* फर्निचरवर साचलेली धूळ रोजच्या रोज साफ करावी. असे न केल्यास धूळ साचून फर्निचरचे पॉलिश हळूहळू निघून जाते व फर्निचर निस्तेज वाटते.

* स्टील आणि प्लॅस्टिकच्या फर्निचरला ऊन, उष्णता आणि पाणी यांपासून लांब ठेवायला हवे कारण त्यावर डाग पडून ते खराब होते.
* ऊन, उष्णता,एअरकंडिशनर, रेडिएटर यांपासून फर्निचर लांब ठेवा. कारण त्यातून उत्पन्न होणाऱ्या उष्णतेने फर्निचरचे जोड कमकुवत होतात.
* लाकडाच्या फर्निचरला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या, नाही तर लाकूड फुगून त्याच्या पट्टय़ा निघतात.
* फर्निचरला असलेल्या चाकांना नियमित तेल आणि ग्रीस लावावे त्यामुळे फर्निचर हलवणे सोपे पडते.
* फर्निचर हलवताना त्यावर ओरखडे उठणार नाही याची काळजी घ्यावी.
* वर्ष-दोन वर्षांनी फर्निचरला पॉलिश करून घ्यावे.
* लाकडी फर्निचर साफ करण्यासाठी पाण्यात खोबरेल तेल घालून मिश्रण तयार करावे व त्या मिश्रणात कापूस भिजवून त्या बोळ्याने फर्निचर साफ करावे.
* लाकडी फर्निचरवर पडलेले चहा, कॉफीचे डाग साफ करण्यासाठी पाव चमचा तेलात पाऊण चमचा व्हिनेगर टाकून चांगले मिसळून घ्या. या मिश्रणात सुती कपडा बुडवून हलक्या हाताने डागावर चोळा.
* पाव कप धुण्याचा सोडा पाण्यात विरघळवून त्या पाण्याने प्लॅस्टिकचे फर्निचर साफ करावे. डाग आणि ओशटपणा निघून जातो.
संकलन- उषा वसंत

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?