कोणतीही आवाजनिर्मिती ही श्वास रोखण्याची क्रिया आहे. म्हणूनच ओंकार उच्चार ही पण श्वास रोखण्याचीच क्रिया आहे. आवाज निर्मितीच्या वेळी मानेच्या पुढील भागात असलेल्या स्वरयंत्रातील दोन स्वरतंतू एकमेकांच्या जवळ येतात व त्यांच्यामधील जागा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ग्लॉटिस असे संबोधतात ते बंद करतात. मात्र नसर्गिक श्वासोच्छ्वास क्रियेच्या वेळी दोन स्वरतंतूमधील जागा, म्हणजेच ग्लॉटिस उघडे असते. सामान्य जनमानसात, आवाज निर्मिती ही उच्छ्वासाची क्रिया आहे, हा गोड गरसमज आहे. आवाजनिर्मिती ही उच्छ्वासाची क्रिया नाही, तर कुंभक क्रियेत म्हणजेच श्वास रोखण्याच्या क्रियेत होणारी दाबयुक्त उच्छ्वासाची क्रिया आहे. फुग्यातून जशी हवा सुटते तसा आवाज निर्मितीत श्वास सुटत नाही तर वाफेच्या दाबावर चालणाऱ्या यंत्रात, वाफशक्तीचे रूपांतर जसे इंजिन शक्तीत होते तसे श्वासदाबाचे रूपांतर आवाजशक्तीत होते. ही गोष्ट प्रत्येक ओंकार साधकाने लक्षात ठेवणे अतिशय जरुरीचे आहे. म्हणूनच उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करण्याच्या कोणत्याही क्रिया ओंकार साधकास संपूर्णपणे वज्र्य आहेत आणि घातक आहेत. या क्रिया म्हणजे उदा. पुटपुटत बोलणे, नको असलेली कामे केल्यानंतर हुश्श हश्श असे उच्छ्वासाचे आवाज काढणे, शिट्टी वाजवणे. प्राणायाम करताना उच्छ्वासाचा आवाज किंवा शिट्टी वाजवल्यासारखा आवाज करत श्वास सोडणे. हवा फुंकून नाद व संगीत निर्माण करणारी वाद्य्ो वाजवणे उदा. सनई, बासरी, क्लोरोनेट व या सम इतर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगातील कपालभाती क्रिया. कारण कपालभाती क्रियेत जलदगतीने श्वासोच्छ्वास क्रिया केली जाते व उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज करत जलद गतीने देहाबाहेर टाकला जातो. हे कंठाला अतिशय घातक आहे. कारण या क्रियेत कंठ खुले करणारे स्नायू आकुंचन न पावता कंठ बंद करणाऱ्या स्नायूंची क्रिया जास्त होते.
दहा दहा वष्रे नित्यनेमे कपालभाती केलेल्या अनेक साधक व्यक्तींचे आवाज पूर्णपणे गेलेले मी पाहिले आहेत. त्यामुळे कपालभाती आवाज खाती असे माझे ठाम मत आहे.
ज्यांना ज्यांना नादचतन्य स्वरूप ओंकार साधनेतून आरोग्याकडची वाटचाल करायची आहे, त्यांचा कंठ सदैव खुला असणे ही ओंकारातून अपेक्षित सुयोग्य स्पंदने मिळण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय जरुरीची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कपालभाती किंवा इतर सर्व उच्छ्वासाच्या वेळेस आवाज करण्याच्या क्रियांमधून साधकास इतर काय फायदे होतात हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण उच्छ्वासाच्या वेळेस श्वासाचा आवाज होणारी कोणतीही क्रिया ही कंठ बंद करणारी क्रिया असल्याने ओंकार साधकास ती घातक आहे. कारण नादचतन्य ओंकार उच्चारणातून निर्माण होणारी परमशुद्ध स्पंदने त्याला प्राप्त होणार नाहीत.
सारांश – ओंकार साधकास उच्छ्वासाच्या वेळेचा श्वासाचा आवाज करणारी कोणतीही
क्रिया १०० टक्के वज्र्य आहे, घातक आहे. कारण ती कंठ बंद करणारी क्रिया आहे. म्हणूनच प्रत्येक ओंकार साधकाने नादनिर्मितीचे मूलतत्त्व पक्के ध्यानात ठेवावे ते म्हणजे –
आवाजनिर्मिती नाही श्वास सोड क्रिया, आवाजनिर्मिती ही तर श्वास पकड क्रिया.
डॉ. जयंत करंदीकर – omomkarom@rediffmail.com