ची पारपंरिक री ओढणं टाळून आता घरात असलेल्या आणि आयत्या सापडलेल्या तरुण पिढीकडून तंत्रज्ञान समजून घेऊन सोशल मिडियांवर आपलं बस्तान बसवलंही असेल.. तर काहींनी इतरांसाठी मदतीचा हात पुढे केला असेल.. काय करताय तुम्ही नवीन, वेगळं.. आणि काय मिळतंय तुम्हाला त्या वेगळं करण्यातून.. आम्हाला कळवा.. २५० शब्दांमध्ये.. मजकूर ईमेलवर आणि युनिकोड फॉन्टमध्येच पाठवा – chaturangnew@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:11 am

Web Title: coronavirus share your experiences dd70
Next Stories
1 उन्मत्त पुरुषसत्ताकता
2 जेंडर बजेट क्षेत्र विस्ताराची गरज
3 जीवन विज्ञान : प्रोबायोटिक अन्नपदार्थ
Just Now!
X