* भरपूर लसूण सोलायचे असतील तेव्हा लसणीच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्याव्या. डिश किंवा वाटीने त्या थोडय़ा भरडाव्यात. झाकण असणाऱ्या डब्यात घालून चांगल्या हलवाव्या. लसणाची साले आपोआप निघतात.
* भात, खीर किंवा कोणताही उकळणारा पदार्थ ऊतू जाऊ नये म्हणून त्या भांडय़ावर लाकडी पळी आडवी ठेवावी. मिश्रण कितीही वेळ गॅसवर ठेवले तरी ऊतू जात नाही.
* अनेक दिवसांनंतर मधाची बाटली वापरायला काढली की द्रवरूपी मध वर व तळाशी घट्ट भाग राहतो. अशा वेळी मधाची बाटली कोमट पाण्यात तापवावी. मध पूर्वीसारखा एकजीव होतो.
* एखाद्या बाटलीचे झाकण उघडत नसेल तर झाकणाभोवती रबरबँड लावावा किंवा रबरी हातमोजा घालून झाकण उघडण्याचा प्रयत्न करावा. झाकण त्वरित उघडते.
* उकळून गार केलेल्या पाण्याचा बर्फ बनवल्यास बर्फ स्फटिकाइतका पारदर्शक होतो.
* हिरव्या भाज्या, मटार यांचा पदार्थातील रंग तसाच ठेवण्यासाठी शिजवताना थोडी साखर घालावी. रंग फारसा बदलत नाही.
* अंडे फेटण्यासाठी घेतल्यावर, अनेकदा अंडय़ाच्या आवरणाचे बारीक पांढरे तुकडे वाटीत पडतात. अशा वेळी अंडय़ाच्या तुकडय़ांनीच ते बाहेर काढावेत. लवकर निघतात.