मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

देवाची भक्ती, श्रद्धा हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. पण एकाच्या भक्तीच्या आग्रही हट्टापायी दुसऱ्याला त्रास होऊ लागला किंवा ‘आमची भक्ती श्रेष्ठ की तुमची श्रेष्ठ’ असा विचित्र तिढा उभा राहिला तर? वर्तमानपत्रांमधून वारंवार वाचायला मिळणाऱ्या अशा वादावादीचं छोटं रूप मिसेस नवांगुळांना त्यांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या गल्लीतही दिसायला लागलं होतं. ज्यानं त्यानं आपली श्रद्धा स्वत:पुरती जपली तर हा प्रश्न सुटेल का, हा कळीचा प्रश्न विचारण्यासाठी ‘व्वा हेल्पलाइन’ च्या वत्सलावहिनींनाच त्यांनी फोन लावला.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Akshaya Tritiya 2024 Gajkesari Rajyog Ma Lakshmi
अक्षय्य तृतीयेला राजयोगांचा मेळा; ‘या’ राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

स्थळ: परदेशातलं पर्यटनस्थळ.

वेळ: सकाळी लवकर पर्यटनाला निघण्याची. पात्रयोजना: मिनी बस भरून ताटकळलेले प्रवासी. वार: सर्वासाठी बुधवार; पण ‘जपमाळबाईं’साठी पांढरा बुधवार. म्हणजे सर्व सहप्रवाशांचे डोळे पांढरे करणारा बुधवार. मुंबई आंतरराष्ट्रीय ‘हवाई अड्डय़ा’वर या सहलीच्या प्रवाशांचा अड्डा जमल्यापासूनच त्या जपमाळ ओढणाऱ्या बाईंनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांचा त्या दिवशीचा जप राहिल्यामुळे त्यांनी रात्री पावणेबाराला विमानतळावर घाईघाईनं जपाचा घाट घातला होता म्हणे. (बारा वाजून गेले की दिवस बदलणार! म्हणजे त्या दिवसाच्या जपाचा खाडा पडणार!) पण ते ठीक होतं एक वेळ. आपल्याच पर्समधली माळ घेऊन त्या बसणार होत्या; पण आज त्यांनी कळस गाठला.

पांढऱ्या बुधवारी सकाळी पांढरं फूल देवीला वाहिल्याशिवाय कोणतीही कृती करायला त्यांना  ‘परमिशन’ नव्हती. त्या पर्समध्ये देवी घेऊनच फिरत होत्या. तशी तर त्यांनी पर्समध्ये ‘फोल्डिंग’ ऊर्फ  घडीचं देऊळ घेऊन फिरायलाही कोणाची हरकत नव्हती; पण आज एका अत्यंत थरारक ‘वॉटर स्पोर्ट’ला जाण्याची घडी अशी दवडणं लोकांना का सहन व्हावं? तेही एका पांढऱ्या फुलासाठी? परदेशातला वेळ आणि चलन वाया घालवून? तिथे जपमाळबाई आपल्या प्रतिज्ञेवर ठाम होत्या. ‘‘पांढरं फूल मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!’’ शेवटी परदेशातला कायदा, हॉटेल मॅनेजरची सहिष्णुता, सहप्रवाशांची चिकाटी अशा सगळ्यांना वेठीला धरून, फूल मिळवून, वाहून, शुभ्रवेशधारी जपमाळबाई बसमध्ये चढल्या तेव्हा सर्वानी उपरोधपूर्ण टाळ्यांचा कडकडाट केला. जपमाळबाई उपरोध नजरेआड टाकत कृतकृत्यतेनं म्हणाल्या, ‘‘माझं बॉई ऑसं ऑहे. देवॉचं जे ठरवलंय ते नीटच कॉरॉयचं!’’ त्यावर ‘‘पण आम्ही सर्वानी हे ‘सॉहन’ कॉ कॉरॉयचं?’’ अशा अर्थानं अनेकांची नजरानजर झाली.

बसमधली मोक्याची जागा पटकावून बसलेल्या नवांगुळ जोडप्यात मात्र यावर चर्चाही सुरू झाली.

‘‘एवढं स्ट्रिक्ट होतं तर बुधवार नसलेली ट्रिप घ्यायची ना यांनी..’’

‘‘अहो, सगळ्या टूर्स आठवडय़ाभराच्या आहेत या.’’

‘‘मग बुधवार नसलेला एखादा आठवडा चूज करायचा  होता ना.’’ संतापले की मिस्टर नवांगुळ तोंडाला येईल ते बोलत. खरं तर आता एखादी सनसनाटी जलक्रीडा दाखवून मिसेस नवांगुळांना इम्प्रेस करायच्या घाईला आले होते ते.

‘‘यांची भक्ती.. आपल्यावर सक्ती.. नसता ताप..’’ असं त्यांनी पुटपुटताच मिसेस नवांगुळ हिरिरीनं सरसावल्या. (नाही तरी नवांगुळांच्या जलक्रीडेनंतर आठवडाभर त्यांचे हात, पाय, पाठ वगैरे रगडून द्यायची त्यांना अजिबात हौस नव्हती.)

‘‘लोक असंच करतात हो. आपल्या लग्नात आठवतंय ना? तुमच्या नानामामांना उपासाच्या पंगतीत साबुदाणा वडा मिळाला नाही म्हणून किती कुरकुर केली होती त्यांनी?’’

ही ३५ वर्षांपूर्वीची घटना होती. सुमारे ३५०० वेळा ‘तुमच्याकडच्यांना समजच कमी’ या कलमांतर्गत उगाळून झाली होती; पण मिस्टर नवांगुळांचं तोंड गप्प करण्याचा हा खात्रीचा उपाय बाईंनी आता का गमवावा?

खरं तर लग्नात बहुतेक ‘बिनउपाशी’ माणसं मजबूत दुधातुपाशी जेवून उठलेली होती; पण नंतर साबुदाणे वडे थाळ्यातून आल्यावर त्यातल्या काहींना देवभक्ती आठवली. त्यांनी भरल्यापोटी वडे हाणल्यावर काही उपाशीपोटींची झाली जराशी गैरसोय. जास्त उपाशी राहिल्यावर पुण्य मिळेल असं मानून त्यांनी शांत राहायचं, का चिडचिड करायची? नवरदेवाचा थोरला मामा म्हणून नानामामांनी एवढा भाव खाल्ला, तरी पोट भरेना? तेव्हाही चार जाणते लोक आपापसात कुजबुजत होतेच, की बुवा लोकांना आपापली देवभक्ती घरी ठेवून बाहेर का पडता येत नसेल? तेव्हा वाटलं होतं, हे जुने लोक आहेत. काळ बदलला, पुढे गेला, की पुढच्यांना येईल हे भान. आता बघावं तर आपण मागेच चाललेलो.

पाण्यात माफक बागडून आणि अमाप फोटो काढून झाल्यावर शहर बघण्याबाबत प्रवाशांपुढे दोन पर्याय आले. हा देश परका असला तरी त्यात ‘आपलं’ एक देऊळ होतं. त्याला भेट देणं किंवा मग अजरामर ‘शॉपिंग’ला जाणं. इथे ताबडतोब पाटर्य़ा पडायला आणि एकानं दुसऱ्याला तोंडावर पाडायला सुरुवात झाली.

‘‘इथे येऊन देवळं नको हां! त्या फलाण्या मॉलमध्ये एका बर्मुडय़ावर चार टीशर्ट फ्री मिळताहेत म्हणे.’’

‘‘नो वे. ट्रॅव्हल कंपनीनं आयटीनरीत ‘व्हिजिट टू मंदिर’असं स्पष्ट लिहिलंय.’’

‘‘मग तुम्ही तिकडे जा, आम्ही इकडे जातो. येताना मंदिरातला प्रसाद आणा आमच्यासाठी, की झालं.’’

‘‘प्रसाद नंतर. आधी आरती. आपण झांजापण आणल्याहेत.’’

‘‘भाव महत्त्वाचा. बाकी कशासाठी ‘अक्षताम् समर्पयामि’ असं म्हणतेच ना आपली संस्कृती?’’

आपल्याकडे कोणतीही कृती संस्कृतीशी जोडली गेली की समोरच्याची बोलती पहिले झूट बंद होते. तसंच झालं; पण दोन पाटर्य़ा, माणसांचे पक्षबदल (इथेही!), प्रत्येकाची वाहनव्यवस्था, वेळा-अवेळा.. प्रचंड घोळ बराच वेळ खाऊन गेला. हजारो टी शर्टाच्या समुद्रात पोहण्याचे त्राण अंगी नसल्यानं नवांगुळ मंडळी आपली आरती गटातच सामावली.

मग घोळक्यानं जमून ‘संकष्टी पावावे’ झालं. त्या अश्राप वंदनाला कितव्यांदा तरी फळीवर उभं करून झालं (फळीवर वंदना? मुळात ‘फणीवर वंदना’!). ‘चपिता त्वमेव’ झाला. हे सगळे मुळातले आणि माफक अर्थ असलेले शब्द माहीत असल्यानं मिसेस नवांगुळ साहेबांच्या कानाशी कुरकुरल्या, ‘‘एवढी भक्ती असते तर आरतीचे शब्द समजून म्हणायला काय जातं?’’

‘‘शू..! नको तिथे तर्क लावायचा नाही. चपिता तर चपिता. अपना क्या जाता?’’

दरम्यान बसमध्ये लोकांचं बरंच ‘जायला’ लागलं होतं. कोणाचा वेळ, कोणाचा पैसा, मन:शांती.. वातावरण तापायला लागलं होतं.

तुमच्यामुळे वेळ वाया गेला, गोंधळ झाला, वगैरे वगैरे. या गदारोळात संध्याकाळच्या एका प्रसिद्ध ‘लाइट अँड साऊंड शो’ची वेळ हुकली आणि दिवस नाराजीत संपला.

दुसऱ्या दिवशी मायदेशी परतायचं! पण नियोजित विमान उशिरानं सुटलं. ही गोष्ट, घरातल्या दूध-पाणी वगैरे येण्याच्या वेळा, याबद्दल शेजाऱ्यांना कळवणं भागच होतं. पण नवांगुळ जोडप्यात त्यावरूनही मंथनच झालं. ‘‘कळवून तर ठेवू त्यांना. ते देतील नोकरांना निरोप.’’

‘‘भरवसा नाही. सध्या ते नाराज आहेत ना आपल्यावर! आपण नाक्यावरच्या देवळाच्या जीर्णोद्धाराला सढळ मदत केली नाही म्हणून.. जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष ना ते.’’

‘‘कशी करणार मदत? केवढं भर रस्त्यात आहे ते देऊळ. आधीच ट्रॅफिकनं जीव जातोय तिथे. आणखी वाढवायला गेले देऊळ तर त्याचा उद्धार होईल; पण जाता-येता आपण जीर्ण होऊ..’’

मिस्टर नवांगुळांनी सहज उच्चारलेले शब्द दुसऱ्या दिवशी घरी पोहोचताना भलतेच सार्थ ठरले. आठवडाभराच्या त्यांच्या गैरहजेरीत एका बाजूनं जीर्णोद्धारवाल्यांनी रस्ता उकरून, खडीबिडीचे ढीग उभारून मस्तपैकी अडथळ्यांची शर्यत मांडली होती, तर दुसरीकडे या ज्ञातीच्या देवळाला दुसऱ्या ज्ञातीने हरकत घेतली होती. म्हणून मग लाल झेंडे, बॅनर्स यांचाही सुळसुळाट! रिक्षावाल्यानं वैतागून पुढे जाणं नाकारलं आणि सामानासकट त्यांना भर रस्त्यात सोडून दिलं. एवढय़ा प्रवासानंतर सामान वाहात घरी पोहोचेपर्यंत बिचारे टेकीला आले. थकल्याभागल्या शरीराला रात्री झोप लागेपर्यंत मिसेस नवांगुळांना सारखं टोचत राहिलं.. या आठ-दहा दिवसांमध्ये कोणाची तरी श्रद्धा, भक्ती, देवधर्म, कोणाच्या तरी  आड आल्याचं किती वेळा पाहिलं आपण? हे देऊळ या ज्ञातीचं आहे हे एरवी जाणवत तरी होतं का आपल्याला? असे नसते मुद्दे आताच कळीचे होताहेत का? हे विषय जर खासगी,        ज्याच्या-त्याच्यापुरते राहिले असते तर निरुपद्रवी असते; पण तेच चारचौघांत, रस्त्यावर आले की घोटाळे सुरू. माझी तेवढी भक्ती, तुझं ते प्रदर्शन. आमच्यात ‘असं’ (म्हणजे चांगलं), तुमच्यात ‘तसं’ (म्हणजे तसलं.. वाईट), हे सांगणारी पोथी खरी, ते सांगणारं चोपडं वाईट,आम्ही.. तुम्ही.. असं.. तसं.. चूक.. बरोबर.. इष्ट.. अनिष्ट.. या कशाला पुरावा नाही, रुजवात नाही, यांचं म्हणून एखादं निवाडा करणारं अधिकृत कोर्टही नाही. मग कशासाठी घालवायचा हा वेळ, शक्ती? ज्यानं त्यानं खुशाल आपापल्या पातळीवर, आपापल्या घरात हवं ते मनसोक्त करत राहिलं तरी पुढचे किती गोंधळ वाचतील बरं! अगदी रक्ताच्या भावंडांमधल्या राग-रुसव्यापासून धार्मिक तेढीपर्यंत? ठरलं, वत्सलावहिनींनाच विचारून पाहू या एकदा. त्या स्वत:ही जातच असतील अशा अनुभवांमधून. भक्तीच्या अशा सार्वजनिकीकरणावर त्या काय म्हणतात, हे तर बघू या.. मिसेस नवांगुळांनी मनाशी नक्की ठरवून ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन केला.

‘‘हॅलो, मी नवांगुळ बोलत्ये.’’

‘‘स्वागत आहे तुमचं आमच्या ‘व्वा’ हेल्पलाइनवर. बोला, तुमची काय समस्या आहे?’’

‘‘माझी एकटीची नाहीये खरं तर. ही आपल्या आजच्या समाजाचीच समस्या आहे. त्यात आपण एकेकटे आणि समूह म्हणूनही भरडले जातोय.’’

‘‘अरे बापरे.. मग तर तिच्यावर उतारा शोधलाच पाहिजे.’’

‘‘आपल्याला आपला देवधर्म, श्रद्धाभक्ती मौलिक असतात ना?’’

‘‘प्रश्नच नाही!’’

‘‘आपल्याला आपलं सोनंनाणं, उंची वस्तू, आर्थिक व्यवहार, हेही मौलिक असतात नाही का?’’

‘‘अवांतर बोलू नका हो. प्रश्न काय आहे?’’ वत्सलावहिनींनी विचारलं.

‘‘प्रश्नाकडेच येत्येत वहिनी. आपण आपल्या मौलिक वस्तू घरात, कडीकुलपात, लॉकरमध्ये वगैरे बंद करून ठेवतो, तसाच आपला देवधर्म आपण आपल्या मनात, घरात, आपल्यापुरता जपून ठेवायला नको का?’’

‘‘हो खरं तर.’’

‘‘मग आपल्याला ते का जमत नाहीये? ’’

‘‘तुम्ही पूर्वीचं बघा ना.. आपली देवळं आठवा. कुठे तरी डोंगराच्या शिखरावर, गावाच्या वेशीबाहेर अशी असायची ती! माणसांच्या रोजच्या जगण्यात येत नसत ती.’’

‘‘म्हणजे आता देवांना बरे दिवस आले, लोकांची श्रद्धा वाढली, असं म्हणायचं का?’’ मिसेस नवांगुळांनी विचारलं.

‘‘छे हो! श्रद्धा, अश्रद्धा यात तर पडायलाच नको आपण. महानिसरडे शब्द ते. तेल लावलेल्या मल्लखांबासारखे. इकडून धरलं तर तिकडून सुटणारे हातातून! पुन्हा जो तो आपापल्या श्रद्धे किंवा अश्रद्धेबद्दल भयंकर कट्टर.’’

‘‘मग आताच्या या अनागोंदीबाबत आपल्याला काय करता येईल? ज्या देवानं हा सृष्टीचा खेळ मांडला त्याच्यापायीच असमाधानापासून जाळपोळीपर्यंत काहीही होतंय ना? एवढं एक टाळता आलं तरी आपलं सामाजिक जीवन बरंचसं शांत होईल नाही का? कसं करता येईल?’’

‘‘फक्त प्रार्थनेनं!’’

‘‘काय? अहो, नियम, कायदे, असं ठोस सांगा ना..’’

‘‘ते तर कधीच कोणत्याच सत्तेला परवडत नसतात करायला. लोकांच्या असल्या नाजूक भावनांना हात घालून लोकप्रियता गमवायला कोण जाईल सांगा? आपण फक्त प्रार्थना करू शकतो. ज्या देवासाठी एवढं चालतं त्याची! बाबा रे.. तू बुद्धी दे! ज्याला-त्याला आपल्या श्रद्धाभक्ती स्वत:पुरत्या ठेवण्याची बुद्धी दे. हा एकच मार्ग असला तर असेल. बाकी आपल्या हातात काही नाही!’’