क्षयरोग निर्मूलनासाठी

आरोग्यविषयक हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत. क्षयरोगाचे प्रमाण हल्ली थोडे वाढले असल्याच्या बातम्या आपण वाचतो. क्षयरोगमुक्त भारत या मोहिमेअंतर्गत क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच केंद्र सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे – १८०० ११ ६६६६. ही हेल्पलाइन सेवा २४ तास विनामूल्य उपलब्ध असते. या क्रमांकावर संपर्क साधून गरजू व्यक्तीचा पत्ता कळवल्यास तज्ज्ञ डॉक्टर त्या व्यक्तीकडे स्वत:हून जातात आणि त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्या करवून घेतात. क्षयरोगाचे निदान झाल्यास त्या व्यक्तीला आवश्यक ती औषधे दिली जातात. एवढेच नव्हे, तर पाठपुरावाही केला जातो. जवळच्या आरोग्य केंद्रातर्फे ही सगळी सोय केली जाते. त्या रुग्णाचे समुपदेशनही वेळोवेळी केले जाते. ही सारी सेवा-सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे.
राज्य सरकारचीसुद्धा अशीच एक हेल्पलाइन आहे. २४ तास विनामूल्य सुरू असणाऱ्या या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे – १८०० १०२ २२४८. या हेल्पलाइनवरूनही रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत मिळते.
टी.बी. असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई. दूरध्वनी क्रमांक – ०२२ २४१०६५८३.

मूत्रपिंड विकारांसाठी
मूत्रपिंड विकारांसाठी असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सतर्फे मूत्रपिंड विकारग्रस्तांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जाते. मूत्रपिंड विकाराचे निदान, उपचार, काळजी, पुनर्वसन, मूत्रपिंड विकार होऊ नये म्हणून घ्यायच्या काळजीची माहिती देणे, मूत्रपिंडदानासाठी प्रयत्न, घरी डायलिसिसची सोय आदीबाबतीत या हेल्पलाइन्सवरून मदत केली जाते, अथवा मदत करणाऱ्या संस्था व रुग्णालयांची माहिती दिली जाते. त्या संस्थांची नावे व संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक – जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई – ०२२ २८०१२७८३.
मुंबई किडनी फाउंडेशन, मुंबई – ०२२ २८०१६२६६, ०२२ २८६२६८५४.
नर्मदा किडनी फाउंडेशन, मुंबई – ०२२ २८२५४१४७.
नॅशनल किडनी फाउंडेशन, मुंबई – ०२२ २२८१४८९२, ०२२ २२८१७९१४
मुक्ता किडनी अँड डायलिसिस क्लिनिक, मुंबई – ०२२ ३२००३३००.
हिंदुसभा हॉस्पिटल, मुंबई – ०९८२०२८०७३१.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com