डॉ. आशीष  देशपांडे

आपण स्वत:ला अगदी पूर्णपणे ओळखतो असं आपल्याला वाटतं खरं! पण ते सत्य आहे का?.. जसं आपलं जागृत मन, तसंच एक सुप्त मनही असतं. या सुप्त मनात वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात. यातून मनाच्या काही तऱ्हा निर्माण होतात. तेच आपल्या मनाचं ‘डिफेन्स मेकॅ निझम’. आपल्या वागण्यात या तऱ्हांचं प्रतिबिंब वारंवार पडलेलं असतं. जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या मनाच्या ‘तऱ्हेवाईक’पणाला समजून घ्यायचा हा प्रयत्न..

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

आपण विचारी वागतो, या मिजाशीत असतो. पण आपलं बहुतांश वागणं तसं असेलच असं सांगता येणार नाही. कित्येक वेळी आपलं वागणं आपल्यालाच चक्रावून जातं. आपली कृती मनाच्या कुठल्याही विचारधारेला अनुसरून नसते. साहजिकच मनाच्या आत दडलेल्या सुप्त मनाची (सबकॉन्शियस) ती अनुभूती देत असते.

सिग्मंड फ्रॉइडच्या म्हणण्याप्रमाणे सुप्त मन हे आपल्या प्रवृत्ती/ संप्रेरणा आणि प्रेरणांचं घर असतं. अनुभवविश्वातले अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक घटक मन, सुप्त मनात ढकलून टाकतं. आपली वृत्ती, प्रवृत्ती, प्रेरणा यांच्या अभिव्यक्तीवर या सुप्त मनातल्या प्रक्रियांचा परिणाम होतो. या सुप्त मनातल्या प्रक्रिया म्हणजे ‘डिफे न्स मेकॅ निझम’- मनाच्या तऱ्हा! रीतिरिवाजांना काही सामाजिक किंवा समविचारी लोकांच्या अनुभवांची शिदोरी असते. पण ‘तऱ्हा’ वैयक्तिक असतात नि त्यांचं काही कारण नसल्यानं विश्लेषणही होऊ शकत नाही. या तऱ्हा आपल्या मनाची काळजी घेतात, ताण कमी करतात, स्वप्रतिमा जपतात आणि मनातले वाद शमवतात. पण या तऱ्हांच्या अयोग्य वापरात खऱ्याचं खोटं करण्याची ताकद असते, त्यामुळे परिस्थितीबद्दलची जाणीव बदलून विपर्यास होऊ शकतो. असत्यावर आधारलेले निर्णय नातेसंबंधांसाठी हानीकारक असू शकतात. व्यक्तीच्या प्रभावक्षमतेप्रमाणे त्या व्यक्तीच्या तऱ्हांचे पडसाद दूरगामी असू शकतात.

सुप्त मनाच्या या तऱ्हांची म्हणजेच ‘डिफे न्स मेकॅ निझम’ची वर्गवारी अशी करू शकतो-

१) रोगकारक (पॅथोलॉजिकल)- भ्रम प्रक्षेपण (डिल्युजनल प्रोजेक्शन), रूपांतर (कन्व्हर्जन), नाकारणे (डिनायल), विरूपण (डिस्टॉर्शन), अवमूल्यन (डिव्हॅल्युएशन), सर्वशक्तीमानपणा (ओम्नीपोटन्स), आदर्शीकरण (आयडियलायझेशन), काल्पनिक स्वरंजन (ऑटिस्टिक फँ टसी), प्रक्षेपणीय ओळख (प्रोजेक्टिव्ह     आयडेंटिफिके शन), विभक्तीकरण (स्प्लिटिंग)

२) अपरिपक्व (इमॅच्युअर)- अविचारी उत्स्फू र्तता (अ‍ॅक्टिंग आऊट), कल्पनारंजन  (फँटसी), छुप्या कु रापती (पॅसिव्ह अग्रेसिव्ह), प्रक्षेपण (प्रोजेक्शन), शरीरांतरण (सोमॅटायझेशन), एकांतप्रिय अंतर्मुखता (शिझॉइड फँ टसी), अधोगती (रिग्रेशन), आत्मसातीकरण (इंट्रोजेक्शन), निदानबाह्य़ गंभीर आजार होण्याची भीती (हायपोकाँड्रिअ‍ॅसिस)

३) बेचैनी अभिमुख (न्यूरॉटिक              डिफे न्सेस)- विवेकीकरण (रॅशनलायझेशन), विस्थापन (डिस्प्लेसमेंट), विघटन (डिसोसिएशन), छुपी विरोधात्मक प्रतिक्रिया (रिअ‍ॅक्शन फॉर्मेशन), बौद्धिकीकरण (इंटेलेक्च्युअलायझेशन), दडपणे (रीप्रेशन), विरोधाभासी पूर्ववतीकरण (अनडूइंग), कोशीकरण (विथड्रॉवल)

४) परिपक्व (मॅच्युअर)- परिक्रमण (सबलाईमेशन), विनोद (ह्य़ूमर), विचारानुनय (आयडेंटिफिके शन), परार्थवाद (अल्ट्रुइझम)

हे शब्द नक्कीच अवजड आहेत. पण पुढे येणाऱ्या उदाहरणांवरून समजेल की हे फारच वापरातले आणि ओळखीतले शब्द आहेत. सुप्त मनाच्या तऱ्हांची समज होण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाव्यतिरिक्त काय उपयोगी पडणारऱ्याया काल्पनिक घटना मनाच्या तऱ्हा समजून घेण्यासाठी आहेत. खऱ्या अर्थानं या तऱ्हा समजण्यासाठी अखंड आयुष्याचा उभा विचार करावा लागतो. पण लेखस्वरूपात तसं शक्य नाही. खालील उदाहरणं फक्त समजून घेण्यासाठीच योग्य आहेत. एकमेकांचं विश्लेषण करण्याचा मोह इतक्याशा माहितीवर टाळावा.

१) भ्रम प्रक्षेपण (डिल्युजनल प्रोजेक्शन)- ‘ती’ आपल्या मैत्रिणीला सांगतेय, ‘‘अनिकेत आणि माझ्या लग्नाला पुढच्या महिन्यात ५ वर्ष होणार आहेत. मॅनेजमेंट कॉलेजमधली ती मंतरलेली २ वर्ष आणि ही ५ वर्ष.. नाही म्हणजे शेवटचं दीड वर्ष सोडून साडेतीन मस्तच गेली. गेल्या दीड वर्षांत अनिकेत थोडा बदललाच आहे. काम जरा जास्तच आहे हल्ली त्याला. आणि नोकरी जाण्याची सारखी भीती. सतत ओव्हरटाइम. दमून येतो मग घरी. जेवणाकडे लक्ष नाही की माझ्याकडे नाही. परवा एवढा महागडय़ा ब्रँडचा शर्ट आणला. अगदी तीच शेड, जी माझ्या ऑफिसमधल्या रवीनं स्वत:साठी घेतली होती. रवी? रवी नायर. नवीन मॅनेजमेंट रिक्रूट आहे माझ्या हाताखाली. मेधा काय जळली होती तो माझ्याकडे पोस्ट झाला म्हणून! पण काही म्हणा, रवीचा ड्रेसिंग सेन्स ‘टिपिकल इंडियन’ नाहीच आहे. त्याच्या ‘फॉर्मल्स’मध्येदेखील एक ‘कॅज्युअलनेस’ दिसतो. तसेही गडद रंग गोऱ्या मुलांच्या अंगावर चांगलेच दिसतात. तो परफ्यूम कुठचं वापरतो कोणास ठाऊक?.. त्यानंच तर मला त्या महागडय़ा ब्रँडबद्दल सांगितलं आणि आलासुद्धा सिलेक्शनसाठी. शौकीन आहेत साहेब शॉपिंगचे! हे मॉलवालेदेखील वात्रटच. पुरुषांच्या कपडय़ांच्या बाजूला बायकांचे आतले कपडे! मलाच वाटत होतं, कोणी बघितलं तर? आणि अनिकेतनं तो शर्ट घालूनही बघितला नाही. पूर्वी मला ‘लाँजरी’ही (रवीनंच सांगितला हा शब्द!) घालून दाखवायला लावायचा. अनिके त नक्कीच बदलला आहे. एस्पेशिअली त्याची ती नवीन सेक्रेटरी आल्यापासून. जाताना काय टिपटॉप जातो हल्ली.. जरा लक्ष ठेवायला पाहिजे.’’

रवी नायरच्या एकूणच वावरानं सुखावलेली ‘ती’ सुप्त मनातल्या जाणिवेपलीकडच्या तऱ्हेनं स्वत:च्या आंतरिक भावना अनिकेतवर टाकू पाहात आहे. तिचा आत्मविश्वास, अनिकेतशी असलेल्या नात्यातला विश्वास आणि समजुतीच्या वयाच्या आधी बालक-पालक नात्यातल्या उत्कटतेचं विश्वसनीय विपणन या प्रसंगाचा पुढचा प्रवास ठरवेल. फ्रॉइडच्या मते, तीन ते सहा वर्षांच्या वयात मेंदू-शरीराच्या वाढीत एक अकस्मात वेळम् येते जेव्हा लैंगिकतेचं ‘हार्डवेअर’ तपासलं जातं. या स्थितीत शरीराच्या वाढीअपरोक्ष मानसिक लैंगिक आकर्षण जाणिवांच्या वेशीशी तरळून जातं. पालकत्वाच्या असामान्य विश्वासार्हतेत उमलणाऱ्या या नैसर्गिक स्थित्यंतराला पालकत्वाचा आसरा कसा मिळतो?, समज कशी मिळते?, यातून पुढे वागण्याच्या तऱ्हा तयार होतात. संशयकल्लोळापासून प्रेमसुलभ मत्सरापर्यंत विविध छटा याच स्थितीच्या समायोजनातून तयार होतात. विश्वासार्हतेच्या अभावापोटी जेव्हा मन अपरिपक्वतेच्या तऱ्हांच्या आधीन होतं, तेव्हा अतृप्त बालवयीन आकर्षण आपल्या सुप्त मनातलं अस्तित्व वारंवार दाखवून देतं. समाजाच्या दृष्टीनं निषिद्ध विचार मनात येण्याच्या जाणिवेनं ‘सुपर इगो’ त्यावर प्रभाव टाकतो नि त्यांना सुसह्य़ बनवण्याचा प्रयत्न करतो. परिपक्वतेच्या भाव-अभावामुळे या मनाच्या तऱ्हा रोगकारक/ हानीकारक बनतात. वरच्या उदाहरणात अतृप्त बालवयीन लैंगिक आकर्षण स्वत:चे निषिद्ध विचार दुसऱ्यावर प्रक्षेपित करत आहे.

२) रूपांतर (कन्व्हर्जन)- हमीद आता दहावीत आला होता. अभ्यासात हमीद नेहमीच वर्गात अव्वल असायचा. अम्मीच्या हट्टाखातर उर्दू शाळा सोडून कॉन्व्हेंट शाळेत मोहल्लय़ातली आजपर्यंत किती मुलं गेली आहेत? मौलवींची नापसंती, मित्रांच्या आयांच्या तिरकस नजरा, झटक्यात परके झालेले जुने मित्र आणि नव्या शाळेत परक्यासारखे वागणारे नवे मित्र. घरातला बापूजींचा फोटो बम्घत वाढलेल्या या १४ वर्षांच्या मुलाला बाहेरच्या जगाला त्याची असलेली ओळख हलवून टाकणारी होती. दहावीचं यश या सगळ्यांमुळेच फार महत्त्वाचं झालं होतं. अम्मीनं कोणाकडून तरी विज्ञान, इतिहास, भूगोलाच्या नोट्स आणल्या होत्या. गणित आणि भाषांसाठी शिकवण्या ठरल्या होत्या. खरा प्रश्न इंग्रजीचा होता. उर्दू शाळेतलं इंग्रजी नि कॉन्व्हेंट इंग्रजी यात बराच फरक होता. भरीस उच्चार होतेच. शाळेतल्या ‘मिस्’ कुठे कोळून उच्चमर प्यायल्या होत्या कोणास ठाऊक! हमीदचे उच्चार पहिल्यांदा ऐकून त्या पेटूनच उठल्या. हमीदकडून दर दिवशी एक परिच्छेद वाचून घ्यायचा हे त्यांनी परस्पर ठरवून टाकलं होतं. घाबराघुबरा हमीद वाचायला उभा जरूर राहिला, पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना.. शाळा बदलण्याच्या निर्णयानं छोटय़ा हमीदवर फारच दडपण आलं आहे. घेतलेला निर्णय योग्यच होता हे ठरवण्याची जबाबदारी हमीदनं स्वत:वर घेतली आहे. त्याच्या क्षमता एकूणच पणाला लागल्या आहेत म्हणा ना! फ्रॉईडच्या मते बालवयीन लैंगिक आकर्षणाचं समायोजन जेव्हा व्यवस्थित होतं, तेव्हा आत्मविश्वास व्यक्तिमत्त्वात प्रस्थापित होतो नि सकारात्मकता अंगीकारते. हमीद सुरुवातीला आत्मविश्वासानं त्याच्या परिस्थितीला तोंड देत होता. अभ्यास, मोहल्लय़ातल्या लोकांच्या नजरा, घरच्यांच्या अपेक्षा या त्याच्या आटोक्यातल्या गोष्टी होत्या. पण उच्चारांच्या बाबतीत तो संपूर्णपणे अजाण होता, परावलंबी होता. शिक्षिकेच्या असंवेदनशील वागण्यानं मदतीचा हा प्रयत्न नुसता फोलच नाही ठरला, तर रोगदायक बनला. चुकीचे उच्चार करण्याची भीती वाचेवर मात करून गेली.

३) नाकारणे (डिनायल)- स्वाती संध्याकाळच्या ५:२२ च्या बोरिवली ट्रेनमध्ये नेहमीसारखीच कशीबशी चढली. छातीशी पर्स नि मुठीत जीव, हे या बायकांसाठी नवीन नव्हतं. मोटरमननं गाडी शेवटची थांबवण्यासाठीचे ब्रेक लावताच या ललना गाडीत झेपावल्यादेखील होत्या. दादर स्टेशन सोडून गाडी बाहेर येईपर्यंत गाडीनं त्याही गर्दीला सामावलं होतं आणि गर्दीनं एकमेकांना. तेवढय़ात डावीकडून धक्क्याची एक लाट आली नि स्वातीला कालची आठवण झाली. तसं आता हे स्वातीला नवीन नव्हतं, पण काल अतिच झालं. दुखरा काळानिळा दंड तिनं शिताफीनं लांब बाह्य़ांचा कुडता घालून लपवला होता. रात्रभर रडून सुजलेलं तोंड मेकअप करून झाकलं होतं. ऑफिसमधला बॉसचा दरारा आज कधी नव्हे तो स्वातीला आवडला होता, कारण तिथे घरच्या आठवणी येत नाहीत. इथे परक्या धक्क्यानं अचानक स्वातीला कालची रात्र आठवली. ‘‘उशीर होणार असेल, जेवला असशील तर फोन करून सांगायचंस ना? उगाच मी थांबले नसते.. एवढंच तर मी म्हणाले. साडेअकरानंतर आवराआवरी करायला जीवावर येतं हे कळत नाही का याला? फारच काम असतं हल्ली त्याला. कदाचित घेतलीही असेल काल नेहमीपेक्षा जास्त. पण मला तरी असं दारातच त्याला ओरडून बोलायची काय गरज होती? जाऊ दे नं! शिरीष म्हणतो तसं, ‘रात गयी बात गयी’. पण सकाळी स्वत:चं मारणं पण आठवू नये शिरीषला? डॉक्टर म्हणतात त्याला ‘अल्कोहोलिझम’चा आजार जडतोय म्हणे! आता हा कसला आजार?.. मीच थोडा पेशन्स दाखवायला पाहिजे होता, म्हणजे स्थिती हाताबाहेर गेलीच नसती.’’

शिरीष आणि स्वाती दोघंही सज्ञान असूनही शिरीषच्या वाढत्या व्यसनाधीनतेला समजून घेत नाहीयेत. दर दिवशीच्या वाढत्या पिण्यानं होणारा स्वातीचा कोंडमारा ती नाकारते आहे. शिरीषच्या वागण्यात होत असलेला बदल तिला दिसतो आहे, पण डॉक्टरांनी सांगूनही ती झाल्या प्रसंगाला स्वत:ला कारणीभूत ठरवते आहे. ‘अल्कोहोलिझम’ हा आजार आहे की नाही याबद्दल दुमत असू शकतं, पण दारू पिऊन नवऱ्याचं वाढतं मारणं आपल्याच चुकीनं होतंय असा समज करून घेणं हा नाकारण्याचा अतिरेकच म्हणायला पाहिजे.

मनाच्या तऱ्हांचे हे काही प्रकार आपण पाहिले. आणखी काही प्रकारांची चर्चा पुढच्या दोन लेखांमध्ये (२७ फे ब्रुवारी आणि १३ मार्च) करणार आहोत.

wdr.deshpande.ashish@gmail.com