26 January 2021

News Flash

केक करण्यापूर्वी..

केक करण्यासाठी केक पॅन, मफिन पॅन किंवा कुकी शीट यांचा वापर करावा. ही भांडी नसल्यास अ‍ॅल्युमिनीयम, नॉनस्टिक किंवा काचेच्या पसरट भांडय़ाचा वापर करता येतो.

| August 22, 2015 01:04 am

डॉ. शुभांगी पारकर यांचे ‘अचपळ मन माझे’ हे सदर आजच्या अंकात प्रसिद्ध झालेले नाही.
० केक करण्यासाठी केक पॅन, मफिन पॅन किंवा कुकी शीट यांचा वापर करावा. ही भांडी नसल्यास अ‍ॅल्युमिनीयम, नॉनस्टिक किंवा काचेच्या पसरट भांडय़ाचा वापर करता येतो.
० केकला लागणारी सामग्री मिसळण्यासाठी काचेच्या खोलगट वाडग्याचा वापर करावा. त्यामुळे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळले जाईल आणि बाहेर सांडणार नाही.
० मिश्रण एकजीव करण्यासाठी ब्लेंडर किंवा लाकडी चमच्याचा वापर करावा. हाताने केल्यास हाताच्या उष्णतेने मिश्रण पातळ होते.
० मिश्रण करताना एकाच दिशेने गोलाकार फिरवावे.
० ओव्हनमध्ये केक करताना केकचे भांडे ठेवणार असलेल्या रॅकखाली अल्युमिनीयम फॉईल ठेवावी त्यामुळे फुलून आलेले केकचे मिश्रण सांडले तरी सहजपणे स्वच्छ करता येईल.
० केकसाठी लागणारा मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर चाळण्यासाठी बारीक जाळीच्या चाळणीचा वापर करावा. म्हणजे मिश्रणात गुठळ्या न राहता केक हलका होतो.
० केक ट्रेमध्ये मिश्रण घालण्यापूर्वी ट्रेला तूप, लोणी लावण्यासाठी ब्रशचा वापर करावा. ब्रशमुळे भांडे व्यवस्थित ग्रीस होते.
० सगळ्यात महत्वाचे माप. बेकिंगमध्ये मापात थोडा जरी फरक झाला तरी केक फसतो. कधी कडक होतो, कधी अगदीच सैल होतो. चवीतही बदल होतो. त्यासाठी मोजण्याचा कप आणि चमच्यांचा वापर करावा.
० एक कप मैदा म्हणजे पूर्ण कोरडा केलेल्या कपात मैदा घालत कप प्लॅटफॉर्मवर हलके हलके आपटत रहावा व कप पूर्ण भरल्यावर सुरीने सपाट करून घ्यावा.
० केक करण्यास सुरुवात करण्यापूर्वी केकसाठी लागणारी सामग्री मापून, चाळून घ्यावी. केकसाठी लागणारी भांडी, कोरडी करून घ्यावी.
० बेकिंग सामग्री फ्रीजमध्ये ठेवली असेल (मैदा, अंडी, लोणी) तर ती बाहेर काढून सामान्य तापमानात आणावी.
० फ्रीज मधून काढण्याचे लक्षात राहिले नाही तर सामग्री सामान्य तापमानात येण्यासाठी लोण्याचे तुकडे करून ५ सेकंद मायक्रोव्हेव करा, अंडी १० ते १५ मिनिटे कोमट पाण्यात ठेवा.
० अंडय़ाचा केक करायचा असल्यास एका वेगळ्या बाऊलमध्ये अंडे हलके होईपर्यंत फेटून घ्यावे. स्पॉन्ज केकसाठी अंडय़ातील पांढरे आणि पिवळे भाग वेगवेगळे फेटून मिश्रणात घालावे.
० केकमध्ये सुका मेवा किंवा फळांचे तुकडे घालावयाचे असल्यास बाऊलमध्ये सुका मैदा घेऊन तुकडे त्यात घोळवून किंवा बुडवून घ्यावे.
० केकचे मिश्रण तयार करण्यापूर्वी ओव्हन प्री-हीट करून घ्या. ओव्हन नसल्यास केक ट्रे ज्या भांडय़ात ठेवणार ते भांडे गरम करून घ्या.

-unangare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2015 1:04 am

Web Title: how to make cake
Next Stories
1 करून बघावे असे काही संकलन-
2 स्मार्टफोनची काळजी
3 ओठांची काळजी
Just Now!
X