फहमीदा रियाज या बंडखोर कवयित्री म्हणून जरी विख्यात असल्या तरी त्यांच्यातली प्रेमळ आई-प्रेयसी व गृहिणी लोप पावलेली नाही, तसंच त्यांची तरल संवेदनाही  हरवली नाही. त्याचा प्रत्यय त्यांच्या गीतांमधून, कवितांमधून येतोच.

त्या पाकिस्तानातील सामाजिक अन् राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या तेव्हा अय्युब खान सत्तेत होते. महाविद्यालयात असताना ‘युनिव्हर्सिटि ऑर्डिनन्स व स्टुडंट युनियन ट्रस्ट’ बंदीच्या विरोधी त्या लिखाण करीत, भाषणे देत. हळूहळू त्याची ओळख कार्यकर्ती, प्रगतीशील-स्त्रीवादी लेखिका म्हणून होऊ लागली.
किश्वर नाहीदनंतर आधुनिक उर्दू कवयित्री म्हणून साहित्य जगत त्यांच्याकडे पाहू लागलं. होय तिचं नाव फहमीदा रियाज (फहमीदा म्हणजे ज्ञान अन् रियाज म्हणजे अनेक बागा किंवा तपस्या, परिश्रम आदी) २३ जुल १९४६ ला जन्मलेल्या फहमीदाचे कुटुंब उत्तर प्रदेशातील मीरत येथे राहत होते. वडील रियाजउद्दीन अहमद हे शिक्षणतज्ज्ञ होते. सिंध प्रांतात बदली झाल्याने पुढे ते पाकिस्तानातच स्थायिक झाले. तेथे लहानपणीच फहमीदा सिंधी, उर्दू व नंतर फारसी शिकली.
मूळ भारतीय िपड असल्याने फहमीदा यांच्या भाषेत हिन्दी-संस्कृत शब्दांचा भरणा विपुल प्रमाणात आहे. त्यांच्या कवितेत, गीतांमध्ये राम, पांडव, शाप, तांडव, भगवान, नारी, मेघदूत, भरतनाटय़म, ग्रहस्थन, सिंहासन हे शब्द सापडतात. ‘गृहिणी’ कवितेच्या काही ओळी पाहा-
संगीत के दायरे बनाती हुई चाल
आंगन से रसोई की तरफ जाती हुई
इक हाथ धरे कमर की गोलाई पर
चुटकी में सारा काम निपटाती हुई
घर के त्योहार में सवेरे से लगी
चेहरे पे थकावट का कहीं नाम नहीं..
ती म्हणते ‘‘या कविता व गीतांची भाषा कठीण नाही, पाकिस्तानाच्या राष्ट्रभाषेहून जरा वेगळी आहे, कारण हिच्यात अरबी-फारसी शब्दांच्या जागी विशुद्ध हिन्दुस्तानी शब्द वापरण्यात आले आहेत.’’ आता या भाषेच्या वापराचं कारणही ऐका-
‘‘शायद यूँही होता है की धरती से कटा हुआ आदमी अपने अस्तित्व को दुबारा धरती की बू-बास और नमक में समोदेने के लिए (विलय होण्यासाठी) बेचन होता है, तो उन बोलें की खोज करता है जिन पर उसका अपना सर्वथा उचित अधिकार था और जो बेरहमीसे* उसकी जुबान की नोकसे* झपट लिये गये है ।’’
 ‘शरणार्थी’ या आशयाच्या कवितेत फहमीदा म्हणते –
रिश्ते घाव हरे रहेंगे जी की काटी जडमें के
हमको गूंगा कर गये देखो बोल हमारे बडों के
फहमीदा बंडखोर कवयित्री म्हणून जरी विख्यात असल्या तरी त्यांच्यातली प्रेमळ आई-प्रेयसी व गृहिणी लोप पावलेली नाही, की त्यांची तरल संवेदना हरवली नाही,
अब जो आयी पुरवाई
रात की महक लायी
पास ही कही शायद
बेल है चमेली की..
यूँ गुमान होता है जिस तरह
मेरा प्रेमी मेरे पास सोता है..
किंवा एक ‘बहुत ही सीधी बात’ ऐका –
हर नारी के मन में छुपी है एक पुरानी अभिलाषा
मनचाहे मनुष्य के साथ फिरे, घुमे
बारिश में भीगे, सर्दी में कांपे,
गर्मी झेलें..
नारी को शर्मीली कहनेवाले के शरमाये
और सोचे अपने कोख में
पलनेवाले जीव का नाम
फहमीदा चार वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई हुसना बेगम धीराची होती. फहमीदा कॉलेज शिक्षण पूर्ण करून रेडिओ पाकिस्तानमध्ये निवेदक म्हणून लागेपर्यंत आईने कष्ट करून कुटुंब पोसले. ज्येष्ठ कवी, कथाकार अहमद नदीम कासमी यांच्या ‘फुनून’ या नामवंत मासिकात फहमीदाची पहिली कविता प्रकाशित झाली, तेव्हा ती १५ वर्षांची होती. तिचा पहिला काव्यसंग्रह ‘पत्थर की जुबान’ तिच्या वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रकाशित झाला. त्या वयातही तिची कविता किती प्रगल्भ होती याचा प्रत्यय खालील काही ओळींवरून येईल.
प्यास बुझा पाएगी कहाँ ये
आँसू की बेबस बरखा
भीगे नयनों में फिर उतरा इक
 भूला-बिसरा सपना
कटे-फटे दिन, छलनी रातें,
डूबडूब कर उभर रहे हैं
कच्ची उम्र की फूल-आशाए
पत्ती पत्ती बिखर रही है

मन के तह में पडे दमकते जो हीरे हर आन
फिर से नीर में ढल जायेंगे आयेगा तूफान
इस घर में तो अंधियारा था
फिर कौन झरोखा खुलता है
यह कहाँ से आयी चंद्रकिरण
जिससे रोशन सारा आंगन
घर में घर से बाहर पल-पल हाय
ये किसका साथ
घुट-घुट कर रह जाये,
कह नहीं पाये दिल की बात
फहमीदांनी इंग्लंडमध्ये बी. बी. सी. (रेडिओ)त नोकरीत असताना चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेतले. कराचीला परतल्यानंतर त्यांनी ‘आवाज’ नावाचे मासिक उर्दूत काढले. याच वेळी त्यांची भेट डाव्या विचारसरणीच्या राजकीय कार्यकर्ता असलेल्या जफर अली उजानशी झाली. अन् ते काही काळाने विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांना दोन मुलंही झाली. ‘आवाज’मधील उदारमतवादी, राजकीय समीक्षेच्या लिखाणाने पाकिस्तानातील शिया सरकारचे लक्ष वेधले अन् फहमीदा व जफर या दोघांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. जफरला कैद झाली. फहमीदा भारतातील मुशायऱ्यांच्या निमंत्रणाचा आधार घेत मुलांसह दिल्लीत आल्या. नंतर जफरही सुटल्यावर दिल्लीला आले. हे कुटुंब भारताच्या आश्रयाला सात वष्रे होते. बेनझीर भुत्तोच्या विवाहाचे वेळी ते कराचीला परतले. फहमीदा तेव्हा नॅशनल बँक फाऊंडेशनच्या एम.डी. म्हणून नियुक्त झाल्या. पुन्हा त्यांना नवाज शरीफच्या काळात भारतीय हेर म्हणून गुन्हेगार ठरवण्यात आले व नोकरीतून काढून टाकण्यात आले. कुटुंब पोषणासाठी त्या सलग तीन नोकऱ्या करू लागल्या. बेनझीर भुत्तो पुन्हा सत्तेत आल्यावर ‘कायदे आजम अकादमी’वर त्यांना उच्चपद देण्यात आले. १२ वष्रे त्या उर्दू डिक्शनरी बोर्डच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या.
आपल्याच नव्हे तर जनतेवरही होणाऱ्या अन्यायाला त्यांनी कथा-कादबंऱ्यांतून वाचा फोडली, लेखही लिहिले. त्या म्हणतात,
कल के अखबारों का बासी * झूठ
फिजां में तर रहा है
जिनसे फूट रहा है नये अखबार के
झूठ का मुबहम* घडका
उनमें गुंथा हुआ दिन मेंरे द्वार खडम है
पण तिला खात्री आहे-
इक दिन ऐसा भी आयेगा
जब अनहोनी हो जायेगी
हम सब की पहचान
फरेरा* बनकर इक दिन लहरायेगी
इस जहरीली धुएँ से भरी हवा में इक दिन..
कारण-
जो हाथ सँवारते है इस दुनिया को
उस हाथ की नब्ज* में धडकता है
वह शोला किस कदर फरोजाँ * है
शोषितांना त्या सांगतात,
गिद्ध क्या जाने सन्नाटे ने जना कोई इन्सान
अब जो तेरी मुठ्ठी में जकडे,
सो हर पल बलवान
साथ समय को ले
कल तेरा ही है
भारतात राहून येथील स्थिती पाहून त्या म्हणतात,
कल दुख से सोचा करती थी
सोच के हँसी बहुत आज आयी
तुम बिल्कुल हम जैसे निकले
हम दो कौम* नहीं ये भाई
राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील बनिया वर्गाला फहमीदा सुनावतात,
तिरी तोल भी झूठी थी और तिरे मोल भी झूठे है
ज्वाला बनकर खौलेंगे, जो आँसू आँख से टूटे है
पाकिस्तानातील स्थितीचे वर्णन फहमीदा एका वाक्यात करतात,
‘‘इस देश में बडी घुटन है..’’
अन् जीवन?
इक पल ठिठका मेरे द्वार
बस ऐसा है जीवन-
जैसे घर-भर में फैली धूप,
जैसे धूल जमी शीशों पर,
जैसे गीत के बिखरे पन्ने-
जैसे गले में चुभते आँसू,
जैसे पूस की धूप अकेली,
जैसे तन में छुपा सन्नाटा,
जैसे प्यासा मांस बिरहन का..
जैसे जाते दिन की उदासी..
फहमीदा रियाजचे काव्यसंग्रह- पत्थर की जुबान, क्या तुम पूरा चांद न देखोगे?, बदनदरिदा, धूप, कतरा-कतरा, खुले दरिचे से, हल्का मेरे जंजीर का, काफिले पिरदो के इ. याव्यतिरिक्त गोदावरी, कराची, अधुरा आदमी, गुलाबी कबूतर, ये खाना-ए-आबोगील आदी कादंबऱ्या व गद्य लिखाण केलं आहे. ‘पाकिस्तान, लिटरेचर अ‍ॅण्ड सोसायटी’ हा इंग्रजीतील प्रबंध तसेच सूफी संत मौलाना जल्लालुद्दीन रूमींच्या ५० कवितांचा उर्दूत अनुवाद त्यांच्या नावावर आहे.
अनेक मान्यवर संस्थांच्या पुरस्कारांसह पाकिस्तानचा ‘सितारा-ए-इम्तियाज’ हा सर्वोच्च साहित्यिक सन्मान फहमीदा रियाज यांना २०१० ला प्रदान करण्यात आलाय. साहित्याच्या संदर्भात त्यांचे विचार मननीय आहेत.
‘‘साहित्य में मन के अंदर की दुनिया और बाहर की दुनिया से संबंध रखनेवाले विषयों के बीच हदबंदियों की (सीमारेषा) आम है। लेकिन क्या मन के अंदर की दुनिया, बाहर की दुनिया की ढायी (थोपलेली) हुई नहीं है? सच तो ये है कि बाहर की दुनिया और अंदर की दुनिया के बीच की विभाजन रेखा लगातार अपनी जगह बदलती रहती है, विरह और एकांत के आँसूओं की धारा मन के अंदर से नहीं बल्कि हमारे चारों ओर बिखरी हुई दुनिया कठोर परिस्थितीयों से फूटती है’’
शेवटी या आगळय़ावेगळय़ा कवयित्रीची कविता ‘राजसिंहासन’ पाहा-
इनक़लाब के सिंहासन पर विराजते गुणवानो-
तुम क्या दोगे ज्ञान मुझे!
मुझको सीधी राह दिखाने वालो,
इतना पहचानो
तुम कुर्सी पर बठे हो
और मं धरती पर खडी़ हुई है

अपने राज्य-मंदिर की चौखट से
मुझको लौटाते हो?
मेरी थाली में तो मेरे गर्म लहू का दीप जला है
दिल की कोरी मिट्टी से जी फूटा है
वह फूल खिला है
तुम क्या दोगे ज्ञान
सँभालो अपने शिवाले
शात्रों को रट-रटकर जो तुमने
जीवन-भर में न सीखा
वह इक नारी ने अपने घायल तन में
 महसूस किया है
बेरहमीसे-निर्दयपणे, जुबान की नोक – जिभेचे टोक, बासी-शिळा, मुबहम-अस्पष्ट, फरेरा- झंडा, नब्ज -नाडी, फरोजाँ-चमकदार, कौम-समाज,