डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

‘करोना’ विषाणूला निष्प्रभ करण्यासाठी साबण, डिर्टजट वा ‘आयसोप्रोपाइल अल्कोहोल’ वापरून त्याचं स्निग्ध पदार्थाचं आवरण नष्ट करता येतं. यामुळे वारंवार हात धुणं, इतरांपासून दोन हात अंतर ठेवणं, घराबाहेर न जाणं, असे उपाय करत असतानाच महत्त्वाचं आहे ते प्रतिकारशक्ती वाढवणं. पुरेसा व्यायाम, तणावमुक्त मन याचबरोबरीनं आहारही पोषक आणि रंगीबेरंगी असायला हवा. वेगवेगळ्या भाज्या, २-३ प्रकारची फळं, डाळी, बिया, तीळ, सुकामेवा असे सर्व पदार्थ आलटून-पालटून खाल्ले पाहिजेत. मांसाहारी असल्यास अंडी, मटण, मासे, चिकन सूप अवश्य घ्यायला हवं.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री

आज जगभर ‘न भूतो न भविष्यति’ असं काहीसं वातावरण आहे. अशी ‘घर कैद’ किंवा ‘गृहवास’ संपूर्ण जगाच्या वाटय़ाला येईल ही कल्पनाही कोणी केली नसेल. एकीकडे भय, चिंता आहे, तर दुसरीकडे या सुट्टीचं, जास्तीच्या वेळेचं काय करायचं, हा यक्षप्रश्न सर्वांना सतावत आहे. शिवाय आणखी एक महत्त्वाची चिंता, ‘रोज सकाळ- दुपार- संध्याकाळ स्वयंपाक काय करायचा?’ सगळ्यांचं पोट भरून, चवी सांभाळून, घराचं आरोग्यही राखायचं, ही खरोखर अवघड समस्या आहे. त्यासाठी थोडी माहिती व काही खाद्य विज्ञान देण्याचा हा प्रयत्न.

सुरुवातीला ‘करोना’ अर्थात ‘कोविड-१९’ हा आजार नेमका काय आहे आणि सर्व जग त्याला घाबरून घरात दडी मारून का बसलं आहे, याविषयी. २००३ मध्ये जगामध्ये एका विषाणूमुळे मोठी साथ पसरली. त्याचं नाव ‘सार्स’- ‘सिव्हियर अक्यूट रेस्पिरेटरी सिण्ड्रोम’. हा विषाणू ‘करोना’पेक्षा अधिक घातक, परंतु कमी संसर्गजन्य होता. सध्याचा ‘करोना’ हा त्याचाच भाऊबंद.  २०१९ मध्ये हा प्रथम दिसला. त्याआधी त्याचं नाव ‘नॉवेल सार्स कोव्ही-२’ असं ठेवण्यात आलं होतं. नंतर फेब्रुवारी २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) याला ‘कोविड-१९’ असं नाव दिलं. ‘करोना’मधील ‘को’, ‘व्हायरस’ मधील ‘व्ही’, ‘डिसीज’ मधील ‘डी’ आणि २०१९ मधील ‘१९’ हा आकडा वापरण्यात आला.

हा ‘करोना’ विषाणू सर्दी व पुढे फ्लू निर्माण करणारा, मुळात तसा नेहमीच्याच आजार देणाऱ्या विषाणूंच्या कुटुंबामधील आहे. तो माणसाच्या घश्यात थोडीशी जागा मागतो, आपण त्याला घशात येऊ दिलं, तर झपाटय़ानं तो घशाद्वारे तुमच्या फुफ्फुसांमध्ये घुसतो आणि केवळ ५ दिवसांत संपूर्ण शरीराचा ताबा घेऊन तुमचा  खेळ समाप्त करू शकतो. हे करायची त्याची पद्धत भयानक आहे. यावर संशोधन चालू आहे आणि विविध मतंही आहेत. निसर्गानं निर्माण केलेलं मानवी शरीर म्हणजे विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि कलेचा अद्भुत आविष्कार आहे.  तिथे होणाऱ्या रासायनिक आणि जैविक क्रिया म्हणजे परिकथा वाटतील. क्षणाक्षणाला आपण श्वास घेतो. पण प्राणवायू फुफ्फुसांमधून रक्तात जातो आणि शरीरामध्ये सर्वत्र त्याची ‘डोअर  डिलीवरी’ होते, एवढंच आपण शाळेत शिकतो. त्याच वेळी हे लाल भडक शुद्ध रक्त ‘कार्बन डायऑक्साइड’ आणि इतर पेशींना, स्नायूंना नको असलेला कचरा गोळा करतं आणि म्हणून अशुद्ध व निळसर होतं. पुढे ते शुद्धीकरण करण्यासाठी हृदयामध्ये गोळा होतं. पण मुळात प्राणवायू रक्तामध्ये जातोच कसा?  ‘आरबीसी’ म्हणजे रक्तकोशिकांमुळे. पण या कोशिका हा प्राणवायू कसा धरून नेतात? आणि त्यांनी तो खूप घट्ट पकडला तरी हवा तेव्हा कसा सोडता येतो?  तर, हे काम करतं ‘हिमोग्लोबिन’. पूर्वीच्या काळी कागदाची छोटीशी परडी  किंवा पाकीट करून त्यामध्ये तिळाचा हलवा भरून  संक्रांतीला पोस्टानं पाठवत. ही परडी त्रिमितीमधील ‘पिरॅमिड’प्रमाणे असल्यामुळे  हलव्याचे ४-५ दाणे त्यात छान मावत. तशीच रचना हिमोग्लोबिनची असते. ‘हिम’ या शब्दाचा ग्रीक भाषेतला अर्थ रक्त. ‘ग्लोबिन’ म्हणजे छोटा गोळा किंवा दाणा. केंद्रामध्ये लोह अणू (‘आयर्न’) आणि सभोवती ४ प्रथिनांच्या साखळीची नक्षी. झाली तयार ही परडी! यात ठेवा प्राणवायू, नि पोहोचवा जागोजागी. येताना त्यामध्येच भरा नको असलेला माल. ‘करोना’ विषाणू शरीरात- विशेषत: फुफ्फुसांमधून रक्तामध्ये जातो आणि या परडीलाच नष्ट करतो. ‘करोना’चा हल्ला कसा होतो याची विविध उत्तरं वैज्ञानिक शोधत आहेत. एक प्रचलित विचार असा, की हा ‘करोना’ रक्तातल्या हिमोग्लोबिनमधला लोहाचा अणू वेगळा करून टाकतो. त्यामुळे श्वास घेऊन देखील पुरेसा प्राणवायू हा स्नायू, पेशी, शरीराच्या इतर भागात पोहोचू शकत नाही, तसंच लोहकणांमुळे रक्तवाहिन्यांना आणि फुफ्फुसांना इजा होऊन रोग्याचा मृत्यू ओढवू शकतो.

आज जगभर ‘करोना’ची भीती पसरली आहे याचं मुख्य कारण म्हणजे या विषाणूचं बदलणारं रूप आणि सहजासहजी संसर्गातून होणारी लागण. त्यामुळे त्याला ‘पॅनडेमिक’ म्हणजे महामारीचं स्वरूप आलं आहे. शिवाय बाधा झाल्यास नक्की औषध उपलब्ध नाही आणि रोग होऊ नये म्हणून त्यावर अजून प्रतिबंधक लस शोधलेली नाही. हा विषाणू थुंकी, कफ यातून पसरतो, गुळगुळीत पृष्ठभागावर घट्ट चिकटतो, स्पर्शातून पसरतो, आणि पसरण्याचा वेग तर इतका जास्त, की एका रुग्णाचे १०, १० चे १००० आणि पुढे लाखो लोकांना त्याची लागण केवळ एका महिन्यात होऊ शकते. ‘करोना’चा रेणू हा प्रथिनांच्या सापासारख्या साखळीनं बनला असून त्यावर स्निग्ध पदार्थाचं आवरण असतं. विषाणू हा जिवाणूप्रमाणे सजीव नसतो, म्हणून त्याला ठार मारता येत नाही. पण विषाणूला निष्प्रभ करता येतं आणि ‘करोना’साठी साबण, डिर्टजट वा ‘आयसोप्रोपाइल अल्कोहोल’ वापरून हे स्निग्ध पदार्थाचं आवरण नष्ट करता येतं. यामुळे वारंवार हात धुणं, इतरांपासून दोन हात अंतर ठेवणं, घराबाहेर न जाणं, असे उपाय करत असतानाच आणखी काय करता येईल?.. ते म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवणं. पुरेसा व्यायाम, तणावमुक्त मन हे तर आवश्यक आहेच, पण कोणता आहार घेतला तर आपण आणखी निरोगी राहू शकू ते पाहूया.

आहारामध्ये सहा अत्यावश्यक असे घटक असतात- प्रथिनं, कबरेदकं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वं, खनिजं आणि शेवटी पण तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. सध्याच्या काळात आपल्या आहारात पुरेसं ‘क’आणि ‘ड’ जीवनसत्त्व  तसंच ‘झिंक’ असलं पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये औषधांच्या गोळ्यांच्या स्वरूपात हे घटक भसाभस पोटात ढकले जातात. पण ते योग्य नाही. कारखान्यामध्ये बनवलेलं रसायन हा जरी तसाच अणू-रेणू असला तरी त्यात जैविक वा प्राणिक शक्तीचा अभाव असतो. म्हणजे या निर्जीव रसायनची ‘बायो-अव्हेलेबिलिटी’अर्थात शरीरात ते शोषलं जाण्याची क्षमता खूप कमी असते. अशा वेळी काही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ खूप जास्त प्रमाणात गोळ्या घ्यायला सांगतात, ज्यामुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. हळदीमधील प्रतिजैविक गुणधर्माइतकाच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील ‘कर्कुमिन’. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सध्याच्या काळात आहार कसा असावा? तर इंद्रधनुष्याप्रमाणे रंगीबेरंगी! अर्थात हे रंग नैसर्गिक हवेत. वेगवेगळ्या भाज्या, २-३ प्रकारची फळं, डाळी, बिया, तीळ, सुकामेवा असे सर्व पदार्थ आलटून-पालटून खाल्ले पाहिजेत. मांसाहारी असल्यास मटण, मासे, चिकन सूप अवश्य घ्यावं. चीज, अंडी, गहू, तांदूळ, सर्व खाल्लं पाहिजे. आठवडय़ातून एकदा उपवास केल्यास अत्युत्तम- पण साबुदाणा, बटाटा खाऊन नाही. अथवा किमान रात्रीचं एक जेवण टाळावं, हवं तर एखादं फळ किंवा कपभर दूध वा कसलंही सूप घ्यावं.

आदर्श आहार हा कमी कबरेदकं (म्हणजे भात/ पोळी / भाकरी हे पोटभर न खाता थोडं कमी खाणं), मध्यम प्रथिनं (वरण/ आमटी/ उसळ सर्व मिळून दीड वाटी) आणि योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थही असा असावा. दोन्ही जेवणात पातळ केलेलं १ चमचा गाईचं साजूक तूप अवश्य खावं. पहिल्या घासाबरोबर खाल्लं तर उत्तम. कबरेदकं ही शरीराचं इंधन आहेत, तर प्रथिनं जणू शरीररूपी वाहनाची ‘बॉडी’, आणि स्निग्ध पदार्थ हे वंगण आहे. ही गाडी बिनतक्रार चालण्यासाठी सर्व काही प्रमाणात पाहिजे. जास्त काबरेदकं खाल्ली तर ती पचवण्यासाठी खूप शक्ती वाया जाते आणि शरीर मंद, जड वाटतं, पोट फुगतं, अति झोप आणि आळस अंगात भरतो. म्हणून दोन जेवणं सोडून सध्या तरी इतर वेळी पोहे, उपमा, पाव, मैद्याचे पदार्थ, बिस्किटं कमी खावीत. त्याऐवजी फळं, सूप, बिया, सुकामेवा असं काहीतरी खायची सवय लावून घेणं उत्तम.

‘क’आणि ‘ड’ जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ कोणते हे बहुतेकांना माहीत असेल, अथवा इंटरनेटवरूनही ही माहिती सहज शोधता येईल. म्हणून इथं झिंक असलेले पदार्थ सांगते आहे. एक मात्र लक्षात घ्यायला हवं, की वरील आणि पुढील चर्चा ही निरोगी व्यक्तींसाठी आहे. आपल्याला काही आजार अथवा पचनाच्या किंवा इतर शारीरिक तक्रारी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

आहार हा आपल्या प्रकृतीनुसार असावा. कुठलाही लेख वाचून अचानक आहारात बदल करू नये. स्त्रियांनी दररोज ८ मिलिग्रॅम, तर पुरुषांनी ११ मिलिग्रॅम झिंक खावं. रोजच्या आहारात कितीतरी गोष्टींमधून हे मिळत असल्यामुळे गोळ्या घेणं गरजेचं नाही. झिंक कमी झाल्यास सर्दी होते. भोपळा, तीळ, शेंगदाणे, काजू अशा गोष्टी एकत्रित किंवा आलटून पालटून ३० ग्रॅम (२ चमचे) खाल्ल्या तर पुरेसं झिंक मिळतं. अळंबी (मशरूम), पालक, ब्रोकोलीमध्ये देखील झिंक असतं. धान्य, कडधान्यातलं झिंक त्यातल्या ‘फायटेट’ या शरीरासाठी अयोग्य असलेल्या घटकामुळे मिळत नाही. भिजवून, मोड आणून, शिजवून ‘फायटेट’ कमी होतात. शिंपलं वा ऑयस्टरमध्ये भरपूर झिंक असतं.

सध्या सर्दी झाली तर अजिबात दुर्लक्ष करू नये. एक चमचा कांद्याचा रस घ्या किंवा १ कांदा किसून, ४ कप पाण्यामध्ये उकळून ते पाणी २ कप करा आणि गरम-गरम सूपसारखं प्या. आल्याचा चहा तसंच पाती चहाचा (लेमनग्रास)  काढा घ्या.  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य काढा – १ इंच आल्याचा तुकडा, मूठभर गवती चहा,

१ चमचा (टेबलस्पून) किंचित भाजून केलेली आळशीची (जवस / फ्लॅक्स सीडस्) पूड,

१ टेबलस्पून ज्येष्ठमध पूड, हे सर्व पदार्थ २ लिटर पाण्यात घालून उकळून १ लिटर करावं. दिवसभरात हे पाणी प्यावं. यामुळे प्रतिकारशक्ती उत्तम राहते. सहा महिन्यांतून एकदा एकच दिवस हा उपाय करावा.

आपली प्रकृती सांभाळून योग्य आणि पोषक आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढवता येईल. ‘करोना’शी असलेल्या लढाईत ही रोगप्रतिकारशक्ती आपल्याला तारून नेईल.