* छपरावर, बाल्कनी किंवा ज्या ठिकाणी कबूतरांचा त्रास होत असेल अशा ठिकाणी मिरचीची पूड पसरावी, कबूतरांचा त्रास कमी होतो.
* घरातल्या कुंडीत लावलेल्या झाडांच्या वाढीसाठी कॉफीचा वापर केल्यास रोपांची वाढ चांगली होते. झाडांसाठी खत म्हणून कॉफीचा वापर करता येतो.
* दूध भांडय़ाच्या तळाला लागून त्याला करपट वास येत असेल तर, दूध दुसऱ्या भांडय़ात काढून घ्यावे आणि त्यात खाण्याची २ पाने टाकून उकळून घ्यावे.
* गरम पाण्यात बेकिंग सोडा व निलगिरी तेल टाकून लादी स्वच्छ केल्यास जमिनीवरील डाग निघतात व निलगीरीच्या वासाने जंतूंचाही नाश होतो,
शिवाय रासायनिक नसल्यामुळे लहान मुलांना त्याचा त्रास होत नाही.
* लाकडी फर्निचरला कसर वा वाळवी लागलेल्या ठिकाणी रॉकेलचे थेंब सोडावेत, पुस्तकांचे शेल्फ असेल तर त्या ठिकाणी चंदनाचा तुकडा ठेवावा.
*  बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी आणि उष्णता यापासून लांब थंड जागेत ठेवावे, यामुळे त्याची चव चांगली राहते.
* पाण्यात व्हिनेगरचे ४-५ थेंब टाकून चांगले ढवळून घ्या. भिजवलेल्या कपडय़ात पनीर गुंडाळून या पाण्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावे. पनीर बरेच दिवस ताजे राहते.
* थंड पाण्यात लिंबाचा रस घालून त्यात कोमेजलेल्या भाज्या १ तास ठेवल्यास भाज्या ताज्या टवटवीत होतात.
* अंडे फेटल्यावर भांडय़ाला अंडय़ाचा वास येतो. अशा वेळी भांडय़ाला चण्याचे पीठ चोळून ठेवावे व थोडय़ा वेळाने भांडे नेहमीप्रमाणे धुवावे. अंडय़ाचा वास निघून जातो.