क्षणार्धात माझंही मन भूतकाळात सरकू लागलं, पण माझी मलाच मी टपली मारली. म्हटलं, ‘शैलाबाई, तुम्हालाही आता सुना येतील, तेव्हा उगीच जुनं उगाळण्यापेक्षा; आता पदरात पडलेली ही सुखाची झोळी मोठय़ा आदरानं स्वीकारा, यथेच्छ उपभोगा आणि शक्यतो वानप्रस्थी वृत्ती अंगीकारण्याचा प्रयत्न करा! समाधानी व्हा!’

कॅलिफॉर्नियातील ‘सॅनहोजे’मधील ‘सर्वना भवन’चे प्रशस्त आवार, बाहेरच्या भव्य ‘पाìकग लॉट’मध्ये असलेल्या शंभर-सव्वाशे गाडय़ा, त्यातच निखिलनेही त्याची आलिशान गाडी दिमाखात वळवून पार्क केली. इतक्यात त्याचा मोबाइल वाजला आणि ‘ऑफशोअरचा आहे’ असे म्हणत रेंज मिळवण्यासाठी तो इकडे-तिकडे फिरू लागला. हा फोन म्हणजे अध्र्या-पाऊण तासाची निश्चिंती हे आता अनुभवाने मला समजले होते. मी शांतपणे गाडीतच बसून राहिले. खिडकीची काच खाली सरकवली. थंड वाऱ्याचे झोत सुरू झाले, नकळतपणे अंगावर स्वेटर चढवला आणि बाहेरचा परिसर न्याहाळू लागले.
नुकताच पाऊस पडून गेला होता आणि स्वच्छ सोनेरी ऊन पडले होते. वातावरण प्रफुल्लित वाटत होते. ओल्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ांचा विशिष्ट आवाज, रस्त्यालगतच्या आणि आवारातल्या हिरव्यागार गवतावर चमकत असलेली जांभळी-पिवळी गवतफुले, वाऱ्याने सळसळणारी मेपलची झाडे आणि खाली मेपलच्या हिरव्या-लाल पानांचा सडा- स्वच्छ ओलसर गारवा. मी भारावल्यासारखी बघत होते. माझा, माझ्या तेथे असण्यावर विश्वासच बसत नव्हता. माझ्याही नकळत अचानक दोन कढत थेंब गालावर ओघळले..आणि मी पटकन डोळे पुसले. निखिलने हे पाहिलं असतं तर त्याला खूप वाईट वाटलं असतं.
अजूनही एकापुढे एक गाडय़ा येत होत्या आणि काही बाहेरही पडत होत्या. अवतीभवती तरुणाईची लगबग चालू होती. छान टवटवीत जोडपी, बरोबर एकदोन बछडी, हात धरून चाललेली नाहीतर बाबागाडीत ठेवलेली! हातात हात घालून कुजबुजत चाललेली! बहुधा सगळ्या जीन्स-टीशर्ट किंवा कौतुकभरल्या साडीतसुद्धा! स्वतला आवडेल असं जगणाऱ्या-वावरणाऱ्या. उगीच हेच कपडे, तसेच दागिने असे नियमांचे जाच नाहीत आणि इतरांचे काच नाहीत. लोक काय म्हणतील या चिंतेत वाया जाणारे आयुष्य नाही! ऐन तारुण्यातले समृद्ध स्वातंत्र्य! हे समोरचं वॉलमार्ट काय किंवा इंडिअन स्टोअर काय, स्वप्नवत वातावरण, ओसंडून वाहणारी समृद्धी. मला तिथे जायला-पाहायला खरंच खूप आवडतं! तिथे येणाऱ्या मुली (का बायका?) दुकानांतून भरलेल्या ट्रॉल्या ढकलत बाहेर येत होत्या. डिकीमध्ये सामान ठेवून ट्रॉल्या जागेवर लावत होत्या. शेजारीच असलेली बरीचशी भारतीयांचीच पार्लर्स समोसा-वडय़ांच्या खरेदीसाठी गजबजत होती. यानंतर ही जोडपी पुन्हा आपापल्या गाडीजवळ येऊन सुळकन मासोळी फिरावी तितक्या अलगदपणे आपली गाडी बाहेर काढून मार्गस्थ होत होते.
ड्रायव्हिंग सीटवर कधी तो तर कधी ती! छान जोपासलेलं एकमेकांना आधार देणारं नातं, पाहताना असं वाटत होतं की किती बरं आहे या मुलीचं, नवऱ्यांची भुणभुण नाही. खूप समंजस असतील का हे ‘नवरे’? आता सुस्थितीत असणारे हे भारतीय मुलगे; कदाचित यांच्यापकी कितीतरीजण मध्यमवर्गीय समाजातून आले असतील! या मुलांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले असेल! यातूनच अंगात मुरलेल्या समंजसपणाचा आदर यांच्या बायकांना असेल? कित्येकांच्या आईवडिलांनी आपले आयुष्य पणाला लावून या मुलांना शिकवलं असेल! त्या काटकसरीतच आयुष्य घालवलेल्या सासूला यांच्या संसारात काय स्थान असेल? विचारांची जाळी वाढत होती.
गेल्याच आठवडय़ात विवेकची म्हणजे निखिलच्या मित्राची आई भारतात परत गेली. आमच्याच ‘फॉक्स व्हिलेज’मध्ये तोही राहतो. त्यामुळे माझी आणि विवेकच्या आईची छान मत्री जमली होती. आम्ही रोज भेटायचो. कधी कधी जवळच असलेल्या ‘फार्मर्स प्रॉडक्ट्स’ मार्केटमध्ये जाऊन भाजीच्या पिशव्या मिरवत घरी यायचो! खूप गप्पा मारायचो. आता या वयात गप्पांमधून भूतकाळ वजा होऊच शकत नाही. एकदा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘आधीच यांची तुटपुंजी कमाई आणि वर त्यांची बेफिकीर हिटलरशाही. माझं तर सोडाच पण मुलंसुद्धा पार होरपळून निघाली हो अगदी. कधी साधी भाजीसुद्धा माझ्या मनानं घेतलेली आठवत नाहीये मला! हुशार मेहनती आणि समंजस मुलं म्हणून दिवस निघाले!’’ आता इथं बसल्या बसल्या मला त्या माऊलीची आठवण झाली आणि क्षणार्धात माझंही मन भूतकाळात सरकू लागलं, पण माझी मलाच मी टपली मारली. म्हटलं, ‘शैलाबाई, तुम्हालाही आता सुना येतील, तेव्हा उगीच जुनं उगाळण्यापेक्षा; आता पदरात पडलेली ही सुखाची झोळी मोठय़ा आदरानं स्वीकारा, यथेच्छ उपभोगा आणि शक्यतो वानप्रस्थी वृत्ती अंगीकारण्याचा प्रयत्न करा! अलिप्त पण समाधानी व्हा!’
आणि मनाशी ठरवून टाकलं आता वेळोवेळी फुटणारे हे डोळ्यातले झरे बंद व्हायला हवेत! नाहीतर मुलांच्या संसारात रंगाचा बेरंग आणि गरसमजांची वादळे मात्र उठतील! निश्चयाने डोळे टिपले. बाहेर अंधारून आलं होतं, पण माझ्या मनात प्रसन्न प्रकाश पसरला होता. गाडीच्या आरशात माझी हसतमुख शांत छबी पाहून माझं मलाच खूप बरं वाटलं. जगण्याचं एक सोनेरी तत्त्वज्ञान मला गवसलं होतं!
शोभा फणसे

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा