ढग बाजूला गेल्यावर स्वच्छ सूर्य दिसू लागतो त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर खरा आनंद मिळू  लागतो, असे शंकराचार्य म्हणतात. अज्ञानाची तुलना त्यांनी स्वप्नाशी केली आहे, जागे झाल्यावर स्वप्नांचा खोटेपणा आठवून हसू येते की नाही? तसेच आहे. खरा आनंद कसा शोधायचा?
शरीराने उपभोगलेला आनंद हा सात मिनिटांहून अधिक टिकत नाही असे वाचल्याचे आठवते. मनाने अनुभवलेला आनंद हा काही तास टिकू शकतो. एखाद्या बौद्धिक संशोधनाच्या कामातून मिळालेला आनंद काही दिवस टिकू शकेल. निष्काम कर्मयोगातून मिळत असलेला आनंद काही महिने अनुभवता येईल. पण शाश्वत आनंदाची प्राप्ती? ‘अहं ब्रह्मासि’ या वृत्तीतूनच शंभर टक्केआत्मानंद मिळेल. हा आनंद आपल्या आतच आहे. नको असलेली वरची आवरणे फक्त काढून टाकायची आहेत ही जाणीव म्हणजेच ‘ज्ञान’प्राप्ती म्हणजेच खरे जागे होणे. अशा ब्रह्मानंद प्राप्तीकडे घेऊन जाणारी एक कृती म्हणजे ब्रह्ममुद्रा.
ब्रह्ममुद्रा
बठक स्थितीतील सुखावह पूर्वस्थिती घ्या. आपल्याला वर, खाली, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला अशी मान फिरवून घ्यायची आहे. उच्च रक्तदाब, सव्‍‌र्हायकल स्पॉन्डिीलायटिस, व्हर्टिगो इत्यादी त्रास असल्यास कृती जरा सांभाळूनच करा.  हे करीत असताना हात ज्ञानमुद्रा अथवा द्रोणमुद्रेत ठेवा. मान पुढे अथवा मागे अथवा बाजूला नेताना डोळे मिटू नका. मात्र अंतिम स्थितीत डोळे मिटा. मानेचे स्नायू, गळ्याचे स्नायू यांच्यावर दाब ताणस्थिती आल्याने गळ्यातील सप्तपथांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
 कृती करीत असताना श्वास घ्या व कृती सोडताना श्वास सोडा. अवाजवी ताण देऊ नका. खांदे सल, शिथिल सोडा. कपाळावर आठय़ा नको, सजगता हवी.

संगणकाशी मत्री : आता व्हा फेसबुक यूजर!
संकलन-गीतांजली राणे -rane.geet@gmail.com
आजी-आजोबा सध्या फेसबुक हे तुम्हाला जगाबरोबर राहायला मदत करणारं चांगलं साधन आहे. आपल्या मित्रपरिवाराच्या, नातेवाइकांच्या सतत संपर्कात राहण्याचा सोपा व स्वस्त मार्ग आहे. फेसबुकवरून तुम्ही तुमच्या परिचितांशी गप्पा मारू शकता, त्यांना फोटो पाठवू शकता, तुमचे एखाद्या घटनेवरचे मत नोंदवू शकता, तुमच्या मनातले विचार तुम्हाला हवे तेव्हा हवे तिथून हव्या त्या वेळी मांडू शकता आणि या सगळ्यावर तुम्हाला जनमानसातून चांगल्या-वाईट प्रतिक्रियाही मिळतात बरं का.. तुमची जी तक्रार असते की आमच्यासोबत कोणी बोलायला नाही, आम्हाला कोणाशी चर्चा करता येत नाहीत, विचार प्रदर्शन करता येत नाही.  तर या साऱ्या तक्रारींना तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून बगल देऊ शकता. पण यासाठी आवश्यकता आहे ती फेसबुकच्या अकाउंटची. आज आपण फेसबुकचे अकाउंट कसे तयार करावे हे पाहणार आहोत.
१. प्रथम http://www.facebook.com असे अ‍ॅड्रेसबारमध्ये टाइप करा.  आता आपल्यासमोर sign up असे लिहिलेले पान सुरू होईल. sign up या पर्यायाखाली तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली असेल ती भरावी लागेल. ही माहिती भरून झाल्यानंतर पानाच्या सर्वात शेवटी असलेल्या हिरव्या रंगातील  sign up  च्या पर्यायावर क्लिक करा.
२.आता तुमच्यासमोर find your friends चा पर्याय सुरू होईल. जर तुम्हाला या पर्यायाचा वापर करून मित्र निवडायचे नसतील तर सर्वात शेवटी असलेला skip this step पर्याय निवडा.
Fill out info   हा दुसरा पर्याय आपल्यासमोर सुरू होईल, यात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची असते. उदा. शाळेचे नाव, महाविद्यालयाचे नाव, राहत असलेले शहर, नोकरीचे ठिकाण इ. (ही सर्व माहिती भरणे हे ऐच्छिक असते.) ही माहिती भरायची नसल्यास skip हा पर्याय निवडावा. जर माहिती भरली असेल तर  save and continue हा पर्याय निवडावा.
४.पुढचा पर्याय हा WF choose interests हा असतो. यात तुमच्या आवडीच्या सामाजिक गोष्टींची माहिती द्यायची असते. उदा. आवडते चित्रपट, पुस्तके, कलाकार, मालिका इ. (ही सर्व माहिती भरणे हेही ऐच्छिक असते.) ही माहिती भरायची नसल्यास skip हा पर्याय निवडावा. जर माहिती भरली असेल तर  save and continue हा पर्याय निवडावा.
५.पुढचा पर्याय असतो add profile pic चा. यात तुम्हाला तुमचा स्वत:चा फोटो जोडायचा असतो. जेणेकरून तुम्ही वापरत असलेले अकाउंट नेमके कोणाचे आहे हे दुसऱ्या व्यक्तीला समजणे सोपे जाते. यातही तुम्हाला इच्छा असेल तरच तुम्ही फोटो अपलोड करू शकता. (फोटो कसे अपलोड करता येतात त्याची माहितीही नंतर सांगूच.)
६.आजी-आजोबा, आता तुमचे फेसबुक अकाउंट वापरण्याकरता तयार  आहे. आता तुम्हीदेखील तुमचे सीनिअर सिटिझन्सचे व्हच्र्युअल ग्रुप बनवून स्वत:ची कॉलर नातवंडांसमोर टाइट करू शकता.
महत्त्वाची सूचना : फेसबुकचे अकाउंट सुरू करण्याकरता ई-मेल आयडी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आधी ई-मेल आयडी तयार करावा.  अनेकदा फोन क्रमांकाचा वापर करूनही अकाउंट सुरू करता येते.   

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
UK First Lady Akshata Murty visits Bengaluru book market with Narayana Murthy Video Viral
“याला म्हणतात साधेपणा!” ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नी असूनही रस्त्यावर पुस्तक खरेदी करताना दिसल्या अक्षता मूर्ती, Video Viral

कायदेकानू :  मुलीकडून पोटगी
अ‍ॅड. प्रीतेश देशपांडे -pritesh388@gmail.com
आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण वृद्ध माता-पिता हे त्यांच्या अपत्यांकडून पोटगी मागू शकतात, हे पाहिले. परंतु वृद्ध माता-पिता मुलीकडून पोटगी मागू शकतात का? एखाद्या दाम्पत्याला मुलगा नसेल व फक्त कमावती मुलगी वा एकापेक्षा जास्त मुली असतील, तर त्यांना मुलींकडून पोटगी मिळू शकते काय, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यास होकारार्थी उत्तर दिले आहे.
न्यायालयाने या खटल्यात निकाल दिल्याप्रमाणे, वृद्ध पालकांना त्यांच्या विवाहित मुलीकडूनही पोटगी मागता येते. सदर खटल्यात वृद्ध पित्याने त्याच्या प्रथम पत्नीकडून झालेल्या मुलीकडून पोटगी मागितली होती व सर्वोच्च न्यायालयाने पोटगी देण्याचा तो आदेश कायदेशीर ठरवला आहे. न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, वृद्ध माता-पित्यांना कलम १२५ अंतर्गत त्यांच्या विवाहित कमावत्या मुलीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे, सदर कायद्याचे उद्दिष्ट हे सामाजिक सुरक्षा असे असून आपल्या वृद्ध पालकांचे संगोपन करणे ही त्यांच्या अपत्यांची, मग ती मुलगी असो वा मुलगा, कर्तव्यच आहे. मुलगी अथवा मुलगी जर कमावती असेल, तर भारतीय समाज अशा अपत्यांवर आपल्या वृद्ध पालकांच्या जबाबदारीचे कर्तव्य ठेवत असतो, आणि पालकांच्या वृद्धापकाळात, त्यांच्या गरजांची व देखभालीची जाणीव ठेवणे ही प्रत्येक अपत्याची जबाबदारीच आहे. अपत्याच्या विवाहानंतरही ती व्यक्ती त्यांच्या आई-वडिलांचे अपत्य राहतेच. त्यामुळे लग्नानंतर स्वत:च्या उदरनिर्वाहाचे पुरेसे साधन नसणाऱ्या वृद्ध माता-पित्यांना न सांभाळणे सयुक्तिक ठरणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सदर खटल्यात, कलम १२५ द्वारे वृद्ध लोकांसाठीचे धर्मनिरपेक्षत्व नमूद केले आहे. त्यानुसार कोणत्याही धर्माचे वृद्ध व्यक्ती कलम १२५ प्रमाणे पोटगीसाठी अर्ज करू शकतात.
            
आनंदाची निवृत्ती : रोज एक पोस्टकार्ड
कादंबरी जोशी
माझी नात मृण्मयी व नातू सोहम कोल्हापूरला राहतात. आज नात ११ वीत व नातू ८ वीत आहे. दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधायचा सर्वसामान्य मार्ग तर होताच. पण त्याहीपेक्षा वेगळा मार्ग मी निवडला. रोज एक पोष्टकार्ड पाठवायचा.
 जानेवारी २००० पासून अगदी आजपर्यंत मी रोज एक पोस्टकार्ड त्यांना पाठवते. हा उपक्रम चालूच राहणार आहे. ही पत्रे मी लिहीत गेले. रमत गेले. आनंद घेत गेले. चारोळय़ा, रेखाचित्रे, समान शब्दसमूह, विरोधी शब्द, विशेषण-विशेष्ये, अनुप्रासयुक्त शब्द, नातवंडांच्या बाललीला, त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणी, माझ्या स्मरणरंजकथा, थोरांच्या आठवणी, कथा, रुपकथा- पत्रात अशी विविधता व प्रगल्भता आणत गेले. इंग्रजी माध्यमातील नातवंडांना या मराठी पत्रांमुळे मराठी भाषेची सवय राहिली. जडली. मराठी भाषेची जाण वाढली. शब्दसंपत्ती वाढली. त्यांचे मराठी वाचन सहज-सोपे झाले. या पत्रांचे वैशिष्टय़ म्हणजे ही पत्रे खाजगी तर नाहीतच. कुठलेही पत्र उचलून कुणीही त्यात रमावे. असं ऐकलंय की ही पत्रे आधी कोल्हापूरचा पोष्टमन वाचतो. मग कवितेच्या (माझी डॉक्टर कन्या) हॉस्पिटलमधील स्वागतिका वाचते. मग ओपीडीतील रुग्ण वाचतात. येणारे एम्.आर. वाचतात. एवढय़ा प्रवासांनंतर ती पत्रे कवितेच्या टेबलावर व नंतर नातवंडांकडे जातात. हा पत्रप्रवास माझ्या खेरीज इतक्या जणांना इतकी वर्षे आनंद देतोय. ‘उद्याच्या पत्राचा विषय’ माझ्या ८० व्या वर्षीही मला आनंदी-उत्साही व तरतरीत ठेवतो. मराठी भाषेत एखाद्या आजीने आपल्या नातवंडांना इतक्या दीर्घ काळ रोज एक पत्र लिहिण्याचा उपक्रम कदाचित एकुलता एक असेल का? अनेकांना मात्र यातून स्फूर्ती नक्की मिळेल.

खा आनंदाने : आला वसंत अंगणी
वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ )
चैत्र महिना म्हटला की गुढीपाडव्याला लागूनच रामनवमी येते. भारतीय परंपरेप्रमाणे प्रत्येक सणाला जसं महत्त्व आहे तसंच ‘सणासुदी’ स्पेशल पाककृतींनासुद्धा तितकंच महत्त्व आहे. जरी रूढीनुसार विविध पाककृती बनत असल्या तरी प्रत्येक पाककृतीसाठी वैज्ञानिक कारणे आहेतच. चैत्रामध्ये थंडी संपून उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. मग सण साजरा करायचा, पण तब्येतीला जपून! आज काही दाक्षिणात्य पारंपरिक रेसिपी खास रामनवमीच्या निमित्ताने आणि उन्हाळ्याच्या स्वागतासाठी –
                       पनकम
साहित्य – २ कप  पाणी, १/२ कप किसलेला गूळ, १/४  चमचा मिरपूड, १/२ चमचा किसलेलं आलं, १/४ चमचा वेलची पूड . कृती :  पाण्यात किसलेला गूळ विरघळवा, उर्वरित साहित्य घाला.  तहान शमवणारं थंड पनकम तय्यार!
             वाटलीडाळ (आजी-आजोबा स्पेशल)
साहित्य- १ कप मूगडाळ, २/३ टे.स्पून नारळ ,
चवीला- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या (पर्यायी),
१ चमचा किसलेली कैरी /  लिंबाचा रस,  चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर – वरून घालण्यासाठी.
कृती- मूगडाळ अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि मग पाणी निथळून टाका. इतर सर्व साहित्य घाला
 आणि ढवळा. ही डाळ कच्ची असली तरी सहज पचते.
            पोह्य़ाची खीर
साहित्य- १/२ कप पातळ पोहे , १ कप दूध , १/२ कप किसलेला गूळ , ४-६ काजू , ३/४ किसमिस पर्यायी, १/२ चमचा वेलची पावडर, १ चमचा तूप.
कृती- तुपामध्ये काजू आणि किसमिस थोडे परतून घ्या आणि बाजूला ठेवा. त्याच तुपात पोहे हलके होईपर्यंत भाजून घ्या. दूध घालून ढवळून मग थंड होऊ  द्या. १/४ कप पाणी उकळून त्यात गूळ विरघळून घ्या. हे पाणी (थंड झाल्यावर) आणि वेलची पोह्य़ाच्या मिश्रणात घाला आणि एकत्र करा. वरून काजू आणि किसमिस घाला.
चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला
राम जन्मला गं सखे, राम जन्मला