25 September 2020

News Flash

खा आनंदाने – चवीने खाणार..

तोंडाला काही ‘चवच’ नाही किंवा आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय असं म्हणताना भेळ, भजीची चव छान लागते.

| February 8, 2014 04:16 am

तोंडाला काही ‘चवच’ नाही किंवा आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय असं म्हणताना भेळ, भजीची चव छान लागते. आपल्यात ९००० चव जाणवून देणाऱ्या ग्रंथी असतात. आपल्या पंचेंद्रियांमध्ये वयपरत्वे बदल घडत असतात. सर्वात आधी खारट, गोड, मग तुरट आणि सर्वात शेवटी आंबट अशा चवी हळूहळू कळेनाशा होतात. खरे तर ‘वास’ घेण्याच्या ग्रंथींमध्ये बदल झाल्याने त्याचा चवीवरती परिणाम होतो. लाळगं्रथी आणि मेंदूकडे ‘वास’ घेऊन जाणारे संदेशवाहकसुद्धा वयानुसार हळूहळू निवृत्ती घेतात. बऱ्याच वेळी हा बदल का होतोय हे माहिती नसते किंवा बदलाची तीव्रतासुद्धा व्यक्तीप्रमाणे कमी-जास्त होऊ शकते. पण एकंदरीत अन्नावरची इच्छा कमी झाल्याने खाणं कमी होतं आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा कमी होते.
आहारयुक्ती :
तुमच्या डॉक्टरांशी बोलून बघा. जर औषधामुळे चवीमध्ये फरक पडला असेल तर त्यामध्ये डॉक्टर बदल करतील. पण वयपरत्वे असेल तर वेगळे प्रयत्न हवेत. पदार्थ गरम, खुमासदार, रंगीत आणि विविध चवींचा असेल तर पदार्थ बघायला, सुवासाला आणि मग चवीलासुद्धा छान लागेल.  आपण जेवतो ती जागा स्वच्छ हवी आणि मन प्रसन्न हवे. ज्यायोगे पचनशक्ती वाढते (जेवायला बसायच्या आधी माझे आई-पपा उदबत्ती, रांगोळी का काढायचे ते मला नंतर कळले.)
विविध चवी, रंग आणि पोत याचा विचार करून ठरवलेला एका दिवसाचा मेनू:
नाश्ता : पोहे + पुदिना – आलं – िलबूचटणी (नारळाचा चव, कोिथबीर आणि किसलेलं गाजर वर घालून.)
दुपारचे जेवण : फुलका / भाकरी, पालक डाळ, दुधीभाजी, दुधीचे साल – अळशी – तीळचटणी, बिटाचा रायता.
रात्रीचे जेवण : फरसबी, गाजर, मटार, भोपळा, मेथी वगरे भाज्या घालून केलेली लापशीची खिचडी (डाळ सांजा) + टोमॅटो सूप किंवा सोलकढी.
चवीने खाणार त्याला देव देणार!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 4:16 am

Web Title: eat with smoky
टॅग Chaturang
Next Stories
1 आनंदाची निवृत्ती – ‘संगीत विशारद’ होणारच
2 कायदेकानू : पोटगीचा अधिकार
3 एक अटळ शोकांतिका..
Just Now!
X