News Flash

गच्चीवरची बाग – फळे- फुले व पालेभाज्यांची लागवड

फळे- मोठे छिद्र असलेल्या मातीच्या कुंडीच्या तळाशी छोटे दगड किंवा विटांचे तुकडे टाकून माती भरावी. ज्यात शेणखत किंवा गांडूळखताबरोबर थोडी वाळू घालता येईल व त्यावर

| February 14, 2015 03:03 am

फळे- मोठे छिद्र असलेल्या मातीच्या कुंडीच्या तळाशी छोटे दगड किंवा विटांचे तुकडे टाकून माती भरावी. ज्यात शेणखत किंवा गांडूळखताबरोबर थोडी वाळू घालता येईल व त्यावर फळझाडे लावावीत. पेरू, चिकू, आंबा, अंजीर, पपई, लिंबू, केळी यांची लागवड करू शकतो. केळीच्या लागवडीनंतर फळ जरी लागले नाही तरी त्याची पाने आणि कंदाचा उपयोग करता येतो. रोपांची विक्रीही होऊ  शकते. प्रत्येक झाडाची वाढ छाटणीने नियंत्रित करावी. झाड लावताना रोप मातीसकट लावावे व लगेच पाणी द्यावे.
गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई-जुई, शेवंती, अबोली, झेंडू वगैरे रोपांची लागवड घरच्या कुंडय़ांमध्ये होऊ शकते. मात्र फुलझाडांची रोपे किंवा कलम लावल्यावर ते लागेपर्यंत जास्त लक्ष द्यावे. कलम करून रोपे तयार केल्यास विक्रीही करता येऊ  शकते. कर्दळीचे कंद लावल्यास छान फुले येतात व पानांचाही उपयोग होतो.
पालेभाजी :  पालक, मेथी, चुका, कोथिंबीर, अंबाडी, चवळी, अळू, घोळाची भाजी आपण घरी पिकवू शकतो. पालेभाज्या बांबू बास्केटमध्ये लावाव्यात. मातीच्या रक्षणासाठी तळाशी हिरवा जाळीचा कपडा टाकावा. पाणी झारीनेच द्यावे. बाजारात या सगळ्या भाज्यांची बियाणे मिळतात. घरच्या घरी घेतलेल्या पालेभाज्यांचा आस्वाद काही औरच लागतो.    
तारा माहूरकर -tara@mahurkars.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:03 am

Web Title: flowers vegetable garden in house gallery
Next Stories
1 आहारवेद – चहा
2 नानक वाणी, अमृतवाणी!
3 सेक्सी ग्रे शेडस्
Just Now!
X