सांधे दुखणे, सूज येणे, वेदना होणे यालाच आपण संधिवात/ एक झीज होणारा आजार म्हणतो. चालताना गुडघे दुखणे/ जमिनीवर बसता न येणे/ मांडी घालता न येणे/ पायांमध्ये बाक येणे वगरे त्रास परिचयाचे आहेत. चाळिशी ओलांडल्यावर सुरू होणारे त्रास जसजसं वय वाढतं तसे वाढतच जातात आणि शरीराची हालचाल नेहमीसारखी न होता वेदनामय होते. वयानुसार हाडे ठिसूळ होतात, कॅल्शिअम/ जीवनसत्त्व डची कमतरता भासते हे जरी सत्य असलं तरी आहारातून हा त्रास कमी व्हायचा काही मार्ग नक्कीच आहे.
यासाठी आहारात आवश्यक बदल-  
* आहारात निसर्गात असलेल्या अल्कधर्मी अन्न, फळे आणि भाज्या समाविष्ट करावीत. उदा. सॅलड्स किंवा ज्यूस, कोिशबीर (गाजर, बीट रस विशेष उपयुक्त)  
* उपयुक्त फळे : सफरचंद, अननस, संत्रे, मोसंबी, केळी, पेअर, जर्दाळू, इत्यादी
* बद्धकोष्ठ (constipation) टाळावे.
* हलका व्यायाम फायदेशीर आहे.
* शरीराचे वजन सामान्य ठेवा.
हे टाळा –
* संधिवाताचा त्रास वाढवणारे पदार्थ
* कडक/ अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स
* पापड, लोणचे इत्यादी खारे पदार्थ
* साखरेचा/ मिठाचा अति वापर
* सोडा,जंकपदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ. उदा. नुडल्स, बिस्किट्स, ब्रेड, पाव वगरे
* मांसाहारी पदार्थ
* वांगी, बटाटे, टोमॅटोसारख्या भाज्या.
दिवसाची सुरुवात एका उत्तम न्याहारीने करा
* एक ग्लास (साखर न घातलेले) गायीचे दूध किंवा २ टीस्पून ओट्स/ नाचणीसत्त्व/ राजगिरा लाडू/ सोयाबीन अथवा सातूचे पीठ , * २ अक्रोड / ३-४ भिजवलेले बदाम
* ताजे फळ
त्रास सहन करण्यापेक्षा असे बदल केल्याने वेदना पूर्ण गेल्या नाहीत तरी कमी व्हायला नक्कीच मदत होईल.
वैदेही अमोघ नवाथे
आहारतज्ज्ञ

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर