17-sanganakमागील लेखामध्ये मराठी टायिपग कसे करावे, त्याकरता वापरले जाणारे सॉफ्टवेअर्स यांची माहिती घेतली. आज आपण आणखी एका सोप्या पर्यायावर नजर टाकणार आहोत. मुख्य म्हणजे हा पर्याय संगणक प्रणालीचा एक भाग असल्याने, तो वापरणे अगदी सोपे आहे. १९९८ सालापासून मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमसोबत कोणत्याही प्रादेशिक भाषेत टाइप करता येऊ शकणारा युनिकोड हा फॉन्ट इन्स्टॉल करून देते. या फॉन्टचा वापर करून तुम्ही जगातली कोणतीही लिपी टाइप करू शकता. बरं गंमत म्हणजे यासाठी इंटरनेटचीही आवश्यकता भासत नाही. परंतु जर तुमच्याकडे २००३ ची ऑपरेटिंग सिस्टम असेल तर काही वेळेस त्या सीडीची गरज भासू शकते.

हा फॉन्ट सुरू करण्याकरता सर्वप्रथम Control Panel मध्ये जा. यात तुम्हाला फीॠ्रल्लRegion and Language >> Location  हा पर्याय निवडत, India असा स्वत:च्या देशाचा पर्याय निवडावा लागेल. आता Keyboards and Language हा पर्याय निवडा. आता Change Keyboards च्या पर्यायामध्ये जाऊन General चा पर्याय निवडा. यात Add क्लिक करूनAdd Input Language बटन दाबा. आता Marathi (India) Keyboard या पर्यायावर जाऊन हा पर्याय निवडून ओके करा. आता तुम्ही देवनागरी लिपीमध्ये इनक्रिप्ट पद्धतीतला कीबोर्ड वापरून मराठी टाइप करू शकता.
(इनक्रिप्ट हा कीबोर्डचा एक प्रकार आहे. उदा. यात एच हे इंग्रजी अक्षर सुरू केल्यावर प हे मराठी अक्षर टाइप होते. मराठी टायिपगकरता टाइपरायटर, फोनेटिक असेही कीबोर्डचे पर्याय उपलब्ध आहेत.)

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!
Leica working On Leica look For Xiaomi 14 series for smartphones iconic camera
‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…