दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मायक्रोवेव्ह ओव्हन खूपच मोठी मदत करीत असतो. मात्र त्याची स्वच्छता अत्यंत कंटाळवाणी आणि कष्टदायक वाटते. बाजारात मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्याची केमिकल्स मिळतात. मात्र त्यामुळे काही वेळा मायक्रोवेव्हमध्ये आतून डाग पडतात. शिवाय शरीरावर परिणामही होतो. म्हणूनच घरच्या घरीच याची स्वच्छ कशी करता येईल ते पाहू.
साहित्य- लिंबू, मायक्रोवेव्ह ओव्हनचा बाऊल/ कप आणि स्वच्छ कपडा.
कृती-
मायक्रोवेव्ह ओव्हनचा बाऊल पाण्याने अर्धा भरून घ्या.
लिंबू चिरून त्याचा रस बाऊलमध्ये पिळून घ्या, फोडी वा साल त्यातच ठेवा.
तो बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेवून साधारणपणे ३ मिनिटांपर्यंत हाय पॉवरवर ठेवा.. बाऊलमधील मिश्रण उकळणे अपेक्षित आहे.. ते उकळल्यावर पाच मिनिटांपर्यंत मायक्रोवेव्ह ओव्हनचे दार बंदच असू द्या.. आतील वाफ मुरताना मायक्रोवेव्हचे डाग  घालवण्यासाठी साहाय्यक ठरेल.
सुमारे पाच मिनिटांनंतर मायक्रोवेव्ह ओव्हन उघडून आतून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.. मायक्रोवेव्ह ओव्हनचा दरवाजा, ग्लास आतील खोलगट बाजू सर्व एका पुसण्यातच चकाचक होऊन जाईल.
अजूनही काही जुने डाग निघत नसतील तर कपडय़ाचे एक टोक मिश्रणात बुडवून स्वच्छ पुसून घ्या. डाग निघण्यास मदत होईल. 
सुनंदा घोलप – sunandaagholap@gmail.com