* महिन्यातील आवश्यक खर्च, अनावश्यक खर्च व आकस्मिक खर्च याची वर्गवारी करून त्याप्रमाणे नियोजन करावे. अनावश्यक खर्च टाळावा.

* वाढती महागाई, मुलांचे शिक्षण, आजारपण, अचानक उद्भवणारे कठीण प्रसंग, लग्न, समारंभांसाठी लागणारी पशांची गरज लक्षात घेऊन बचतीचे महिन्याचे नियोजन करत जावे.
* मुदत ठेव, पोस्टातील बचत, पीपीएफ, आयुर्वमिा यासारख्या गुंतवणुकीतून रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवली जाते व काही योजनांचा फायदा प्राप्तीकर वाचवण्यासाठी होतो.
* शॉिपग किंवा मॉलमध्ये जाताना हव्या असलेल्या वस्तूंची यादी करून घ्यावी आणि यादीप्रमाणे खरेदी होतेय ना याचे भान ठेवावे. अनावश्यक खरेदी टाळावी.
* २-३ कुटुंबांनी मिळून महिन्याचे किंवा वर्षांचे गहू, तांदूळ, साखर, कडधान्य घेतल्यास योग्य भाव मिळतो, एकसारखा आणि चांगल्या प्रतीचा माल मिळतो. मोठय़ा खरेदीवर दुकानदार मोफत घरपोच सेवा पुरवतो. यामुळे वेळेची व पशाची बचत होते.
* हातगाडीवरून दारात येणाऱ्या भाजीवाल्याकडून भाजी घेण्यापेक्षा बाजारात जाऊन भाजी घेतल्यास स्वच्छ, ताजी आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजी घेता येते. उद्या कोणती भाजी करायची याची चिंता राहात नाही. आठवडय़ाची भाजी घेतल्याने बचत होते आणि चालल्याने व्यायामही होतो.
संकलन- उषा वसंत